दोन वेडे !
रात्र झाली होती.
विसपुते मेन्शन सुद्धा निद्रादेवीच्या आधीन झाला होता.
मात्र एका रूम मधील लाइट अजूनही चालू होती.
"मार्क झोपा आता" अल्डेर म्हणाला.
"अल्डेर १३ वर्षे झाली आता, नाही झोप येत."
"येत नसेल तरीही झोप, कारण विसपुते मेन्शन जागा राहणं जगाला परवडणार नाही."
"विसपूते मेन्शन जागा राहणं जगाला चालेल पण मार्क विसपूते नाही."
"मार्क विसपुतेने जग जिंकलं पण स्वत:ला नाही, अल्डेर."
मार्कचा आवाज कंप पावत होता.
"मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, जग जिंकणं सोपं असतं, पण "स्वतःला जिंकणं अवघड असतं."
कोण ? सिकंदर ?"