पुणेरी कथालेखक - २
पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने!
पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने!
गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत!
प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये!
१. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.)
२. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल.
३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल.
मार्कवर देशद्रोहाचा खटला भरला गेला!
त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण 'पूल ऑफ़ डेड' मधे त्याचा अंत झाला!
डेड्पूल अमेरिकी सरकारच्या मानवताविरोधी कारवायांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होता!
शेवटच्या लॉझगन्स कुठे वापरल्या जाणार हेही ठरलं होत!
भारत अमेरिका युद्ध!
जनरल सोन्याबापू ह्याच चिंतेत होते. कारण लॉझ्गन्स विरोधात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते!
"सर आपल्यासाठी पत्र आले आहे"
बापूंनी चिंतेत पत्र हातात घेतले!
"लॉझ्गन्स वर उत्तर!"पत्रात लिहिले होते!
त्या पत्राबरोबर एक केमिकलची बाटली देखील होती!!!!
आला आला जिलबीवाला आला आला
जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला
साधी जिलबी मावा जिलबी पण आहे
पंजाबी की राजस्थानी देऊ बोला
चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू
पण भेसळमालाची देऊ खाण्याला
आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी
नाहीतर करता तुम्ही झिंगालाला
जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी
स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला
- स्वामी संकेतानंद जलेबीवाले
तो वेडा ब्रेड कापत होता.
"हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला.
वेडा फक्त त्याकडे बघत होता.
"१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस"
वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला.
मार्कने तो शिताफीने चुकवला.
"१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं!
बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता. त्या आजारातुन बरं होण्यासाठी तुला एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं.तेथून तुला एका डॉक्टरने बाहेर फरार होण्यास मदत केली."
मार्कला आता दम लागला होता.
"पाणी मिळेल?"
हॉल!
लॉझ बनवायची जागा!
अनेक कामगार येथे काम करत. जगातली सगळी सुरक्षा अमेरिका येथे पुरवत होती. १००० सैनिक येथे तैनात होते. अनेक कॅमेरे आणि स्कँनिँग डिवाइसस येथे आपली सेवा पुरवत होते.
तोही येथेच काम करत होता!
"अरे ये, सुट ऑक् घाल, नाहीतर फुकट मरशिल!"
तो फक्त हसला.
आज तो मस्तपैकी काम करत होता.
हा वेडा मरणार एक दिवस."
तो हसला
आणि पुढच्याच क्षणी त्याने लॉझ मधे हात घातला!
मस्तपैकी काम करत होता.
"हा वेडा मरणार एक दिवस
तो हसला.
आणि पुढच्याच क्षणी त्याने लॉझ मधे हात घातला!
रात्र झाली होती.
विसपुते मेन्शन सुद्धा निद्रादेवीच्या आधीन झाला होता.
मात्र एका रूम मधील लाइट अजूनही चालू होती.
"मार्क झोपा आता" अल्डेर म्हणाला.
"अल्डेर १३ वर्षे झाली आता, नाही झोप येत."
"येत नसेल तरीही झोप, कारण विसपुते मेन्शन जागा राहणं जगाला परवडणार नाही."
"विसपूते मेन्शन जागा राहणं जगाला चालेल पण मार्क विसपूते नाही."
"मार्क विसपुतेने जग जिंकलं पण स्वत:ला नाही, अल्डेर."
मार्कचा आवाज कंप पावत होता.
"मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, जग जिंकणं सोपं असतं, पण "स्वतःला जिंकणं अवघड असतं."
कोण ? सिकंदर ?"
*ढिस्क्लेमर*
१. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही.
२. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी).
आमच्या कोल्हापूरात सध्या महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत. माहोल मस्त
रंगलाय.८१ जागा साठी निदान ५००/६००जण रिंगणात आहेत .प्रत्येकाला पुढारी व्हायचंय.
बहुतेकाना ,जनतेचं हीत ,शहराचा विकास ,सोई ,सुविधा मध्ये स्वारस्य नसतं .कांही लाख ते
कोटी च्या,खर्चाच्या तयारीनं ऊमेदवार मैदानात ऊतरतात ते जनतेचा पान्हा फुटलाय म्हणून
नव्हे किंवा पैसा ऊतु चाललाय म्हणूनहि नव्हे,ती असते गुंतवणूक ,थोडं फार प्रकाश झोतात
राहायची हौस आणि जमलंच तर थोडं कामहि करायचं इत्यादी इ . अनेक हेतू मनात धरून केलेली
चळवळ. कोणतीहि स्थानिक संस्था त्याला अपवाद नाही.असो.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की