आमच्या कोल्हापूरात सध्या महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत. माहोल मस्त
रंगलाय.८१ जागा साठी निदान ५००/६००जण रिंगणात आहेत .प्रत्येकाला पुढारी व्हायचंय.
बहुतेकाना ,जनतेचं हीत ,शहराचा विकास ,सोई ,सुविधा मध्ये स्वारस्य नसतं .कांही लाख ते
कोटी च्या,खर्चाच्या तयारीनं ऊमेदवार मैदानात ऊतरतात ते जनतेचा पान्हा फुटलाय म्हणून
नव्हे किंवा पैसा ऊतु चाललाय म्हणूनहि नव्हे,ती असते गुंतवणूक ,थोडं फार प्रकाश झोतात
राहायची हौस आणि जमलंच तर थोडं कामहि करायचं इत्यादी इ . अनेक हेतू मनात धरून केलेली
चळवळ. कोणतीहि स्थानिक संस्था त्याला अपवाद नाही.असो.
मात्र मला आता आठवण आली नि चर्चा करायची आहे ती पुलंच्या "पुढारी पाहिजे"या लोकनाट्याची/वगाचि.
१९५० साली अगदी तरुण वयात सेवा दलाच्या माध्यमातून हा वग "पुलं"नी जनतेसमोर आणला.या वगानं
महाराष्ट्रात धमाल उडवली होती.निळू फुले या वगातुनच नट म्हणून पुढे आले.
बाबुळवाडि एक प्रातिनिधिक खेडेगाव एकदम मागासलेलं असतं,तिथल्या लोकाना वाटतं,
आपल्याला पुढारी नसल्यामुळं ही आपली गत झालेली आहे,म्हणून पुढारी पाहिजे अशी जाहिरात देतात.
त्यानंतर धमाल सुरू होते.एकेक नग ,एक देशभक्त,एक कम्युनिस्ट,एक कवी इ.पुढारी म्हणून येतात.
गावातलाच रोंग्या म्हणून एक इब्लिस पात्र त्यांची कशी टर उडवतो. हे सर्वच गंमतिशिर .त्यावेळच्या तरुणाइनं वग एकदम
डोक्यावर घेतला होता.
रोंग्याचि भूमिका भाव खावून जायची.शाळातून सुद्धा हा वग बसावायचे.अडचण एकच असायची,
प्रत्येकाला रोंग्या व्हायला पाहिजे असायचं.
या वग नाट्याचं पुनर् जीवन व्हावं असं मला वाटतं.
यातील सर्व गाणी गवळणी , पोवाडे एकदम मस्त!
आज ६५वर्षानंतरहि आजच्या काळाला चपखल लागू.
त्यातील पुण्याचा पोवाडा व गावचा पुढारी कसा असावा हाहि पोवाडा एकदम भारी.
रस्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे, या अवतरणाचं जनकत्व या वगाला जातं.
प्रतीक्षा प्रतिक्रियांची!