Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २
त्यानंतर त्याने मला सांगितलं कि तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस. यावर मी ३. ५० लाख गुंतवू शकते कारण मी कोणाकडे मागायला जाऊ शकत नव्हती माझे आई बाबा भारत बाहेर होते आणि मी सासू सासऱ्याकडे मागु कसे? जे काही होत ते मला माझ्या जबाबदारीवर उभं कराच होत. मी त्याला माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे पण मी बिझनेस साठी टाइम मॅनेज करू शकते असं सांगितलं.