Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३

अबोली२१५'s picture
अबोली२१५ in जनातलं, मनातलं
10 Dec 2016 - 1:00 pm

मोदींची घोषणा केली आणि इकडे मी लोन कस करायचं याचाच विचार करत होती.

मी ऑफिस मध्ये काय कारण द्याच आणि कि जेणे करून मला ऑफिस मधून लोनसाठी आवश्यक पेपर देतील. मी एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलली या दरम्यान माझा नवरा घरी आला होता आणि मी त्याला या मीटिंग बद्दल सांगितलं. पहिले त्याने मला सांगितलं कि यापेक्षा तू स्वतःच चालू कर या ३. ५०लाखात तुझ स्वतःच आस्सेट्स असतील ज्या तुला दिसतील कॉम्पुटर खुर्ची टेबले वैगरे आणि जर तुझा व्यवसाय बंद झाला तर तू हे सगळं विकून काही प्रमाणात पैसे परत मिळवू शकतेस, पण ज्या गोष्टी दिसणार नाहीत त्यावर मी कसा विश्वास ठेऊ... बरोबरच होत त्याच पण मला करायचच होतच. आणि मी माऊच्या FD बद्दल बोली तेव्हा तर तो तय्यारच झाला नाही. पण मी या लोनची जबाबदारी मी घेईन आणि जसे पैसे मिळतील तशी मी पहिले माऊ ची FD सोडावेन या एका अटीवर तो तयार झाला.

माझ्या नवऱ्याने बँकमध्ये लोन विषयी विचारणा केली तेव्हा लोन साठी ऑफिस मधून फॉर्म १६ लागतो. मी ऑफिसमध्ये विचारलं तर माझी इनकम वर्षाकाठी २००००० पेक्षा कमी असल्यामुळे मला फॉर्म १६ मिळणार नव्हता त्याबदल्यात मला salary certificate देणार होते. मी खोट कारणच एवढे मजबूत दिल होत कि या गोष्टी मला पटकन मिळाल्या. पण बँकमध्ये salary certificate एव्हडं पुरेसा नव्हतं त्यात माझ्या salary slip पण हव्या होत्या. मग त्यासाठी धावपळ चालू झाली.

यात माझी मैत्रीण दर दोन दिवसानी फोन करून तुझ्या पैशाचं काय झालं कुठं पर्यंत आपल्याकडे खूप वेळ कमी आहे असं बोलून माझ्यावर सतत दडपण आणत होती. सगळी दुनिया रोजच्या व्यवहार कसे करायचे या चिंतेत होती आणि मी पैसे कसे जमवता येतील या विवंचनेत होती. एका संध्याकाळी माझ्या मैत्रीण फोन करून परत एकदा दबाव आणत होती मी तिला सांगितलं माझ्या नवऱ्याला Mr. परेशशी बोलायचं आहे कि थाप होती तिला जरा थांबवण्यासाठी पण मी विचार केला जर हि थाप आपण खरी करूया जेणे करून Mr. परेशचा फोन नंबर मिळेल. कारण १ मीटिंगला Mr परेशला भेटली होती तेव्हा तो बोलला कि तो माझ्या जवळच्या गल्लीत राहतो. जर Mr परेशचा फोन मिळाला कि मी डायरेक्ट त्याच्याशीच बोलेन माझे जे काही query होत्या त्या सोडवीन.

मी माझ्या नवऱ्याशी बोलली कि Mr परेशशी तू बोलून घे मग तुला काय वाटत ते मला सांग. दोन दिवस माझ्या मैत्रीणचा नेहमी प्रमाणे फोन आला (नेहमी प्रमाणे बॉस पैसे सब बोलता है ) Mr परेशशी बोलायचं माझ्या नवऱ्याला या वर ती बोलली कि ते खूप बिझी असतात त्यांना वेळ नाही आहे. मी बोलली पैसे हवे आहेत ना मग एव्हडं तर करावं लागेलच दुसऱ्या दिवशी मैत्रीणच्या फोन कॉन्फेरंन्स वरून त्याने फोन केला (त्याचा नंबर मला कधीच मिळणार नव्हता???) मी पण माझ्या नवऱ्याला कॉन्फरन्स वर घेतलं.

माझ्या नवऱ्याने एक एक प्रश्नाची सरबत्ती सुरु केली.
नवरा : तुमचा बिझनीस कसा करता?
Mr परेश : हा एक ऑनलाईन बिझनेस आहे. मी तुमच्या बायकोला समजावलं आहे. तुम्ही पैसे घेऊन २ मीटिंग ला या. मी तेव्हा समजावून सांगेन.
नवरा : हो पण तुम्ही ऑनलाईन प्रमोशन कसे करणार. ई-मेल मधून तुमचा प्रमोशनचा source काय आहे?
Mr परेश : हे एक ऑनलाईन पोर्टल आहे. मी तुमच्या बायकोला बोललो होतो कि तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन या
मी : पण तोच येथे नव्हता.
Mr परेश : मी तुमच्या बायकोला वेळ द्याल जमेल का ?
नवरा : ते ती बरोबर Manage करणार आणि ती करू शकते.
नवरा : तुम्ही ३. ५० लाखात काय देणार ?
Mr परेश : मी तुमच्या बायकोला समजावलं आहे हे बघा मी हे सगळं फोन सांगु शकत नाही. तुम्ही पैसे घेऊन २ मीटिंग ला या. मी तेव्हा समजावून सांगेन

आणि Mr परेशने फोन कट केला
माझ्या नवऱ्याने पण फोन ठेऊन दिला. माझ्या मैत्रिणीने मला परत ५ मिनीटानंतर मला फोन केला आणि मला ओरडायला सुरवात केली. कि तुला तुझ्या नवऱ्याला १ मीटिंगला घेऊन यायला काय झालं. Mr. परेश प्रत्येक वेळ समजावून सांगणार नाही त्यांना तेवढा वेळ नसतो. त्याने तुला जेवढा वेळ दिला एवढा वेळ ते कोणालाच देत नाही. ते तुला खूप वेळ दिलाय पण तू आता पैसेची व्यवस्थाकर नाहीतर हि संधी हातातून निघून जाणार

समाजजीवनमानअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकअनुभवसंदर्भ

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Dec 2016 - 1:29 pm | माम्लेदारचा पन्खा

पुभालटा.....

केवढं दडपण आणत होते हे लोक.हीच स्ट्रॅटेजी वापरत असणार.
पुभाप्र

किसन शिंदे's picture

10 Dec 2016 - 3:52 pm | किसन शिंदे

कितीही जवळचा माणूस असला तरी या परिस्थितीत त्याला हाऽऽड म्हणालो असतो.

अबोली२१५'s picture

10 Dec 2016 - 4:01 pm | अबोली२१५

हा हा हा...

संजय क्षीरसागर's picture

10 Dec 2016 - 4:10 pm | संजय क्षीरसागर

.

पैसा's picture

10 Dec 2016 - 4:13 pm | पैसा

किती नालायक लोक असतात जगात!

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Dec 2016 - 4:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

इंटरेस्टींग...

सध्या एक क्युनेट वाला माझ्या पण मागे आहे. अर्थात त्याने मला अजून कंपनीचे नाव सांगितले नाही. पण तुम्ही आणि तो मित्र दोघेही जे वर्णन करताय त्या वरुन ती हीच कंपनी असावी.

तुम्ही डीटेल लिहा. मगच मी त्या मित्राच्या कॉन्टॅक्टला भेटायला जातो.

मी त्याला आतापर्यंत टाळत होतो, पण आता मी नक्की भेटणार. लै मज्जा येईल.

पैजारबुवा,

सुधांशुनूलकर's picture

10 Dec 2016 - 9:28 pm | सुधांशुनूलकर

नक्की भेटा त्याला.
भेटल्यावर 'पैजारा'नी त्याची पूजा कराल, हे आताच स्पष्ट दिसतंय.

अस्वस्थामा's picture

12 Dec 2016 - 10:38 pm | अस्वस्थामा

मला त्या 'लोणी आहे का?' हार्डवेअर दुकानदाराची आठवण येऊ येऊ हसू येतंय राव. भेट दिल्यास नक्की वृत्तांत टाकणे.. ;)

अमितदादा's picture

10 Dec 2016 - 4:36 pm | अमितदादा

अश्या स्कीम्स येतात, लोक फसतात, स्कीम बंद होते काही काळ जातो आणि परत नवीन रुपात येतात परत लोक फसतात, हे चक्र काही थांबताना दिसत नाही. एक उच्चशिक्षित परिचित ह्याच स्कीम्स मध्ये आहे त्यामुळे अशी लोक शब्दांचे खेळ कसे खेळतात याची जाणीव आहे. क्युनेट च्या business model बद्दल अधिक माहिती इथे उपलब्द आहे.
पुभाप्र

जव्हेरगंज's picture

10 Dec 2016 - 7:10 pm | जव्हेरगंज

येथे शंकेची पाल चुकचुकायला हवी होती. असो.
पुभाप्र.

मी अशा स्किमवाल्याना चक्क भौ करतो..