शेयर बाजार आणि आपण

कमवू's picture
कमवू in जनातलं, मनातलं
16 Aug 2016 - 4:04 pm

नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. निष्कर्ष खालीलप्रमाणे अतिशय धक्कादायक होते.

६७% भारतीय हे इंशुरंसला गुंतवणुक समजतात.

सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही.

रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २% भारतीय निघाले.

म्युचल फंङ मध्ये गुंतवणुक करणारे २२% भारतीय एसआयपी हे एका योजनेच नाव अाहेअस समजतात.

अॅसेट अलोकेशन म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही.

६३% लोक हे म्युचल फंङमध्ये गुंतवणुक केल्यावर म्युचल फंङची पाॅलीसी घेतली अस म्हणतात. ते म्युचल फंङ म्हणजे इंशुरंस मधिलच एक पाॅलीसीसारखा प्रकार अाहे अस समजतात.

टॅॅक्स फ्री हा बाॅंङ ८०c प्रमाणे सवलत देतो अस माननारे ७६% भारतीय अाढळुन आले.

९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात. जे ०८ % लोक निवृत्तीजीवनासाठी तरतुद करतात त्यातील ६१% लोकांनी निवृत्तीसाठी इंशुरंस पाॅलीसीची निवङ केली आहे ज्यात परतावा ४.५% पेक्षाही कमी असतो.

संपुर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करणार्या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी आढळुन आली.

फक्त भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात.जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हाॅस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही.इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे.

भारतात साधारण विमा घेणार्यां ची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले.एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असुन ती ८५ लाख करोङ इतक्या मोठ्या निधीचे व्यवस्थापन पाहते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २४ लाख लोकांना एलआयसी कङुन रोजगार मिळतो. आपल्या गुंतवणुकदारांना ४-५% परतावा देणारी एलआयसी ही भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणारी सर्वात मोठी संस्थागत गुंतवणुकदार आहे .
पोस्टल लाईफ घेणार्यााची संख्या त्या खालोखाल आहे. तिचा परतावा जवळपास ६% इतका आहे.

भारतातील म्युचल फंङ इंङस्ट्री ही चागंली पारदर्शक असुन व सेबी ही उत्तम नियंञक असली तरी भारतातील फक्त ३% लोकच यात गुंतवणुक करतात.म्युचल फंङ वितरकांचा प्रचंङ अभाव याच प्रमुख कारण असुन त्याची संख्या संपुर्ण भारतभरात फक्त १.१० लाख इतकीच आहे. त्यातील फक्त २४००० प्रत्यक्ष काम करताना आढळतात. त्यांची वाढ व्हावी यासाठी बाजाराची नियंञक सेबी कुठलही पाऊल उचलत नाही.शिवाय त्यांना मोकळेपणाने काम करण्याच स्वातंञ नाही. म्युचल फंङ मध्ये एकुण गुंतवणुक ही १४.५ लाख करोङ रु. इतकी आहे.

५४ ईसी बाॅंङ, इंफ्रा बाॅंङ, पीएमएस, काॅर्पोरेट एफङी इ. फायनान्शियल प्राॅङक्टबद्दल फक्त ९% भारतीयांना माहिती आहेत.

भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारापैकी एक असुनही फक्त ४% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात. गेल्या ३७ वर्षात तब्बल १५.६८% इतका परतावा सातत्याने देवुनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात . भारतातील लोकांपेक्षा परदेशी गुंतवणुकदार येथे जास्त प्रमाणात गुंतवणुक करताना आढळतात. शेअरबाजारात गुंतवणुक ही संस्कृती रुजवण्यात सरकार व नियंञक सेबी सपशेल अपयशी ठरले आहेत अस मत सर्वे करणार्याअ तज्ञांनी माङंले.

गुंतवणूकमाहिती

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

16 Aug 2016 - 4:17 pm | कलंत्री

माहिती छानच आणि उद्बोधक आहे.
शेअर्स बाजाराचा मूळ नियम आहे की खरेदी करतांनाच विकण्याचा विचार करा हे आपल्या पचनी पडत नाही आणि मग एकदा / दोनदा अपयश आले की आपण बाजाराच्या वाटेला जात नाही.

अजूनही भरपूर चागली माहिती आहे
पण ती सगळी इंग्लिश किंवा हिंदी मध्ये आहे
जसे जमेल तसे मराठी मध्ये इथे देत जाईन.

आदूबाळ's picture

16 Aug 2016 - 8:18 pm | आदूबाळ

ढकलपत्र आहे.

ही कोणती संस्था आहे याची माहिती मिळेल का?

कमवू's picture

17 Aug 2016 - 8:48 am | कमवू

हो हे ढकलपत्र आहे.
पण त्यातील मुद्दे हे मला पटले
आणि हि कोणतीही संस्था नसून
काही तज्ज्ञ लोकांचे निरीक्षण आहे जे संक्षिप्त स्वरूपात लिहिले आहे.

नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला.

असं ढकलपत्रात लिहिलेलं आहे. ही कोणती संस्था आहे असं विचारत होतो. १००% पेस्तनकाकाच्या थाटात टक्केवार्‍या हानल्यात म्हणून मला आपलं एक कुतूहल.

ज्ञानव's picture

17 Aug 2016 - 8:56 am | ज्ञानव

ढकल पत्र असले आणि कोणत्याही संस्थेचा नाम निर्देश नसला तरी विचार करण्यास आणि एखाद्या चिकित्सकाला खोलवर चिकित्सा करण्यास वाव आहे. वरील पैकी म्युचुअल फंडाच्या SIP बाबतचा अनुभव पटण्याजोगा आहे. इन्शुरन्स हि पण गुंतवणूक मानणारे बरेच आहेत. सोने केवळ घेऊन ठेवावे ह्या मताचे तर सगळेच भारतीय असण्याची शक्यता आहे. हेजिंग तर दूरच.....

सतिश गावडे's picture

17 Aug 2016 - 9:03 am | सतिश गावडे

ढकलपत्र असो वा नसो, मात्र यातील बर्‍याच मुद्द्यांमध्ये तथ्य आहे.

अर्थ साक्षरता या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित अशा विषयाला तोंड फोडल्याबद्दल आपले अभिनंदन.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे कि आपल्या कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासात "आर्थिक साक्षरता" हा विषय शिकवला जात नाही. यात वाणिज्य अभ्यासक्रमही येतो हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
आपल्या सर्व अभ्यासक्रमात "भरपूर श्रम" करून १०० रुपये कसे मिळवावे हे शिकवले जाते परंतु "कमी श्रमात" १०० रुपयांचे २०० कसे करावे हे कुठलाही अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. आर्थिक साक्षरतेचे हेच "गमक" आहे असे मला वाटते.
दुर्दैवाने अत्यंत हुशार असलेली मुले सुद्धा भरपूर पैसे कमावताना दिसतात परंतु त्यातील बहुसंख्य मुलान्चे आर्थिक व्यवस्थापन हे अतिशय प्राथमिक पातळीचे असल्याचे मी पाहत आलो आहे. केवळ आर्थिक "चणचण" भासली नाही म्हणजे आपण आर्थिक दृष्ट्या सफल झालो असा बऱ्याच लोकांचा (गैर)समज आहे.
गुंतवणूक कशी करावी हि माहिती "औपचारिक रित्या उपलब्ध" फारच कमी ठिकाणी आहे. आर्थिक "अर्ध साक्षर" असे लोक पुष्कळ आहेत. त्यामुळे ते थोडे थोडे पैसे "गुंतवतात." हि स्थिती मुंबईपुण्याची आहे तर बाकी भारताची परिस्थिती फारच वाईट आहे.
"सुविनियोगात समृद्धी" हा मंत्र जपणे आवश्यक आहे.
आपल्या मुलांना आर्थिक साक्षर बनवू या अशी शपथ आपण घेणे आवश्यक आहे.

प्रसाद भागवत's picture

17 Aug 2016 - 10:42 am | प्रसाद भागवत

सहमत

शेअर बाजारा पासुन मध्यमवर्ग / नोकरपेशा वर्ग दुर होता त्याला तसेच कारण होते. एनएससी आणि डीमॅट येण्यापूर्वी ह्या सर्व प्रकारात फसवणुक कमी नव्हती. १९९६-९७ पासुन त्यात पारदर्शिकता येत गेली आणि लोकांचा सहभाग वाढायला लागला.

भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारापैकी एक असुनही फक्त ४% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात.

हे ठीकच आहे कारण लाँगटर्म गुंतवणुक करु शकतील असे लोक भारतात ५-६ टक्केच असण्याची शक्यता आहे. असा ४ टक्क्यांवरुन निष्कर्ष काढणे बरोबर नाही.

ज्ञानव's picture

17 Aug 2016 - 12:30 pm | ज्ञानव

सोने आणि टाटाचे शेअर्स बाळगून असणारे ५% / ६% पेक्षा जास्तच आहेत. सोने हेजिंग साठी कि गुंतवणुकीसाठी कि ट्रेडिंग साठी हा मुद्दा अलाहिदा.

सुबोध खरे's picture

17 Aug 2016 - 12:19 pm | सुबोध खरे

लाँगटर्म गुंतवणुक करु शकतील असे लोक भारतात ५-६ टक्केच असण्याची शक्यता आहे.
हे बरोबर नाही असे वाटते
भारतीय माणसाची मानसिकता बदलायची गरज आहे. भारतीय माणूस सोन्यात किंवा जमिनीत गुंतवणूक(?) करतो आणि आयुष्यभर विकत नाही. त्याची आभासी किंमत वाढत जाते पण त्याचा लाभ माणसाला स्वतः च्या हयातीत अशा मानसिकतेमुळे घेता येत नाही. काही नाही तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (PPF) मध्ये १५ वर्षे लोक गुंतवतातच.

लाँगटर्म गुंतवणुक करु शकतील असे लोक भारतात ५-६ टक्केच असण्याची शक्यता आहे.
हे बरोबर नाही असे वाटते

५-६ टक्के नसेल तर ८% असेल.

सरकारी आकडेवारी नुसार ३३ का ३५% तर गरीबी रेषेच्या खाली. २ कोटी सरकारी कर्मचारी आणि कदाचित ३ कोटी ऑर्गनाइझ्ड सेक्टर मधे नोकरदार असतील. पण त्यातल्या कीती लोकांना खर्च भागवुन पैसे बाजुला काढायला जमत असेल? तसेच बर्‍याच वेळेला ४ लोकांचे कुटुंब असले तरी गुंतवणुक एका च्या नावानेच होणार.

व्यापार करणारे आणि दुकानदार त्यांना कळणार्‍या स्वताच्या धंद्यातच पैसे गुंतवत असतील कारण त्यांना त्यातुन जास्त रीटर्न मिळतील.

ज्ञानव's picture

17 Aug 2016 - 12:27 pm | ज्ञानव

नक्कीच हवी. पासिव्ह इन्कमबद्दलहि कुणीतरी लिहायला हवे. भारतात किती अर्थसाक्षर आहेत पेक्षा मी कितपत अर्थसाक्षर आहे हा महत्वाचा प्रश्न आहे.

आपल्या सर्व अभ्यासक्रमात "भरपूर श्रम" करून १०० रुपये कसे मिळवावे हे शिकवले जाते परंतु "कमी श्रमात" १०० रुपयांचे २०० कसे करावे हे कुठलाही अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. आर्थिक साक्षरतेचे हेच "गमक" आहे असे मला वाटते.

हे शिक्षण योग्यच आहे कारण कमी श्रमातून फक्त शून्यच हाती येतात भरपूर "बौद्धिक श्रम" (प्रचंड वाचन, विश्लेषण, आजूबाजूच्या घटनांबाबतची सजगता) हे शिक्षण आणि श्रम शिकवण्या घेण्याची गरज अधिक आहे.

भारतात किती अर्थसाक्षर आहेत पेक्षा मी कितपत अर्थसाक्षर आहे हा महत्वाचा प्रश्न आहे.

हेच लिहायचे होते. कदाचित भारतात जितकी लोक कमी अर्थसाक्षर असतील तितके मला चांगले असेही होऊ शकते ( वासरात लंगडी गाय शहाणी ह्या न्यायाने )

कमवू's picture

19 Aug 2016 - 5:44 pm | कमवू

तुम्ही ती ओळ कॉपी करून highlight कशी केली.

सेबी कडून शेयर बाजाराबाबत लोकांना साक्षर करण्याचे प्रयन्त जास्त होताना दिसत नाही.

तसेच सेबी चे मागील काही निर्णय पाहता
शेयर मार्केट ट्रेडिंग हे छोट्या ट्रेडर्स साठी कठीण करून ठेवले आहे

माझे असे निरिक्क्शिण आहे कि भारतिय लोकांचि मानसिकता हि मेंढरांसारखि आहे, म्हणजे सर्व जण करतिल तसे
करायचे , स्वतः विचार करायचा नाहि, स्वतः वेगळि वाट शोधायचि नाहि . एखादे माहितिपत्रक सुद्धा वाचायचे कष्ट लोक
घेत नाहित. माझे वडिल अगदि पहिल्या पासुन शेअर बाजारात गुंतवणुक करतात पण त्यांना सगळे ईतके बोलतात.
लेख मुद्देसुद आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

अभिजीत अवलिया's picture

18 Aug 2016 - 2:36 am | अभिजीत अवलिया

छान माहिती.

मयुरा गुप्ते's picture

19 Aug 2016 - 12:15 am | मयुरा गुप्ते

चांगली माहीती सांगितली आहे. खरतरं मी स्वतः वाणीज्यशखेची विद्यार्थिनी असुन(होते) मलाही शेअर बाजारातील ओ का ठो कळत नाही. वरच्या एका प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे "भारतात किती अर्थसाक्षर आहेत पेक्षा मी कितपत अर्थसाक्षर आहे हा महत्वाचा प्रश्न आहे"
आम्हाला ऑफीस तर्फे जे 401K Retirement account मध्ये पैसे गुंतवावे लागतात तेव्हा हा सगळा व्यवहार एखाद्या प्रायव्हेट फाय्नानशीयल संस्थेला दिला जातो. उदा. माझी कंपनी अबक आहे पण माझं 401K Retirement account हे चार्ल्स श्वाब (Charles Shwab) किंवा जे.पी.मॉर्गन किंवा फिडेलिटी अश्यासार्ख्या तत्सम संस्थेकडे असते. म्हणजे माझ्या पगारातुन कापले जाणारे पैसे हे शेअर्बाजारात गुंतवले जातात. म्हणजे उदा. २०% शेअरस व ८०% म्युचअल फंड.
तसं काही भारतीय कंपनी मध्ये होतं का? फायनान्शिय्ल अ‍ॅडव्हाजर असतात का कि जे आपल्या कं. शी बांधिल आहेत व ते योग्य तो सल्ला देउ शकतील?
दोन घटना सांगते....
काहि दिवसांपूर्वी ब्रिटन ने युरोपिअन युनियन मधुन बाहेर पडायचा निर्णय घेतला, त्या दिवशी अपेक्षेप्रमाणे संपूर्ण जगभरातील शेअर बाजार गडबडले..गोंधळले.. त्याच्या २-३ दिवसांत आम्हाला ईमेल आला 'घाबरु नका, काळजी करु नका, गुंतवणुक खरेदी विक्रीचा निर्णय विचारपूर्वक घ्या. व काहिइही प्रश्न असल्यास फायनान्शिय्ल अ‍ॅडव्हाजरला फोन करा. नाही म्हंटल तरी थोडं टेन्शन आलचं होतं पण अज्ञानात्ल आनंद...

येऊ देत अजुन ह्या विषयावरील लेख..

-मयुरा

भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारापैकी एक असुनही फक्त ४% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात.

यात स्त्रीयांचे प्रमाण अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतके.

सुरेन्द्र फातक's picture

15 Sep 2016 - 4:22 pm | सुरेन्द्र फातक

तुम्ही अगदी बबोबर बोललात.. ते बदलण्यासाठी माझी आई गेले ४ वर्ष शेअर मार्केट संबधी ब्लॉग चालवत आहे. त्या ब्लॉग च्या माध्यमातून शेअर मार्केट संबंधीची भीती कमी करून , जास्तीती जास्त मराठी लोकांना आणि स्त्रियांना शेअर मार्केट साक्षर करायचं हा आमचा हेतु

तुम्ही हा ब्लॉग इथे वाचू शकता - https://marketaanimi.com/