Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २

अबोली२१५'s picture
अबोली२१५ in जनातलं, मनातलं
9 Dec 2016 - 5:17 pm

त्यानंतर त्याने मला सांगितलं कि तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस. यावर मी ३. ५० लाख गुंतवू शकते कारण मी कोणाकडे मागायला जाऊ शकत नव्हती माझे आई बाबा भारत बाहेर होते आणि मी सासू सासऱ्याकडे मागु कसे? जे काही होत ते मला माझ्या जबाबदारीवर उभं कराच होत. मी त्याला माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे पण मी बिझनेस साठी टाइम मॅनेज करू शकते असं सांगितलं. त्यावर त्याने बघ हि एक बिझनेस संधी आली आहे तुला बिझनेसमध्ये पैसे गुंतवावे लागतीलच आणि कुठला हि बिझनेस हा गुंतवणूक केल्याशिवाय चालत नाही. (बरोबर आहे पण मी अजूनहि कंपनी नाव विचारलं नाही???)आपण पुढल्या मीटिंगला भेटु तोपर्यंत तु पैशाची व्यवथा कर. असं बोलून Mr. परेश जाधव निघून गेला.

माझी मैत्रीणने मला सांगितलं तुला जे काही कमी पडतील ते तू माझ्या कडून घे. मी तुला पैशाची मदत करेन. मी कॉफे मधून बाहेर येऊन विचार करू लागली एवढे पैसे कसे जमा करू?. मी जॉब वरून लोन करते २लाखच आणि माझ्या मुलीच्या नावावर काही FD आहेत त्यावर मी लोन करते. तर मला कमीत कमी ३. ५० लाख जमा होतील (खूप कठीण होत मला भावनिकदृष्ट्य, माझ्या मुलीच्या भविष्यसाठी जी रकम ठेवली होती त्यावर लोन काढणं) पण जर हे सगळं चांगलं झालं तर मी तिच्या साठी अजून काही तरी चांगलं करेन. मी आई म्हणून तिचा आणि फक्त तिचाच विचार करत होती.

आता यात एक अजून मोठी आणि कठीण गोष्ट होती कि माझ्या नवरयाला समजावून सांगणं आणि माऊच्या (माझी मुलगी) नावावर असलेल्या FD वर लोन काढणं त्यासाठी त्याला तयार कारण खूप किचकट काम होत जे मला करायचं होत. माझा नवरा मुंबईच्या बाहेर होता. नोव्हेंबरच्या १० तारखेला मुंबईत परत येणार होता.

नोव्हेंबरच्या ६ तारखेला मी Mr. परेश जाधव भेटली होती आणि ८ तारखेला ८ वाजता एक आवाजाने आख्या भारताला हादरून सोडलं "मेरे भाई और बेहनो म्हणत ..... मोदीनी नोट बंदीची घोषणा केली.

(क्रमश.)

समाजजीवनमानअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकअनुभवमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

9 Dec 2016 - 5:31 pm | आदूबाळ

मोठे भाग टाका हो जरा.

तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस.

हाच तो क्षण मोहाचा. या रकमेच्या बदल्यात मला नेमकं काय मिळणार आहे हे विचारायचा.

संदीप डांगे's picture

9 Dec 2016 - 5:39 pm | संदीप डांगे

सहमत!

अबोली२१५'s picture

9 Dec 2016 - 5:41 pm | अबोली२१५

धन्यवाद
माझं मिपावर लेखन आणि लिखाण नवीन आहे आणि जे घडलं ते आठवून लिहावं लागतंय
त्यामुळे अतिरंजित किंवा खोटं वाटू नये यासाठी सावकाश आणि छोटे भाग टाकतेय.

पिलीयन रायडर's picture

9 Dec 2016 - 11:15 pm | पिलीयन रायडर

असं काही वाटत नाहीये. अगदी व्यवस्थित लिहीताय. फक्त खरंच मोठे भाग टाका.

जव्हेरगंज's picture

9 Dec 2016 - 5:45 pm | जव्हेरगंज

वाचतो आहे!!!
नेमकं चालू आहे!

कृपया मोठे भाग टाकावे

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Dec 2016 - 1:44 am | डॉ सुहास म्हात्रे

उपयोगी मालिका !

सगळ्याच एमएलएम पासून दुर राहणे शहाणपणाचे आहे.

साहना's picture

10 Dec 2016 - 7:14 am | साहना

कुणीही X गुंतवणूक करून खात्रीशीर पणे Y रक्कम मिळावा अशी स्कीम दिली कि मी नेहमी काउंटर ऑफर देते.

मी X तुम्हाला लोन म्हणून कागदोपत्री करार करून देते तुम्ही मला फक्त १५% ROI द्या. बाकीचे (Y - १५%) तुम्ही ठेवा. "put your money where your mouth is" !

मलाही विचारणा झाली होती पण मी चार हात लांब राहिलो.....त्यांना समजावलंही पण ऐकतंय कोण ?

अति तेथे माती हे लहानपणापासून शिकूनही आचरणात काही आणता येत नाही ही शोकांतिका आहे !

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Dec 2016 - 9:41 am | लॉरी टांगटूंगकर

छान लिहीताय. अजून मोठे भाग टाकणे.

मंजूताई's picture

10 Dec 2016 - 11:30 am | मंजूताई

उत्सुकता वाढलीये ... पुढचे भाग लवकर टाक... आम्ही पण स्टार नावाचं काहीतरी होतं ना त्यात पाच वर्षापुर्वी पाच हजार अक्कल खाती जमा केले... असंच अगदी जवळच्या मैत्रीणीच्या सांगण्यावरुन... दर आठवड्याला एक प्रश्न पत्रिका सोडवावी लागायची... तो सर्व्हे टाईप काहीतरी होतं.. ते प्रकरण टीव्हीवरही दाखवलं होतं ...

पैसा's picture

10 Dec 2016 - 4:15 pm | पैसा

असल्या स्कीम्सना लोक कसे काय फसू शकतात?