नाद ब्रम्ह होई अंगी , चढे चढे भक्तिज्वर
नाद ब्रम्ह होई अंगी
चढे चढे भक्तिज्वर
अरे तोच रे ईश्वर
तोच तोच रे ईश्वर
तुझ्या मायेची सावली
आम्हा सर्व चरावर
देई पर्वत ताकद
जशी दुधात साखर
स्वामी स्वामी राया तुम्ही
तुमच्या पडतो पाया आम्ही
देगा आशीर्वाद आम्हा
तूच स्वामी सर्व ब्रम्हा
उघडा ज्ञान दार सर्वा
तुमच्या सर्वार्थ शक्तीने
घालू अभिषेक आम्ही
आमच्या प्रेमळ भक्तीने
बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ,, स्वामी समर्थाना मनोभावे अर्पण
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}