मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल
पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे.
हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे. विकण्यासाठी नेमके काय करावे, फसवणूक होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, मला यासाठी पुण्यात बरेच दिवस मुक्काम ठोकून रहावे लागेल का, की दिल्लीतून बरेचसे काम आधी करून मग प्रत्यक्ष विक्रीच्या वेळी येणे पुरेसे होईल, मिपाकरांच्या परिचयातील कुणी खात्रीचे एजंट (किंवा प्लॉट घेण्यास इच्छुक लोक) आहेत का ? वगैरे.
आगामी मदतीबद्दल आभार.
प्रतिक्रिया
21 Sep 2018 - 5:21 pm | अथांग आकाश
99 Acres.com या वेबसाईट वर नोंदणी करून तुम्ही हा प्लॉट विकण्याचा प्रयत्न करू शकता.