शेअर मार्केट्मध्ये पैसा कमवायचा असेल तर केव्हा आणि कुठे या दोन प्रश्नांमध्ये सगळी ग्यानबाची मेख असते. मग कॉमनसेन्स वापरून असेही म्हणता येते की अर्थव्यवस्थेला जेव्हा गती मिळते तेव्हा शेअरमार्केट तापायला सुरुवात होते.
सामान्य गुंतवणुकदार "अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी" वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणांच्या गदारोळात गोंधळुन जातो. या विश्लेषणांवर अनेकदा आकडे फुगवल्याचे आरोप केले जातात. साहजिकच सामान्य गुंतवणुकदार निर्णय घेताना वस्तुनिष्ठ आणि सारासार विचार करू शकत नाही.
मोठमोठे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदार जे भाकीत वर्तवतात ते खरे की सरकार करते, ते दावे खरे यात मी नेहेमी आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेले भाष्य आधारभूत मानत असे. जर परका मनुष्य आपल्यावर विश्वास दाखवत असेल तर त्यात तथ्य असले पाहिजे असा त्यात विचार होता.
पण मला माझे स्वत:चे असे गुंतवणुक निर्णय घेण्यास योग्य असे तंत्र विकसित करायचे होते, जेणे करून अर्थव्यवस्थेचे चित्र मी माझ्यापुरते मांडू शकेन.
यासाठी मी "प्योत्रोस्की श्रेणी" या संकल्पनेचा आधार घ्यायचे ठरवले. "प्योत्रोस्की श्रेणी" एखाद्या कंपनीची एखाद्या तिमाहीतील पायाभूत कामगिरी कशी आहे यावर प्रकाश टाकतो. "प्योत्रोस्की श्रेणी" बद्दल अधिक माहिती जालावर मिळेल.
कोणत्याही कंपनीची "प्योत्रोस्की श्रेणी" ० ते ९ आकड्यांमध्ये सांगता येते. ६ ते ९ ही श्रेणी असलेल्या कंपन्या निश्चितपणे चांगल्या मानता येतात. अर्थात ही श्रेणी ४-५ वरून ६ वर आलेली असावी. जर ० किंवा १ वरून ६-७ अशी श्रेणी येत असेल तर काहीतरी निकालात गडबड आहे हे नक्की. पण यासाठी फक्त निफ्टी ५०० किंवा निफ्टी २०० किंवा निफ्टी ५० अशा निर्देशांकातील कंपन्या घेतल्यास निकालात गडबड असायची शक्यता कमी असते.
माझ्या सोईसाठी मी ५ ही "प्योत्रोस्की श्रेणी" न्युट्रल मानली आहे. या श्रेणीतील कंपनी एकतर प्रगती करुन पुढच्या तिमाहीमध्ये वर जाईल किंवा खाली येईल किंवा जिथे आहे तिथे राहील.
० ते ४ या श्रेणीमधील कंपन्या बेभरवशाच्या किंवा धोकादायक ठरतात.
यानंतर मी प्रत्येक "प्योत्रोस्की श्रेणी" मध्ये किती कंपन्या येतात याचा आलेख निफ्टी २०० आणि निफ्टी ५०० मधल्या प्रत्येकी २०० आणि ५०० कंपन्यांसाठी काढला. तो आलेख असा दिसतो -
निफ्टी २००
निफ्टी ५००
या आलेखावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी की चांगली कामगिरी करणा-या कंपन्यांची संख्या वाईट कामगिरी करणा-या कंपन्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ इतकाच की अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे आणि देशाचे भविष्य नजिकच्या काळात उज्ज्वल आहे.
प्रतिक्रिया
24 Feb 2019 - 6:07 pm | गोंधळी
बाजाराची दिशा ही Demand Supply नाही तर ओपरेटर ठरवतात हे खर आहे का?
24 Feb 2019 - 7:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
माहितीपूर्ण रे युयुत्सू. पण शेयर बाजाराच्या चढ-उताराचा व अर्थव्यवस्थेचा काही संबंध नसतो असे म्हंटले जाते. असो.
अॅल्गोरिथ्मिक ट्रेडिंग हा एक नविन प्रकार ऐकला आहे. ह्यात विविध प्रकारच्या स्ट्रॅटिजीज वापरल्या जातात. त्यावरही माहिती दिलीस तर उत्तम.
25 Feb 2019 - 2:08 pm | युयुत्सु
अॅल्गोरिथ्मिक ट्रेडिंग हा एक नविन प्रकार ऐकला आहे
हा विषय मराठीत समजवायला अवघड आहे.
25 Feb 2019 - 2:25 pm | अनिंद्य
नवीन माहिती - प्योत्रोस्की श्रेणी. मला BETA आणि Z स्कोरच माहित होते :-)
अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे आणि देशाचे भविष्य नजिकच्या काळात उज्ज्वल आहे. - तथास्तु !
25 Feb 2019 - 3:21 pm | राजेंद्र मेहेंदळे
अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे आणि देशाचे भवितव्य उज्वल आहे?
काही झेपले नाही.
१. तुमच्या आलेखात जास्त कंपन्या ५-६ च्या रेंजमध्ये आहेत पण त्यामानाने १-४ रेंजमध्ये कमी आहेत म्हणुन गती घेतली आहे म्हणायचे का?
२. लोकसभा निवडणुकांचे निकाल, पाकिस्तान विरुद्ध संभाव्य युद्ध , चीनचा वाढता (युद्ध आणि आर्थिक) प्रभाव यावर बाजाराची प्रतिक्रिया कशी असेल हे प्योत्रोस्की सांगु शकेल का? की फक्त भूतकाळातील परफॉर्म्न्स आणि भविष्यातील संधीवरच गणित बांधले आहे?
25 Feb 2019 - 4:17 pm | युयुत्सु
पण त्यामानाने १-४ रेंजमध्ये कमी आहेत म्हणुन गती घेतली आहे म्हणायचे का?
अगोदर एक लक्षात घ्यावे की प्योत्रोस्की श्रेणी कोणतेही भाकित करत नाही तर कंपनीचा पाया सध्या किती भक्कम आहे यावर प्रकाश टाकते. भक्कम पाया उत्तम व्यवस्थापनाचे एक चिन्ह आहे. भक्कम पायामुळे वादळाला तोंड द्यायची क्षमता येते. जर पाया भक्कम असलेल्या कंपन्यांची संख्या जर जास्त तर ते एक सुचिन्ह मानायला हवे (कमीत कमी मी तरी मानेन). अर्थव्यवस्थेची गती, व्यवस्थापनाचा दर्जा यामुळे कंपनीची कामगिरी उत्तम होते आणि पाया मजबूत राहतो. तुम्ही म्हणता ती वादळे येतात आणि जातात...
25 Feb 2019 - 5:57 pm | राजेंद्र मेहेंदळे
एक उदाहरण घेउ
एक ऑटोमोबाईल कंपनी आहे, प्योत्रोस्की प्रमाणे आत्ता तिचा पाया भक्कम आणि व्यवस्थापन उत्तम आहे. पण अचानक भारत पाक युद्ध सुरु झाले आणि वाहनांची मागणी घटली किवा आखातात अमेरिकेच्या निर्णयामुळे किवा अशाच काही कारणाने तेलाच्या किमती भडकल्या म्हणुन वाहनांची मागणी घटली तर ती (आणि ईतर ऑटो/ बॅटरी/टायर्/ इंजिन कंपन्या) कंपनी ५-६ कॅटेगरीमधुन २-३ मध्ये जाउ शकेल. एक सेक्टर कोसळला कि मग अर्थव्यवस्थेची गती कशी टिकणार?
मग ह्या कारणांना तत्कालिक वादळे कसे म्हणायचे?
25 Feb 2019 - 8:27 pm | युयुत्सु
अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये कंपन्यांची कामगिरी खराब होणार. पण समस्येपूर्वी पाया चांगला असेल तर परिस्थिती बदलल्यावर असे शेअर उसळी मारतात. इतकेच नव्हे तर तुम्ही म्हणता तसे युध्द संपल्यावर बाजाराला तेजी येते, असे वाचले आहे.
25 Feb 2019 - 6:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"० ते ४ या श्रेणीमधील कंपन्या बेभरवशाच्या किंवा धोकादायक ठरतात."
एस.बी.आय. चा प्योत्रोस्की स्कोर १
आय.सी.आय.सी.आय. चा प्योत्रोस्की स्कोर ३
येस बँकेचा प्योत्रोस्की स्कोर २
एच.डी.एफ.सीचा प्योत्रोस्की स्कोर ४
बँकांची स्थिती हालाखीची आहे हे सर्व्श्रुत आहे... प्योत्रोस्की स्कोरने ते अधोरेखीत झाले.. असे आमचे मत.
https://trendlyne.com/stock-screeners/fundamentals/PITROSKI_F/piotroski-...
26 Feb 2019 - 7:17 am | चामुंडराय
>>>> प्योत्रोस्की स्कोरने ते अधोरेखीत झाले.. असे आमचे मत.
माईसाहेब,
संभाळयो, बेअरिंग सुटते आहे.
प्योत्रोस्की स्कोरने ते अधोरेखीत झाले.. असे आमच्या ह्यांचे मत, असे हवे !!
25 Feb 2019 - 10:35 pm | शब्दानुज
छान. अशीच एक लेखमाला होवून जाऊ दे. जरा विस्तारित करता आली तर पहावी.
26 Feb 2019 - 6:40 am | कंजूस
१) देशपरत्वे स्थिती बदलेल. लेखात ते नक्की करा कोणता देश ते.
२) रामेंचा मुद्दा >>भूतकाळातील परफॉर्म्न्स आणि भविष्यातील संधीवरच गणित बांधले आहे?>>हा सुद्धा पाहा.
३) चानेल्सवर दोन्ही प्रकारच्या चर्चा होत असतात.
४) भूतकाळावर /भविष्यावर आधारित ?