शेअर मार्केट्मध्ये पैसा कमवायचा असेल तर केव्हा आणि कुठे या दोन प्रश्नांमध्ये सगळी ग्यानबाची मेख असते. मग कॉमनसेन्स वापरून असेही म्हणता येते की अर्थव्यवस्थेला जेव्हा गती मिळते तेव्हा शेअरमार्केट तापायला सुरुवात होते.
सामान्य गुंतवणुकदार "अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी" वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणांच्या गदारोळात गोंधळुन जातो. या विश्लेषणांवर अनेकदा आकडे फुगवल्याचे आरोप केले जातात. साहजिकच सामान्य गुंतवणुकदार निर्णय घेताना वस्तुनिष्ठ आणि सारासार विचार करू शकत नाही.
मोठमोठे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदार जे भाकीत वर्तवतात ते खरे की सरकार करते, ते दावे खरे यात मी नेहेमी आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेले भाष्य आधारभूत मानत असे. जर परका मनुष्य आपल्यावर विश्वास दाखवत असेल तर त्यात तथ्य असले पाहिजे असा त्यात विचार होता.
पण मला माझे स्वत:चे असे गुंतवणुक निर्णय घेण्यास योग्य असे तंत्र विकसित करायचे होते, जेणे करून अर्थव्यवस्थेचे चित्र मी माझ्यापुरते मांडू शकेन.
यासाठी मी "प्योत्रोस्की श्रेणी" या संकल्पनेचा आधार घ्यायचे ठरवले. "प्योत्रोस्की श्रेणी" एखाद्या कंपनीची एखाद्या तिमाहीतील पायाभूत कामगिरी कशी आहे यावर प्रकाश टाकतो. "प्योत्रोस्की श्रेणी" बद्दल अधिक माहिती जालावर मिळेल.
कोणत्याही कंपनीची "प्योत्रोस्की श्रेणी" ० ते ९ आकड्यांमध्ये सांगता येते. ६ ते ९ ही श्रेणी असलेल्या कंपन्या निश्चितपणे चांगल्या मानता येतात. अर्थात ही श्रेणी ४-५ वरून ६ वर आलेली असावी. जर ० किंवा १ वरून ६-७ अशी श्रेणी येत असेल तर काहीतरी निकालात गडबड आहे हे नक्की. पण यासाठी फक्त निफ्टी ५०० किंवा निफ्टी २०० किंवा निफ्टी ५० अशा निर्देशांकातील कंपन्या घेतल्यास निकालात गडबड असायची शक्यता कमी असते.
माझ्या सोईसाठी मी ५ ही "प्योत्रोस्की श्रेणी" न्युट्रल मानली आहे. या श्रेणीतील कंपनी एकतर प्रगती करुन पुढच्या तिमाहीमध्ये वर जाईल किंवा खाली येईल किंवा जिथे आहे तिथे राहील.
० ते ४ या श्रेणीमधील कंपन्या बेभरवशाच्या किंवा धोकादायक ठरतात.
यानंतर मी प्रत्येक "प्योत्रोस्की श्रेणी" मध्ये किती कंपन्या येतात याचा आलेख निफ्टी २०० आणि निफ्टी ५०० मधल्या प्रत्येकी २०० आणि ५०० कंपन्यांसाठी काढला. तो आलेख असा दिसतो -
निफ्टी २००
निफ्टी ५००
या आलेखावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी की चांगली कामगिरी करणा-या कंपन्यांची संख्या वाईट कामगिरी करणा-या कंपन्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ इतकाच की अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे आणि देशाचे भविष्य नजिकच्या काळात उज्ज्वल आहे.
निफ्टी ५००
या आलेखावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी की चांगली कामगिरी करणा-या कंपन्यांची संख्या वाईट कामगिरी करणा-या कंपन्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ इतकाच की अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे आणि देशाचे भविष्य नजिकच्या काळात उज्ज्वल आहे. | लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11402
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाजाराची दिशा
हम्म
अॅल्गोरिथ्मिक ट्रेडिंग हा एक
नवीन माहिती - प्योत्रोस्की
गती घेतली आहे?
पण त्यामानाने १-४ रेंजमध्ये
In reply to गती घेतली आहे? by राजेंद्र मेहेंदळे
तरीही एक मुद्दा
In reply to पण त्यामानाने १-४ रेंजमध्ये by युयुत्सु
अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये
In reply to तरीही एक मुद्दा by राजेंद्र मेहेंदळे
वाचत आहोत
असे आमच्या ह्यांचे मत, असे हवे !!
In reply to वाचत आहोत by माईसाहेब कुरसूंदीकर
.
१) देशपरत्वे स्थिती बदलेल.