मोस्ट एलिजिबल बॅचलर...2016

जयू कर्णिक's picture
जयू कर्णिक in जनातलं, मनातलं
29 Oct 2016 - 9:16 am

मोबाइलची बेल वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, ‘०२२’ आणि पहिले चार डिजिट… अरे हा तर ‘बॉंबे हाऊस’ मधून आलेला, म्हणजे टाटा मोटर्स मधील कुणा मित्राचा फोन असणार.
‘हॅलो…’
आता कुणा मित्राचा परिचित आवाज कानावर पडणार म्हणून आनंद झाला.
‘हॅलो, इझ जयंथ कार्निक देअर?’ – जयंत कर्णिक ची एवढी वाट लावली म्हणजे मित्रांपैकी कोणीच नाही. बरं एकही मैत्रीण असं करायला धजावणार नाही, कारण अगदी दाक्षिणात्य मित्र-मैत्रिणींना मराठीत ‘त’ आणि ‘थ’ हे वेगळे असतात हे सांगून झालेलं, तर अन्यभाषिक लोकांच्या जीभेला ‘ळ’ आणि ‘ण’ म्हणायचं वळण नसलं तरी मराठी माण्सानं इंग्रजीत बोलताना ‘माळी’ चं ‘मिस्टर माली’ करणं म्हणजे माझ्या लेखी अक्षम्य गुन्हा आहे हेही माझ्या सहकारी मित्रांना चांगलंच ठाऊक होतं.
‘या, जयंत कर्णिक स्पीकिंग’
‘प्लीज स्पीक हिअर’, तिने गूढ कायम ठेवलं.
‘हॅलो…’ आवाजात विलक्षण मार्दव होतं. तरी मला काही तो ओळखू आला नाही.
‘हॅलो, गुड मॉर्निंग’, मधे एक छोटा पॉझ, ‘रतन टाटा हिअर’, मी ताडकन उडालोच. मग वाटलं हे आमच्या अल्बर्टचं, ऑपरेटर रेवती – सॉरी रेवथीच्या मदतीनं केलेलं कारस्थान असावं. मी संभाषण चालू ठेवून अंदाज घेण्याचं ठरवलं.
‘हॅलो, हॅलो…..आर यू देअर?’ माझ्या गोंधळण्याचा पलीकडील व्यक्तीला अंदाज आला असावा. आता मात्र हा आवाज अल्बर्टनी काढलेला वाटला नाही. तरीपण खुद्द रतन टाटा आपल्याला फोन करतील अशी कोणतीच पुण्याई मी माझ्या टेल्कोच्या कारकीर्दीत केलेली नव्हती. नाही म्हणायला माझी अन् त्यांची एक ओझरती भेट झाली होती, पण त्या गोष्टीला आता पुरतं दीड तप लोटलं होतं.
‘यस् सर’, न जाणो खरंच रतन टाटा असतील तर, आपण बॅकफूटवर जाऊन संरक्षणात्मक पवित्रा घेतलेला बरा, असा मी विचार केला. अन् तो निर्णय फारच योग्य ठरला कारण पुढचे सर्व चेंडू, ब्लॉक होलमध्ये, यॉर्कर लेंथचेच असणार होते. पलीकडे खुद्द रतन टाटाच होते.
‘व्हेअर आर यू?’
‘मी माझ्या नेटिव्ह प्लेसला, यवतमाळला’, खरं तर हे सर्व त्यांना चांगलंच ठाऊक असणार. कारण हे लोक पूर्ण तयारीशिवाय तोंडातून ‘ब्र’ सुद्धा काडत नाहीत. त्या दीड तपापूर्वीच्या भेटीचा मला चांगलाच अनुभव होता. त्यांच्या केबिनमध्ये शिरण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती. त्यांच्या पहिल्या वाक्याला मला ते लक्षात आलं होतं हे त्यावेळेस बरंच झालं, कारण त्यापुढचं वाक्य न् वाक्य कसलं अक्षर न् अक्षर मी अतिशय तोलून मापून बोललो होतो. त्याचा मला फायदाच झाला. एरव्ही अघळ-पघळ बोलणाऱ्या मला तो एक चांगलाच पाठ होता. पण तो तेव्हढ्यापुरताच. पुढे आम्ही सुधरलो नाही ते नाहीच. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पण आता तसं करून चालणार नव्हतं. माझी औपचारिक चौकशी, म्हणजे संभाषणात मोकळेपणा आणण्याचा तो एक प्रयत्न असावा.
‘आय मीन व्हॉट आर यू डूईंग?’, अशा मोठमोठ्या व्यक्तींचं अजून एक असतं. त्यांनी काय विचारलं यापेक्षा त्यांना काय विचारायचं आहे हे तुम्ही ओळखायचं असतं. मला हे लक्षात यायला हवं होतं पण हल्ली सवय नसल्यामुळे रिफ्लेक्सेस जरा कमी झालेत.
‘काही नाही, थोडं फार लिखाण, अनुवाद, फोटोग्राफी वगैरे…’
(ह्यापुढचं सर्व संभाषण अनुवाद करून मराठीतच देतो. कारण मराठी भाषेची अशी तोहीन करणं काही बरोबर नाही.)
‘पण तू इतक्या लवकर सेवानिवृत्ती घेतली हे काही बरं केलं नाहीस’
‘म्हणजे, मी समजलो नाही.’
‘सेवानिवृत्तीची योजना तुझ्यासारख्या चाळीशीतल्या लोकांसाठी नव्हतीच मुळी’
‘खरं आहे सर, पण तो निर्णय सर्वस्वी माझा होता, मला कोणी जबरदस्ती केली नाही.’
‘पण तू माझ्यासारखंच टाटा उद्योग समूहातून निवृत्त होऊनही निवृत्त होऊ शकत नाहीस !’
‘ते कसं काय?’
‘हे बघ, इतकी वर्षे तू टाटा परिवाराचा सदस्य होता. 'होता' म्हणणं तसं चुकीचं होईल. कारण टाटा घराण्याचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर टाटा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही. उलट आता तर ह्या सर्व व्यापातून मुक्त झाल्यामुळे त्या संस्काराचं उदात्तीकरण झालं असावं असं तुझ्या एकंदरीत टेल्को नंतरच्या उर्वरित आयुष्यातील आत्तापर्यंतच्या जीवनशैलीमुळे मला वाटतंय.'
‘अरे, पुन्हा कुठे हरवलास? मी खरंच रतन टाटा बोलतोय. विश्वास बसत नसेल तर एक काम कर. स्काईप वर ये. मी वेब कॅम लावतो. तू ही लाव. ओ. के.’, पलीकडून फोन कटही झाला. मी विचार केला कुणीतरी आपली खेचतंय असं दिसतंय तर हरकत नाही आपणही जरा मजा घ्यावी. गंमत म्हणून चॅटिगलाही बसलो. मनात आलं, आजकाल हॅकर्सचीही कमी नाही, किंवा डमी अकाउंट उघडणंही काही अवघड नाही.
चॅटिंग सुरुही झालं. ते आधीच तिथे हजर होते. वेबकॅम सुरू झाल्यावर मात्र मी चपापलो. समोर खरंच रतन टाटा दिसत होते. केबिन ही त्यांचीच होती. मागच्या भिंतीवर लावलेलं जे. आर. डीं. चं तैलचित्र आणि इतर अनेक गोष्टी अगदी बहुतेक सर्व तशाच होत्या.
त्यांचंही माझ्या घराचं निरीक्षण चालू असावं. ते बोलले, ‘जयंत, तुझं घर खूप जुनं, पण छान दिसतंय.’ ह्या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य, जवळीक साधण्यासाठी एकेरी संबोधणं आणि दुसऱ्याच्या राहणीचा आदर करणं.
‘हो, नव्वद वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बांधलेलं आहे.’ संवाद पुन्हा चालू झाला, माझं चाचपडणंही.
‘तुला आठवतंय, मागे काही वर्षांपूर्वीसुद्धा माझ्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु झाली होती. त्या वेळेस तू बॉंबे हाऊसला होतास. तेंव्हा गंमतीने तू तुझ्या शेजारच्या चैत्रालीला काय सांगत होता – आय अ‍ॅम दी मोस्ट एलिजीबल बॅचलर इन धीस कंपनी अ‍ॅझ सक्सेसर....आणि ते तिथून जातांना नेमके माझ्या कानावर पडलं होतं.’ हसत हसत ते म्हणाले. मला आता परत ते रतन टाटा असल्याची पुसटशी शक्यता वाटू लागली. कारण हा प्रसंग तंतोतंत खरा होता. मी हे वाक्य बोलायला आणि रतन टाटा माझ्या टेबलावर टिचकी मारून पुढे अलेक्झांडरच्या केबिनकडे गेले होते हे चैत्रालीने मला त्या वेळेस सांगितलं होतं, माझी पाठ असल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नव्हतं आणि माझी त्यावेळेस चांगलीच तंतरली होती हे मला चांगलंच आठवतं. हे मला, चैत्रालीला आणि ऐकू आलं असेल तर खुद्द रतन टाटांनाच माहित असणार होतं. ह्याचा अर्थ त्यांनी ते नुसतंच ऐकलं नव्हतें तर लक्षातही ठेवलं होतं. मला पुन्हा एकदा घाम फुटला.
‘सर, रिअली व्हेरी सॉरी, ते सहजच गंमतीने बोललो होतो.’
‘पण मला आज त्यात तथ्य वाटतंय’
‘सर, काहीतरीच काय, मी साधा डी.एम.ई., अतिसामान्य माणूस !’
‘कां बी. कॉम्. अ‍ॅडव्हांसड् बॅंकिंगचं काय?’
‘सर, ते तर मी पास क्लासमध्ये पास झालो होतो.’
‘पण त्याच क्वॉलिफिकेशनवर तू मटेरिअल्समध्ये सिलेक्ट झाला होता ना?’
‘सर, मला वाटतं मी बॅचलर होतो, मी मुंबईत राहायला जागा मागणार नाही हे एच. आर.च्या दृष्टीने माझं सगळ्यात जास्त क्वॉलिफिकेशन होतं.’
‘देअर यू आर!’
‘? ? ? ? ? ‘ माझ्या कपाळाच्या आठ्यांमधून डोकावणारे प्रश्नचिन्ह त्यांना स्पष्टपणे दिसत असावं.
‘बॅचलर असणं तर सगळ्यात मोठं क्वॉलिफिकेशन आहे.’
‘ते कसं काय?’
‘ हे मी तुला सांगायला हवं? आत्ता तूच तर म्हणाला तसं! ते तर तुझं अ‍ॅसेट आहे. त्याचं असं आहे, बॅचलर लोकांना प्रापंचिक व्याप नसतात. ह्याचा अर्थ ते कुटुंबवत्सल नसतात असा मुळीच नाही. माझ्या मते ते उलट जास्त प्रेमळपणे ही जबाबदारी पार पाडू शकतात. कारण त्यांची कुटुंबाची कल्पनाच मुळी व्यापक असते. तो फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित विचार करतच नाही. कंपनी, सर्व उद्योगसमूह, राज्य, देश, संपूर्ण जगच त्याचं कुटुंब होतं. एकटे असल्यामुळे काहीसे भावनाप्रधान असले तेरी महत्वाचे निर्णय घेतांना ते पुरेसे व्यावहारिक राहू शकतात. पंतप्रधान, राष्ट्रपती कुठलंही पद ते भूषवू देत, त्यांचा विश्वव्यापक दृष्टिकोन त्त्यांना सर्वसमावेशक, परिपक्व व योग्य तो निर्णय घ्यायला मदतच करतो.’
माझ्या दृष्टीने हे सर्व अकल्पित होतं. ह्या सर्व विचारांमध्ये तथ्य होतंच, पण ते माझ्या मते वैयक्तिक पातळीवर ठीक आहे, पण रतन टाटांसारखी व्यक्ती असं म्हणते म्हणल्यावर मी जरा अचंबित झालो. माझा संभ्रम त्यांनी वाचला असावा.
‘काय झालं? कुठे हरवलास?’ त्यांनी मला पुन्हा संभाषणात ओढलं.
‘कुठे काय? काही नाही!’ काही तरी उत्तर द्यायला हवे म्हणून मी बोललो.
‘हे सर्व मी तुला का सांगतोय असं तुला वाटत असेल नाही?’, हे खरंच होतं तरी मी गप्पच होतो.
‘तुला आठवतं, आपली पहिली भेट?’, खरं तर मी ती भेट विसरणं कसं शक्य होतं?
‘थिंक कस्टमर ट्रेनिंग प्रोग्राम विषयी तू तुझं धाडसी मत नोंदवलं होतंस आणि त्यामुळेच आपली भेट झाली होती. थिंक कस्टमर, इंटर ह्युमन रिलेशनशिप, ती जशी व्यक्तीसापेक्ष तसेच डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट, डिव्हीजन टू डिव्हीजन ते प्रोग्राम्स कसे वेगवेगळ्या पद्धतीने, विविध विचारांची सांगड घालून करायला हवेत असं बरंच काही तू अहमहमिकेनं बोलला होतास आणि तसे बदल मी एच. आर.ला अंमलात आणायलाही सांगितले होते, ते मला पक्कं आठवतंय. तुझ्यातील स्पार्क तेव्हांच दिसला होता. तू दिलेली दोन्ही ग्रीटींग्ज, महाराष्ट्रभूषण मिळालं तेव्हांचं तर खासच होतं. आणि जयंत, माझ्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला तू पाठवलेलं ग्रीटींग कार्ड तर अप्रतिमच होतं. तुला हे सर्व कसं सुचतं ह्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. निवृत्तीबद्दलचे त्यातले तुझे भाष्य अतिशय सुरेख आणि प्रोत्साहित करणारे आहे. ती अजूनही माझ्या संग्रही आहेत.’ ते हे सर्व मला का सांगत होते हे मला थोडं कळेनासं झालं.
'आणि आताही तसं बघितलं तर तुझं सामाजिक जाणिवांविषयीचं भान, निसर्ग, पर्यावरणाविषयाची आस्था, नैसर्गिक स्रोतांविषयी असणारी चिंता हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा टाटा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. असं वारकऱ्यासारखं समाधानी, समृद्ध आणि समर्पक आयुष्य जगणाऱ्या सल्लागारांची गरज टाटा समूहाला नेहमीच भासत राहणार!', ते बोलताच होते, मी ऐकत होतो.
‘जयंतराव पुन्हा हरवलात की काय? पटताहेत का माझे विचार? मला माहित आहे तुझ्या मनात काय चाललंय ते. सध्या जो काय गदारोळ चाललाय त्यात मी तुला कां फोन करतोय असंच ना? काही हरकत नाही. जे चाललंय त्याकडे तूर्तास आपण दुर्लक्ष करूयात. ते कसं हॅन्डल करायचं हे मला पुरतं ठाऊक आहे. आता मला टाटा समूहाचा भविष्यकाळ खुणावतोय. तेंव्हा माझी अशी इच्छा आहे की टाटा समूहाची धुरा कोणीही वाहो, तुझ्यासारखे काही हितचिंतक जर आमच्याबरोबर असले तर टाटा समूहाचा झेंडा आपण कायम अटकेपार रोवत राहू, ह्याची मला खात्री आहे.
वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन, लॉर्ड कुमार भट्टाचार्य आणि मी स्वतः योग्य त्या अध्यक्षांची निवड लवकरच करूच, पण तुझ्यासारख्या हितचिंतकांची आम्हाला नेहमीच गरज भासेल तेंव्हा तू उपलब्ध असशील अशी आशा व्यक्त करतो.
अरे हो जयंत, तू नुकत्याच बनविलेल्या पाणी, स्वच्छता अभियान आणि नेत्रदान ह्या विषयांवरचे लघुपट मी आवर्जून बघितले. तुझी प्रगल्भता आणि परिपक्वता त्यातून दिसते. टाटा समूहासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो. भेटतोयस नं मग ! कधी येतो भेटायला ? बॉम्बे हाऊसला नको, घरीच ये भेटायला !’

मी मनातल्या मनात म्हणालॊ, ‘कसंचं कसंचं...!!!’

...... गजर लावूनही न उठण्याबद्दल आई माझ्या नावानं शंख करत होती .......!!!!!!

# # # # #

कथाविचार

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 9:53 am | यशोधरा

हत तेरे की!

जयू कर्णिक's picture

30 Oct 2016 - 8:17 pm | जयू कर्णिक

धन्यवाद...

खेडूत's picture

29 Oct 2016 - 10:34 am | खेडूत

:)
पण त्या निमित्ताने साहेबांना पहिल्यांदा ( खरे ) पाहिले- ऐकले तो प्रसंग आठवला!

जयू कर्णिक's picture

30 Oct 2016 - 8:18 pm | जयू कर्णिक

धन्यवाद

अजया's picture

29 Oct 2016 - 11:09 am | अजया

:)

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2016 - 12:42 pm | टवाळ कार्टा

भारी

जयू कर्णिक's picture

30 Oct 2016 - 8:19 pm | जयू कर्णिक

धन्यवाद

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2016 - 1:08 pm | बोका-ए-आझम

अगदी शेवटच्या पंचपर्यंत!

जयू कर्णिक's picture

30 Oct 2016 - 8:20 pm | जयू कर्णिक

धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

29 Oct 2016 - 1:16 pm | चौथा कोनाडा

मस्त, खुसखुशीत, ओघवते !
मस्तच लिहिलंय ! प्रसंग तंतोतंत डोळ्यासमोर उभे राहिले.
सायरस मेस्त्री प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर वाचताना मजा आली !

पुढील भागाच्या (स्वप्नरंजनाच्या) प्रतिक्षेत !

जयू कर्णिक's picture

30 Oct 2016 - 8:23 pm | जयू कर्णिक

धन्यवाद, प्रोत्साहित केलय, लिहिण्याचा उत्साह वाढेल त्यामुळे...

एस's picture

29 Oct 2016 - 1:40 pm | एस

:-)

पैसा's picture

29 Oct 2016 - 2:24 pm | पैसा

:)

पाटीलभाऊ's picture

29 Oct 2016 - 3:33 pm | पाटीलभाऊ

छान लिहिलय

बॅटमॅन's picture

29 Oct 2016 - 4:16 pm | बॅटमॅन

के एल पी डी झाला की राव. पण तरी छानच.

नाखु's picture

31 Oct 2016 - 11:53 am | नाखु

होय सहमत आहे, पण जबरा आहे हे नक्की.,

जयू कर्णिक's picture

31 Oct 2016 - 7:17 pm | जयू कर्णिक

नाखु "नाखुष" झाले नाही म्हणजे भरुन पावलो नाही कां !!!

धन्यवाद....

विनायकपाटील८९'s picture

30 Oct 2016 - 12:46 am | विनायकपाटील८९

छान... अजून लिहा...

जयू कर्णिक's picture

31 Oct 2016 - 8:42 am | जयू कर्णिक

नक्की पोस्ट करीन अजून काही, धन्यवाद.

जयू कर्णिक's picture

30 Oct 2016 - 8:24 pm | जयू कर्णिक

धन्यवाद सर्वांना...
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
जयू कर्णिक

उल्का's picture

31 Oct 2016 - 11:42 am | उल्का

टाटा घराण्याचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर टाटा परिवाराचीच असते. हे वाक्य खास आवडलं.

जयू कर्णिक's picture

31 Oct 2016 - 7:14 pm | जयू कर्णिक

धन्यवाद.
विचार पोहोचताहेत हे बघून बरे वाटले.

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2016 - 10:33 pm | चौथा कोनाडा

टाटा घराण्याचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर टाटा परिवाराचीच असते

+1 नंबर, सही!!

जयू कर्णिक's picture

1 Nov 2016 - 5:09 pm | जयू कर्णिक

टाटा संस्कार ..
आवडले, बरे वाटले.
धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2016 - 3:19 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, जयू कर्णिक !

या लेखाचे इंग्लिश रुपांतर मिळेल का ? म्हंजे मला माझ्या अ-मराठी इंजिनियर मित्रांबरोबर शेअर करता येइल.
माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स व्यनि मध्ये दिलेले आहेत.

जयू कर्णिक's picture

7 Nov 2016 - 7:34 am | जयू कर्णिक

इंग्रजी अनुवाद लवकरच देतो.
धन्यवाद.

तर भारतीय आपल्या भारतीयत्वाला व्यक्तीपुजेच्या तत्वाला जपलं असेच म्हणावे लागेल.
मंदीरात रतनजी टाटांचा उभ्याने पुतळा समोर नंदी ऐवजी नॅनो कार चे शिल्प
घंटी वाजवण्या ऐवजी टा-टा ळ्या वाजवल्या जातील.
बॅलन्सशीट्स ची पारायणे होतील.
प्रसादात टाटा नमक देतील
व्यक्तीपुजक त्यातही भारतीय कुठल्याही थराला जाऊ शकतात

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2016 - 6:01 pm | चौथा कोनाडा

लै भारी !

:-)))

ग्रेंजर's picture

7 Nov 2016 - 3:55 pm | ग्रेंजर

मस्त!!!!!! थोडासा अंदाज आलाच होता, शेवटी खरा ठरला :)

जयू कर्णिक's picture

14 Nov 2016 - 10:06 am | जयू कर्णिक

धन्यवाद....