आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी
माझ्या जवळच्या मैत्रीण ती एका बिझनेस मध्ये आहे. मला हि त्या बद्दल जरा कुतूहल वाटलं म्हणून ती काय बिझनेस करते ते विचारलं यावर तिने मला ती ऑनलाईन बिझनेस पोर्टल वर बिझनेस करते. यावर मी माझी काही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांनी बिझनेस ट्रिप करता दुबई ला गेली. त्यानंतर ती मला फोन करायला लागली या वर मी बोलता बोलता सांगितलं कि मला जॉब स्विच कराचा आहे. यावर ती किती खुश आहे बिझनेसमध्ये त्यामुळे ती तिच्या मुलीला (तिची मुलगी आणि माझी मुलगी एकाच वयाच्या आहेत मी जॉब करत असल्यामुळे मला माझ्या मुलीला बरोबर जास्त वेळ देता येत नाही याची मला खंत जास्त आहे) ती वेळ देऊ शकते. या वर मी तिला सांगितलं कि मी पण तुला जॉईन होऊ इच्छेत.
त्यानंतर एका रविवारी तिने तिच्या बिझनेस पार्टनर बरोबर मीटिंग आहे तू फॉर्मल मध्ये ये. मी तिला भांडुप च्या love and latte भांडुप च्या कॉफेमध्ये भेटली त्यानंतर अगदी दिमाखात Mr. परेश जाधव याची एन्ट्री झाली तिचे बिझनेस पार्टनर Mr. परेश जाधवला जे लोढा ग्रुप मध्ये सिविल engineer आहेत. आणि त्याचे अनेक लोकांना बिझनेसमध्ये उभं केलं (कि झोपवलं )आहे, त्याने मला समाजवाला सुरवात केली कि हा एक ऑनलाईन बिझनेस आहे. यात आम्ही तुम्हाला एक इ शॉप देणार यातून काही प्रॉडक्ट तुम्ही ग्लोबलली सेल करायची. हि प्रॉडक्ट्स काही असू शकतात जी ती ऑनलाईन विकली जाऊ शकतात मग ती ट्रॅव्हल मधली असो कि स्लिमिंग बुटी मधली या ऑनलाईन सेल मधून तुम्हाला काही पर्सेंटेज मिळणार ३०% ते ४०% या प्रमाणे ग्लोबली मिळणार ती किंमत काही लाख रुपयात मिळणार. gavt. नुसार तुमचा TDS कापून ती अमाऊंट तुमच्या खात्यात जमा होणार. तरी सुद्धा हि अमाऊंट काही लाखमध्ये असेल
त्याची सेंटर्स ठाणे, कांदिवली बोरिवली ला आहे. ते आपल्याला जॉब ट्रैनिंग देणार पण मग त्याने मला सांगितलं कि तू घर, मुलगी, जॉब मधून करूच शकणार नाहीस. (जेव्हा आपल्याला कोणी करू शकणार नाही म्हटलं कि ते काम आपण करतो ) मी त्यांना सांगितलं मी करू शकते. ( मित्रो हे मी डिटेल का सांगतेय हि याच कारण मी पुढे देणार आहे.) यात मी माझ्या नवरा बाहेर असल्यामुळे तो येऊ शकाल नाही (थँक गॉड ) बघ तुझी मैत्रीण पण यात आहे. ती किती खूष आहे, तू पैसे कमाऊ शकशील तुला फक्त वीकली १५ तास द्याचे आहेत. तू तुझा जॉब पण सोडू देशील एवढे पैसे मिळतील. ( आणि हे सगळं बोलणं चालत असताना त्या माणसाला मी कंपनीच नाव हि विचारलं नाही ????? कदाचित तो हे सारखं बोलत होता कि मला हे जमणार नाही त्यामुळे माझं सगळं लक्ष मी हे करू शकेन या वर होत )
(क्रमश.)
प्रतिक्रिया
9 Dec 2016 - 2:06 pm | देशपांडेमामा
वाचतोय ..पुढील भाग पटापट टाका
देश
9 Dec 2016 - 2:09 pm | रुस्तम
दिड वर्षांपूर्वी माझा मित्र मागे लागला होता. तो पण जाऊन आला दुबई ला.
9 Dec 2016 - 2:17 pm | नितिन थत्ते
9 Dec 2016 - 5:28 pm | कुंदन
दुबै ला येताय ना , शॉपिंग फेस्टीव्हल सुरु झालाय.
9 Dec 2016 - 2:20 pm | ज्योति अळवणी
यावर....... वाचते आहे
9 Dec 2016 - 2:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
जपून. हल्ली काहीच सांगता येत नाही.
9 Dec 2016 - 3:01 pm | गॅरी ट्रुमन
हा प्रकार अॅमवेसारखा वाटत आहे.
अॅमवेपेक्षाही मोठी फसवणूक साखळी जगात आहे तर!!
मी मिपावर पूर्वी अॅमवे आणि तत्सम प्रकाराविरूध्द हा प्रतिसाद लिहिला होता.त्याची आठवण झाली.
(अॅमवे आणि तत्सम नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांना आयसिस, अल कायदा, लष्करे तोयबा इत्यादींइतकाच धोकादायक समजणारा) ट्रुमन
9 Dec 2016 - 6:42 pm | सप्तरंगी
Amway पिरॅमिड स्कीम आणि scam असावे यात शंका नाही कारण त्यामुळे प्रॉडक्टची खरी किंमत आणि quality समजूच शकत नाही, त्यांचे टूथपेस्ट मध्येही sls (sodium lauryl sulfate ) असतेच. म्हणजे अगदी काही natural केमिकल्स नसलेली प्रॉडक्ट्स आहेत असे काही नाही. पण असे असूनही मी त्यांची काही प्रॉडक्ट्स वापरते (त्यांच्या कुठल्याही business साठी बकरी न होता ) कारण ते मला आवडतात. अर्थात ते वाजवीपेक्षा महागच आहेत. scam बद्दल चे नाही पण प्रॉडक्ट्स ची माहिती कुणाला असेल तर सांगाल का ? Bodyshop चे पण नाव फार आहे पण या सगळ्या प्रॉडक्ट्स च्या quality बद्दल कुणी लिहू शकेल का ?
बाकी अश्या scams मुले फार फार तर परवडणारी वस्तू वापरून बघावी पण यांच्या business चे बकरे बनण्याच्या फंदात पडू नये हेच खरे.
10 Dec 2016 - 12:25 pm | मराठी_माणूस
त्यांचे SA8 हे कपड्याचे साबण (liquid detergent)चांगले आहे.
9 Dec 2016 - 3:31 pm | किसन शिंदे
http://www.rocksfamilyglobal.com/home.asp
या कंपनीबद्दल कुणी सांगू शकेल काय?
9 Dec 2016 - 3:41 pm | अक्षरमित्र
माझा हा आणि हा लेख वाचावा असे सुचवितो.
9 Dec 2016 - 3:56 pm | बबन ताम्बे
१९९४ -९५ ला असेच मनी ग्रोवर नावाचे फॅड आले होते. २००० रु भरा आणि चार मेम्बर गोळा करा. भयंकर पॉप्युलर झाले होते. त्यात पिरॅमिड च्या वर बसलेले लोक गब्बर झाले (मुख्य प्रमोटर जळगावचा कुणी तरी जैन होता). खालचे सगळे झोपले. त्यांचा दोष काय तर म्हणे त्यांनी साखळी तोडली. आता चार मेंबर गळाला लावायचे म्हणजे काय सगळे आपल्यासारखे थोडीच *त्या असतात दोन हजार रुपये घालवायला ? बरं ही स्कीम म्हणजे आपल्या दोन हजाराने दुसर्यांचे खिसे भरा आणि आपले खिसे भरण्यासाठी नवीन लोकांच्या खिशात हात घाला.
अॅम्वेचा पण एक झॅक पॅक एक्झीक्युटीव्ह मागे लागला होता. त्याला वाटेला लावले.
अजून एक स्कीम होती. सेनापती बापट रोडवरील हॉटेल मॅरीएट मधे मामा बनलेले आणि त्यांनी धरून आणलेले बकरे अशी एक मीटींग होती. (मी एका ओळखीच्या सॉफ्ट्वेअर इंजीनीयरने धरून नेलेला बकरा होतो).
सेम स्कीम. त्यांचे प्रॉडक्ट विकत घ्या आणि नंतर दोन बकरे मिळवा आणि त्यांना प्रॉडक्ट विका. प्रॉडक्ट पण भारी होते. कसली तरे काचेची दिस्क होती त्याने म्हणे सगळे आजार बरे होतात. त्यात समुद्रातील दुर्मिळ खनीजे वापरली होती :-) किंमत फक्त १७०००/- ते नको असेल तर कॉस्मेटीक प्रॉडक्ट घ्या वीस हजाराची. तेही नको असेल तर हॉलीडे पॅकेज घ्या ३५ हजाराचे. मित्र खूप मागे लागला होता. तो तर म्हणाला की तो आता नोकरी सोडायला तयार आहे इतका त्याला ह्या बिझिनेस मधे पैसा मिळत होता म्हणे. . आश्च्रर्याची गोष्ट म्हणजे आधी जे कुणी हे धंदे करत होते ते सगळे वेल सेटल्ल्ड, सुशिक्षीत आणि सुखवस्तू दिसत होते. का एव्ह्ढे सुशीक्षीत लोक अशा आमिषांना बळी पडतात ?
9 Dec 2016 - 4:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य प्रश्न विचारलास हो बबन.प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील ह्यावरही अनेकांनी विश्वास ठेवला होता.
(जागरूक्)माई
9 Dec 2016 - 4:45 pm | बबन ताम्बे
.
9 Dec 2016 - 4:44 pm | मराठी कथालेखक
Amway निदान दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी उत्पादने तरी विकते... बाकीच्या काही कंपन्या काय विकतात तेच कळत नाही,
9 Dec 2016 - 4:54 pm | कैलासवासी
डिट्टो सेम अनुभव मी पण घेतलाय, जुन्या ऑफिस मधला मित्र होता तो सारखा विदेशी दौऱ्यावर जात असे, अस्जच एके दिवशी कॉल आला, २-४ बड्या बाता मारल्या. सहाजिकच मी विचारले कि नेमके काय काम करतोस तू म्हूणन, तो त्यावेळी जास्त काही बोलला नाही. नंतर पुण्यात येऊन त्याने मला भेटायला लावले बिलकुल अश्याच तर्हेने बाटलीत उतरवले. सुरवातीला एवढे पैसे भर तुझे पैसे काढून देण्याची मी हमी घेतो. तुला काहीही करायची गरज नाही, फक्त अकाउंट नंबर दे आम्ही लोन ची व्यवस्था करतो. हफ्ते आपोआप भरले जातील. मी फॉर्मॅलिटी म्हणून सगळे ऐकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्याला फोन वर सांगितले कि मला असले काहीही करणे जमणार नाही. पुढील वेळी वेगळ्या विषयावर बोलायचे असेल तरच फोन कर, भावाने अजून फोन नाही केला.
11 Dec 2016 - 8:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
असाचं एक माणुस माझ्या आणि वडीलांच्या मागे लागलाय. अगदी लोन बीन च्या माहितीसकट सगळं. =))
टोलवत ठेवलाय त्याला आज उद्या करत. कधी कंटाळतो पाहु. =))
10 Dec 2016 - 9:04 am | माम्लेदारचा पन्खा
मुंंबई हायकोर्टाने यांचा जामीन फेटाळला होता.....कोणीही ह्यांच्या फंदात पडू नका ही नम्र विनंती ....
10 Dec 2016 - 9:42 am | अजया
अशा गोष्टींवर विश्वास कसा काय बसतो बुवा? हे असले चमको लोक खरंतर लगेच लक्षात येतात!
10 Dec 2016 - 11:17 am | अबोली२१५
नाही. जी माझी मैत्रीण माझी शाळेत आम्ही एकत्र होतो. आणि ती खूप हुशार मुलीनंमध्ये गणली जात होती. ती एका सर्वसामान्य घरातून आलीय त्यामुळे ती चमको टाईप बिलकुल नाही आहे आणि आम्ही कधी तरी रविवारी भेटायचो, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवला. आपल्या जवळची व्यक्ती.
10 Dec 2016 - 1:37 pm | अजया
ती नाही हो तो बुवा!
10 Dec 2016 - 11:18 am | अबोली२१५
नाही. जी माझी मैत्रीण माझी शाळेत आम्ही एकत्र होतो. आणि ती खूप हुशार मुलीनंमध्ये गणली जात होती. ती एका सर्वसामान्य घरातून आलीय त्यामुळे ती चमको टाईप बिलकुल नाही आहे आणि आम्ही कधी तरी रविवारी भेटायचो, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवला. आपल्या जवळची व्यक्ती.
10 Dec 2016 - 12:00 pm | मार्मिक गोडसे
नुसती हुशारी असून चालत नाही व्यावहारीक ज्ञानही असावे लागते.
10 Dec 2016 - 1:05 pm | संदीप डांगे
फसवले जाणाऱ्यांमध्ये स्वतःला हुशार समजणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असते असं म्हणतात, ओव्हरकॉन्फिडन्स आंधळं करतो.
Conman प्रकारावर मागे कधीतरी वाचन केलं होतं, त्याबद्दल लिहितो आता विषय पुढे आलाच आहे तर.
11 Dec 2016 - 6:53 pm | चिवचिवाट
इन्ड्सहेल्थ हे पन असच काहितरी आहे ना?
कोणाला माहिती असेल तर कळेल काय?
12 Dec 2016 - 2:30 am | DeepakMali
Rcm,speakasia, oriflame, amway, nascent, milifestyle, aquamarine, shakti developers, palse,etc..