या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;)
काही काही ऑफिस मध्ये सॅलरी स्लिप देत नाहीत त्या काही ऑफिस मधल माझं ऑफिस आहे. मी माझ्या फिनान्स कंट्रोलरला जाऊन भेटली त्यांना माझं मजबूत खोट कारण सांगून थोडास रडवेला चेहरा करून सॅलरी स्लिप पाहिजेत असं सांगितलं, माझ्या खडूस फिनान्स कंट्रोलर लोण्याहून मऊ झाला (***ला असं कस झालं...) आणि त्याने माझ्या HR ला मेल टाकला कि मला लवकरात लवकरात सॅलरी स्लिप मिळावी.
माझी HR एक नंबरची... जाऊ दे... तिने मला दररोज आठवण करू दे असं सांगितलं (काय मी.. मी तिला आठवण करून देऊ म्हणतात ना अडली मी आणि गाढविणीचे पाय धरी ) दररोज मी तिच्या केबिन मध्ये जाऊन अग देतेस ना असं रोज आठवण करत होती ( harrasment काय असते ते कळत होत मला)
शेवटी रडका चेहरा करून फिनान्स कंट्रोलरला जाऊन सांगितलं कि तिने अजूनही मला सॅलरी स्लिप दिल्या नाहीत. फिनान्स कंट्रोलरला तिला खूप ओरडला. तिने डेटा एन्ट्री ऑपेरेटला जाऊन बडबडून आली. तो बिचारा एव्हडंस तोंड करून बसला. हे सगळं काय चाललं होत मी हे कशासाठी करतेय मलाच कळतच नव्हतं. थोडावेळसाठी मी विसरून गेली होती कि मला पैसे जमा करायाचे आहेत. हा उंदीर मांजराचा मांजर उंदराचा खेळ माझ्या ऑफिस मध्ये चालला होता. माझे सहकारी एकीकडे बिचारी म्हणत होते आणि एकीकडे खूप हसत होते. हि बघ चाल्ली... HR ची मैत्रीण (काय ???? मी और तुमसे.... नाही कभी नाही)
या मध्ये दोन आठवडे उलटले तरी सुद्धा माझ्या हातात सॅलरी स्लिप मिळाल्या नव्हत्या. काय करणार मी पण फिनान्स कंट्रोलरला जाऊन सांगितलं परत सांगितलं कि तिने अजूनही सॅलरी स्लिप अजूनही दिल्या नाही आहेत काय करू तो पण चिडला म्हणाला MD ला जाऊन सांग. आमचे MD सर थोडे रागीट आहेत पण मनाने खूप चांगले आहेत. मी या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या कि मला सॅलरी स्लिप पाहिजे आहेत पण दोन आठवडे झालेत पण अजून हातात आल्या नाही आहेत. त्यांनी HR ला फोन करून सांगितलं कि तुझी जी काही काम अहित ती बाजूला ठेऊन तिच्या सॅलरी स्लिप दे. मी बाहेर आल्यावर तिने मला फोन वरून जे काही ओरडला सुरवात केली मी काही काम करत नाही का ? तू सरानकडे जाऊन ते तुला देणार आहेत का ? मी तुला त्याच्या समोर जाऊन देते वैगरे वैगरे....
तिसरया दिवशी तिने मला ई-मेल केल्या आणि अकाउंट ची स्वाक्षरी करून आणायला लावली. (तिची हि सगळी काम मी करत होती काय करणार मी आणि गाढवीण....) मग अकाउंटंटने त्यावर स्वाक्षरी केली त्या स्लिप घेऊन मी HR ची स्वाक्षरी घेतली मग त्यावर अकाउंटंटने स्टॅम्प मारला आणि त्या सॅलरी स्लिप माझ्या हातात आल्या.
आणि मी आनंदाने नवऱ्याला फोन केला सॅलरी स्लिप मिळालया आहेत. त्या त्याने बँकेत जमा केल्या पण बँक मध्ये लोन करायला कोणी बसत नव्हत कारण सगळे नोटबंदी मध्ये अडकले होते. मी पेपर सबमिट केले. माझ्या बँक मॅनेजरने खूप हेल्प केली. त्याने ते पेपर पुढे पाठवले पण या दरम्यान आमच्या नवरा बायकोच शुल्लक गोष्टी वरून थोडं वाजलं होत. त्यावर त्याने मी माऊच्या FD नाही देणार तू तुझ्या मैत्रिणीला सांग कि मी ३. ५० नाही देऊ शकणार तू तुझ्या जबाबदारीवर काय ते जमाव. (नही... हे भगवान तू मेरे साथ हि येसा क्यू करते हो... )
जमा केल्या पेपरवर बँकेततुन उत्तर आलं कि तुम्हाला तुमच्या ऑफिस मधून लिहून आणावं लागेल कि माझी सॅलरी अन्नुअली २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे आम्ही फॉर्म १६ देऊ शकत नाही. म्हणजे मला फिनान्स कंट्रोलरला जाऊन हे सांगावं लागणार होत (शाकाल ला जाऊन बोलावं लागणार होत... शकाल please तुझी प्रिय स्वाक्षरी असलेला पेपर मला दे.... ) मला खूप घाम फुटला होता. मी माझ्या नवऱ्याला बोलली अरे सॅलरी सर्टिफिकेट दिलाय ना. तो बोलला अग पहिले चाल असत पण आता रूल्स कडक झालेत त्याशिवाय ते लोन पास नाही करणार. मी माझ्या शाकाल कडे गेली आणि त्यांना विनंती केली त्यावर त्याने मला एक १५ मिनिटांचं भाषण झाडल (मी दे दे रे दे रे शाकाल एक बार लिखके दे दे... गाणं गात होती) आणि एकदाचा तो पेपर माझ्या हाती आला.
प्रतिक्रिया
10 Dec 2016 - 5:44 pm | mayu4u
पु भा ल आ मो टा
10 Dec 2016 - 6:08 pm | अबोली२१५
पु भा ल आ मो टा - पण याचा अर्थ काय
10 Dec 2016 - 6:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
पु भा ल आ मो टा = पुढचा भाग लवकर आणि मोठा टाका :)
10 Dec 2016 - 5:47 pm | सामान्य वाचक
मी qnet ची साईट उघडण्याचा प्रयत्न केला
पण ती साईट बंद केली आहे
Action घेतलेली दिसत आहे authorities नि
10 Dec 2016 - 5:48 pm | सामान्य वाचक
तुमचे पैसे बुडाले नाहीत ना?
मग निवांत क्रमशः लिहा
10 Dec 2016 - 5:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त सांगताय कहाणी. रोचक आहे. भाग थोडे मोठे टाकावे.
मला वाटत आहे की तुमच्या ऑफीसची सगळी माणसे तुम्हाला अप्रत्यक्षपणे मदतच करत होती. पण, तुम्ही हट्टालाच पेटलेल्या होतात असे दिसते :)
त्यांनी केलेल्या उशीरामुळे तुमचे पैसे बुडण्यापासून वाचलेले असावेत हीच शुभेच्छा ! :)
10 Dec 2016 - 6:04 pm | अबोली२१५
(क्रमश.) Picture अभी बाकी है मेरे दोस्त...
10 Dec 2016 - 6:46 pm | संजय क्षीरसागर
जगातल्या सगळ्या आर्थिक फसवणूकीचं एकमेव कारण आहे ' मोह ' !
10 Dec 2016 - 6:55 pm | अबोली२१५
"स्वप्न"
आपल्या लोकांसाठी काहीतरी करून ठेवावं जेणेकरून त्यांना त्याच्या पुढल्या आयुष्यात कुठली हि कमी पडू नये.
10 Dec 2016 - 7:05 pm | संजय क्षीरसागर
पण ३.५० चे ५.०० होतील, त्याचे पुढे ७.०० होतील हे स्वप्नरंजन म्हणजे मोह .
एकदा मोह झाला की तो लॉजिकला ओवर पॉवर करतो
10 Dec 2016 - 7:22 pm | अबोली२१५
मला तस्सा काही वाटलं नव्हतं आणि अजूनही वाटत नाही आहे काहीतरी नवीन करायला मिळेल आणि त्यातून मी थोडेफार पैसे कमवून उरलेला वेळ मी माझ्या मुलीसाठी देऊ शकेन कारण नवरा बायको नि कमवण हि काळाची गरज झालीय. मी जॉब सोडला तर माझ्या नवऱ्यावरती सर्व जबाबदारी पडेल. मी कमावते त्यातून मी पैसे बचत करून माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकते.
10 Dec 2016 - 7:26 pm | संजय क्षीरसागर
.
10 Dec 2016 - 9:22 pm | रविकिरण फडके
बाईसाहेब,
जे लिहिता आहात ते प्रकाशित करण्यापूर्वी कृपया एकदा नीट वाचून त्यातील मराठीच्या चुका दुरुस्त कराव्यात अशी माझी नम्र विनंती आहे. काय होतेय, विषय मनोवेधक असूनसुद्धा भाषेमुळे वाचनात, जेवताना जसे वारंवार खडे आल्याने सगळी मजाच निघून जावी, तसे होते आहे.
तसदीबद्दल क्षमा असावी.
10 Dec 2016 - 10:01 pm | संजय क्षीरसागर
इथे शुद्ध - अशुद्ध असा भेद नाही . कंटेंट महत्वाचा समजला जातो . त्यामुळेच तर लोक लिहायला पुढे येतात. फार खोलात न शिरता वाचलं की झालं !
11 Dec 2016 - 12:22 pm | मराठी_माणूस
सहमत. प्रकाशीत करण्यापुर्वी एकदा वाचुन घेतले तरी बर्याच चुका दुरुस्त करता येतील.
12 Dec 2016 - 11:21 am | अबोली२१५
धन्यवाद मी चुका दुरुस्त करेन
10 Dec 2016 - 9:33 pm | सुधांशुनूलकर
सगळे भाग वाचले.
तुमचं नुकसान झालं नसावं, या शुभ अपेक्षेसह पुभाप्र (पुढील भागाच्या प्रतीक्षेत)
10 Dec 2016 - 10:27 pm | पिंगू
अबोलीतै, पैसे बुडाले नसतील तर खूपच चांगलं. आता पुढील भाग पण पटापट आणि मोठ्ठा येऊ दे बरे..
10 Dec 2016 - 10:32 pm | बाजीप्रभू
अबोली मॅडम तुम्ही खूप छान लिहिताय... नवख्या अहात असं बिलकुल वाटत नाहीये... पोस्टची जी लेन्थ तुम्ही मेंटेन्ड ठेवली आहे त्यावरून मराठी सिरियलचा भरपूर प्रभाव दिसतोय. प्रत्येक भागा गणिक उसुक्ता वाढत चालली आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत... देव करो आणि तुमचं नुकसान झालंय असं वाचायला नको मिळोत.
मलाही थायलंडमधे "युनिसिटी" या कंपनीच्या फ्रॉडच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करण्यात आला होता. पण निसर्गदत्त भारतीय भोचकपणा अंगी असल्याने सहीसलामत सुटलो त्यातून. पुढेमागे लिहीन त्यावर सध्या तुमचे अनुभव वाचण्यात गर्क आहे.
10 Dec 2016 - 10:53 pm | संजय क्षीरसागर
तो मॅन, लेखिकेचे आले की देणार असावा !
11 Dec 2016 - 6:03 pm | अभिजित - १
मराठी सिरियलचा भरपूर प्रभाव दिसतोय !!!!!!!
11 Dec 2016 - 6:03 pm | अभिजित - १
मराठी सिरियलचा भरपूर प्रभाव दिसतोय !!!!!!!
12 Dec 2016 - 11:20 am | अबोली२१५
खूप अतिरंजित झालाय का ?
12 Dec 2016 - 11:30 am | संजय क्षीरसागर
त्यामुळे विमान एकदम वर जाऊन झपकन खाली येऊ नये अपेक्षा.
11 Dec 2016 - 7:17 pm | चिवचिवाट
सगळे भाग एकदम वाचले ....
पु भा प्र