Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४
या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;)
काही काही ऑफिस मध्ये सॅलरी स्लिप देत नाहीत त्या काही ऑफिस मधल माझं ऑफिस आहे. मी माझ्या फिनान्स कंट्रोलरला जाऊन भेटली त्यांना माझं मजबूत खोट कारण सांगून थोडास रडवेला चेहरा करून सॅलरी स्लिप पाहिजेत असं सांगितलं, माझ्या खडूस फिनान्स कंट्रोलर लोण्याहून मऊ झाला (***ला असं कस झालं...) आणि त्याने माझ्या HR ला मेल टाकला कि मला लवकरात लवकरात सॅलरी स्लिप मिळावी.
माझी HR एक नंबरची... जाऊ दे... तिने मला दररोज आठवण करू दे असं सांगितलं (काय मी.. मी तिला आठवण करून देऊ म्हणतात ना अडली मी आणि गाढविणीचे पाय धरी ) दररोज मी तिच्या केबिन मध्ये जाऊन अग देतेस ना असं रोज आठवण करत होती ( harrasment काय असते ते कळत होत मला)
शेवटी रडका चेहरा करून फिनान्स कंट्रोलरला जाऊन सांगितलं कि तिने अजूनही मला सॅलरी स्लिप दिल्या नाहीत. फिनान्स कंट्रोलरला तिला खूप ओरडला. तिने डेटा एन्ट्री ऑपेरेटला जाऊन बडबडून आली. तो बिचारा एव्हडंस तोंड करून बसला. हे सगळं काय चाललं होत मी हे कशासाठी करतेय मलाच कळतच नव्हतं. थोडावेळसाठी मी विसरून गेली होती कि मला पैसे जमा करायाचे आहेत. हा उंदीर मांजराचा मांजर उंदराचा खेळ माझ्या ऑफिस मध्ये चालला होता. माझे सहकारी एकीकडे बिचारी म्हणत होते आणि एकीकडे खूप हसत होते. हि बघ चाल्ली... HR ची मैत्रीण (काय ???? मी और तुमसे.... नाही कभी नाही)
या मध्ये दोन आठवडे उलटले तरी सुद्धा माझ्या हातात सॅलरी स्लिप मिळाल्या नव्हत्या. काय करणार मी पण फिनान्स कंट्रोलरला जाऊन सांगितलं परत सांगितलं कि तिने अजूनही सॅलरी स्लिप अजूनही दिल्या नाही आहेत काय करू तो पण चिडला म्हणाला MD ला जाऊन सांग. आमचे MD सर थोडे रागीट आहेत पण मनाने खूप चांगले आहेत. मी या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या कि मला सॅलरी स्लिप पाहिजे आहेत पण दोन आठवडे झालेत पण अजून हातात आल्या नाही आहेत. त्यांनी HR ला फोन करून सांगितलं कि तुझी जी काही काम अहित ती बाजूला ठेऊन तिच्या सॅलरी स्लिप दे. मी बाहेर आल्यावर तिने मला फोन वरून जे काही ओरडला सुरवात केली मी काही काम करत नाही का ? तू सरानकडे जाऊन ते तुला देणार आहेत का ? मी तुला त्याच्या समोर जाऊन देते वैगरे वैगरे....
तिसरया दिवशी तिने मला ई-मेल केल्या आणि अकाउंट ची स्वाक्षरी करून आणायला लावली. (तिची हि सगळी काम मी करत होती काय करणार मी आणि गाढवीण....) मग अकाउंटंटने त्यावर स्वाक्षरी केली त्या स्लिप घेऊन मी HR ची स्वाक्षरी घेतली मग त्यावर अकाउंटंटने स्टॅम्प मारला आणि त्या सॅलरी स्लिप माझ्या हातात आल्या.
आणि मी आनंदाने नवऱ्याला फोन केला सॅलरी स्लिप मिळालया आहेत. त्या त्याने बँकेत जमा केल्या पण बँक मध्ये लोन करायला कोणी बसत नव्हत कारण सगळे नोटबंदी मध्ये अडकले होते. मी पेपर सबमिट केले. माझ्या बँक मॅनेजरने खूप हेल्प केली. त्याने ते पेपर पुढे पाठवले पण या दरम्यान आमच्या नवरा बायकोच शुल्लक गोष्टी वरून थोडं वाजलं होत. त्यावर त्याने मी माऊच्या FD नाही देणार तू तुझ्या मैत्रिणीला सांग कि मी ३. ५० नाही देऊ शकणार तू तुझ्या जबाबदारीवर काय ते जमाव. (नही... हे भगवान तू मेरे साथ हि येसा क्यू करते हो... )
जमा केल्या पेपरवर बँकेततुन उत्तर आलं कि तुम्हाला तुमच्या ऑफिस मधून लिहून आणावं लागेल कि माझी सॅलरी अन्नुअली २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे आम्ही फॉर्म १६ देऊ शकत नाही. म्हणजे मला फिनान्स कंट्रोलरला जाऊन हे सांगावं लागणार होत (शाकाल ला जाऊन बोलावं लागणार होत... शकाल please तुझी प्रिय स्वाक्षरी असलेला पेपर मला दे.... ) मला खूप घाम फुटला होता. मी माझ्या नवऱ्याला बोलली अरे सॅलरी सर्टिफिकेट दिलाय ना. तो बोलला अग पहिले चाल असत पण आता रूल्स कडक झालेत त्याशिवाय ते लोन पास नाही करणार. मी माझ्या शाकाल कडे गेली आणि त्यांना विनंती केली त्यावर त्याने मला एक १५ मिनिटांचं भाषण झाडल (मी दे दे रे दे रे शाकाल एक बार लिखके दे दे... गाणं गात होती) आणि एकदाचा तो पेपर माझ्या हाती आला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पु भा प्र
मी नवीन आहे
पु भा ल आ मो टा = पुढचा भाग
हे वाचून
एका प्रश्नाचे उत्तर द्या
मला वाटत आहे की तुमच्या
(क्रमश.)
तुमची लिहीण्याची स्टाईल एकदम लाईवली आहे !
"स्वप्न"
पैसे कशासाठी वापरू हा ड्रायवींग फोर्स आहेच
मला तस्सा काही वाटलं नव्हतं
ओके !
प्रकाशित करण्यापूर्वी...
रफ !
सहमत. प्रकाशीत करण्यापुर्वी
मान्य
वाचतोय
अबोलीतै, पैसे बुडाले नसतील तर
पु भा प्र
बहुदा त्या मैत्रिणीचे अडकलेले पैसे
मराठी सिरियलचा भरपूर प्रभाव
मराठी सिरियलचा भरपूर प्रभाव
खूप अतिरंजित झालाय का ?
एंडचा अंदाज आहे
पु भा प्र