तो अनुभव...
मी अनेक वर्ष शिफ्ट ड्युटी केली. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ३.३० तर दुसरी ३.३० ते रात्री १२.०० पर्यंत. तिसरी शिफ्ट कधी करावी लागली नाही.
लग्न व्हायच्या आधीच्या काळात रात्री १२.०० नंतर गप्पा मारायला, चहा प्यायला इ. कारणासाठी बुधवारच्या सेकंड शिफ्ट नंतर आम्ही बॅचलर्स जमा व्हायचो. मग कुणाच्या रुम मधे पत्ते रंगायचे तर कधी फक्क्ड चहाच्या सोबतीने गप्पा रंगायच्या.