माझ्या कविता

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
10 Oct 2015 - 10:26 am

माझ्या कविता. .
   काही शब्दांनी सजलेल्या . .
   काही स्वप्नांनी भिजलेल्या. .
   कधी भासांमधे अडकून
   काही क्षणांमधे रुजलेल्या. .
माझ्या कविता. .
    कळत नकळत मनामध्ये विरलेल्या..
    कधी कधी तर भावनाच विखुरलेल्या ..
    कधी ओझरत्या आशेने खुललेल्या ..
    तर कधी विखुरत्या रंगात फुललेल्या..
माझ्या कविता. .
     कधी इच्छेने साकारलेल्या..
     कधी सक्तीने आकारलेल्या..
     कधी आपसूकच जुळलेल्या..
     तर कधी उगाचच जुळवलेल्या ..
माझ्या कविता. .
    कधी रंग, छंद, रुप पाहून
                सुशोभित केलेल्या
    तर कधी अंतरंग पाहून
               भाषांतरीत केलेल्या
माझ्या कविता. .

अशा काही वेळी अवेळी लिहीलेल्या ..
      मनातुन शब्दात उतरलेल्या ..
             माझ्या कविता. .

कविता माझीकवितारेखाटन

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

10 Oct 2015 - 3:50 pm | मांत्रिक

+१११