आपला दिनु( थोडं भय)

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
22 Sep 2015 - 7:41 am

आकाशात स्वच्छ चांदणे पसरले होते, दिनू आज खूपच अस्वस्थ होता. आता तूम्हाला वाटल असेल की आपला दिनु का बरं अस्वस्थ होता अहो तस काही मोठ कारण नव्हत ! कालपासून त्याला थोडे जुलाब होत होते म्हणून आज सकाळीच बसने तो तालूक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात गेला होता दवाखान्यात खुपच गर्दि असल्यान खुप उशीरा त्याचा नंबर लागला इंजक्शन ,गोळ्या घेउन तो तातडीन स्टँडवर आला दुपारची तर बस निघुन गेली होती. आता उरली ती शेवटची
६ वाजेची बस तोपर्यँत काय करायचे तेवढ्यात त्याला समोरच पेपरच दूकान दिसल तिथून एक पेपर घेऊन तो कोडी सोडवत बसला बघता बघता कसा वेळ गेला दिनूला कळलेच नाही. ६ ची बस लागली तसा दिनू पटकन गाडीत चढला गाडीत मोजकिच शिट होती , ८ वाजेच्या सूमारास बस त्याच्या गावाच्या फाट्यावर येऊन थांबली . फाट्यावर ऊतरून दिनु ने आजुबाजूला बघितले तर सगळीकडे अंधारच अंधार दिसत होता त्याने खिशातला आपला मोबाईल काढला आणि पायवाटेने चालू लागला बस केव्हाच दूर निघून गेली होती. आपला दिनु त्याच्याच नादात चालला होता. आजूबाजुला रातकिडे किर् किर् करत होते. काजवे चमचम करीत होते आता आपल्याला तर माहितच आहे गाव तिथे भूतांच्या खेतांच्या अफवा तर असणारच गावातील दिवे अजूनही खूप दूर दिसत होते. अचानक दिनूला मागून ये दिनू थांब रे पोरा असा आवाज आला दिनुने मागे वळून पाहिले पण मागे तर कूणीचं नव्हतं होता फक्त अंधार आणि अक्राळविक्राळ ती घनदाट झूडपे आता मात्र दिनू टरकला त्याने जी धाव मारली तसे तो बाभळीच्या रानात येऊन थांबला खूप पळल्या मुळे त्याला दम लागला होता. पून्हा मागून कूणीतरी धावत येत आहे असे त्याला जाणवले दिनू परत पळत सूटला मागून दिनू थांब दिनू थांब असा सारखा आवाज येत होता पण आपल्या दिनूची आधीच टरकली होती तो क्रिशच्या स्पिडने पळत पळत एकदाचा गावात येऊन पोहोचला तसा मागून येणारा तो आवाज बंद झाला . दिनूने घरी आल्यावर सगळी घटना आपल्या घरच्यांना सांगितली.तेव्हा त्याचे आजोबा म्हणाले अरे दिनू त्या वाटेवर खूप वर्षापूर्वि एका माणसाला काही चोरांनी मारले होते. म्हणून असे भास आपल्याला होतात . तू जेऊन घे. उद्या आपल्याला शेजारच्या गावात जायचं आहे तिथ रवी आणि निलच्या मदतीसाठी त्यांना त्या पाटलापासून गावाला भयमुक्त करायचे आहे. कथा काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.

कथाबालकथामौजमजारेखाटनलेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

22 Sep 2015 - 10:48 am | विजुभाऊ

कथा काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.

हे वाक्य दिनुचे आजोबा म्हणाले असे का वाटतंय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2015 - 10:53 am | डॉ सुहास म्हात्रे

ते तसंच असावं. दिनुला अश्या कपोलकल्पित कथा सांगण्याची सवय आहे हे त्याच्या आजोबांना माहीत आहे ना, म्हणून !

(वरची वाक्ये काल्पनिक आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी.) =))

दिनु गवळी's picture

22 Sep 2015 - 7:32 pm | दिनु गवळी

ती सुचना लेखकाने दिली आहे

मनीषा's picture

22 Sep 2015 - 12:15 pm | मनीषा

आता कसय दिनुचं?
आधीच उशीरा नंबर लागला .. हॉस्पीटल मधे . त्यामुळे तिथे बसून रहावे लागले. आणि नंतर बस स्टॅन्ड पासून इतक्या लांब चालल्यामुळे भ्रम होणे सहजिकच आहे.
बिच्चारा दिनु :(
रवी, नील, पाटील या पात्रांचा कृपया परिचय देणे.

ही कथा मात्र नक्कीच वरिजनल असणार यात अजिबात शंका नाही!

अतिशय प्रामाणिक व प्रांजळ कथन.

बोका-ए-आझम's picture

22 Sep 2015 - 5:26 pm | बोका-ए-आझम

म्हणून डीजी आलेले आहेत. कथेतलं अक्षरन् अक्षर ओरिजनल आहे.

मांत्रिक's picture

22 Sep 2015 - 7:24 pm | मांत्रिक

ओ राजे! प्रत्येक वेळी नाव बदलू नका! त्यामुळे नवीन वाचणार्याचा नक्कीच गोंधळ होतो. असो. नेहमीप्रमाणे आवडलं.
अस्सल गावठी माल! ;)

दिनु गवळी's picture

22 Sep 2015 - 7:41 pm | दिनु गवळी

ही कथा वेगळी हाय राजे