कला
मला आवडलेले संगीतकार :- १. मदनमोहन
हिंदी चित्रपटसृष्टीला ज्या अनेक संगीतकारांनी सजविले त्या प्रत्येकाची शैली स्वतंत्र होती. मदनमोहन यांचे वेगळेपण अगदी ठळकपणे डोळ्यात भरते. मदनमोहन हे आर्मीमध्ये काही वर्षे सर्विस केल्यामुळे शिस्तप्रिय आणि अचूक कामासाठी प्रसिद्ध होते. गजलसम्राट म्हणून ते ओळखले जायचे. अनेक नितांतसुंदर अजरामर गाणी विशेषत गजल्स त्यांनी आपल्याला दिलीत.
मला उमजलेले बॉलीवूड
नमस्कार मंडळी, सुप्रभात. गेले अनेक दिवस फेसबुक वर वावरताना अनेक जण आपापल्या परीने बॉलीवूड म्हणजेच आपली चित्रपटसृष्टी आणि त्यातील चित्रपट, गाणी याविषयी लिहिताना दिसतात. प्रत्येकाची आपापली शैली, दृष्टी यामुळे नकळत आपल्याला ही या गोष्टीकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते.
७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता! मग पुढच्या दिड शतकी धाग्यात दोन कट्टे होतील इतपत काथ्या कुटुन प्रगती झाली!त्यात ७चा कट्टा अानंदी हाॅलला होणार म्हंटल्यावर शहाण्यासुरत्या;)लोकांनी कट्टयाची सूत्र हातात घेऊन तिसरा धागा काढला!त्यानुसार पाताळेश्वरला गप्पा आणि राजधानी थाळी नक्की झालं एकदाचं.मात्र कट्टयाला कोण कोण येणार हे मात्र गुलदस्त्यात होते.
कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१० निकाल
मी हा निकाल कसा लावला याबद्दल प्रथम थोडेसे...
मी कोणाचे फोटो आहेत हे न बघता एका फोल्डरमधे सेव्ह केले. ते फोल्डर नंतर Adobe Bridge मधे ओपेन केले व त्याचे १ ते पाच असे मानांकित केले. ज्याला पाच स्टार होते ते एकत्र केले व ते परत १-५ या स्केलवर मानांकित केले. त्यातून तीन फोटो निवडले ते क्रमांकानुसार खालील प्रमाणे.
क्रमांक एक : सर्वसाक्षी
क्र्मांक दोन : मोहनराव
क्रमांक तीन : अभिदेश व स्पा (दरवाजा)
प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
(दि ची कहाणी)
प्रेम 'दि' च्या आयुष्यातलं एक महत्वाचा वळण आहे. 'प्रेम रतन धन पायो' (दुव्यावर नका जाऊ प्लीज) मधील प्रेम पाहुन मला अनेक मित्र मैत्रीणींनी विचारलं कसं जमतं हो तुम्हाला ? त्यातल्या एका मैत्रीणीने हट्टच केला मलाही प्रेम करायचं आहे. माझ्या प्रेमाबद्दल तशी कोणालाच काही कल्पना नव्हती, मला तरी कुठे होती. माझ्या प्रेमाचं नाव काय ठेवायचं काही ठरलेलं नव्हतं. प्रेमाला नाव नसतंच नै का, पण प्रेमाला उपमा असते. माझ्या प्रेमाची कारागिरी अधिक सुबक व्हावी म्हणुन मी भरपूर प्रॅक्टीस करत होतो.
कॉमेडी ऐसपैस
" तर आता पहा, नवराबायकोतील हा धम्माल संवाद!!" एक तोकड्या कपड्यांतली वाळकी मुलगी, तिच्या कमावलेल्या आवाजात सांगत असते. तिच्या शब्दाशब्दाला मागचा वाद्यवृंद ठणाणत असतो.
एक अत्यंत जाडी,बेढब पण साडी नेसलेली बाई स्टेजवर प्रवेश करते. आताशा, स्टेजवर प्रत्येक पात्राने नाचत नाचत आणि वाजत गाजतच प्रवेश करायचा असतो. तसा डिफॉल्ट प्रोग्रॅमच आहे ना! शिवाय प्रत्यक्ष काही वाक्य उच्चारण्याच्या आधीच नुसत्या आगाऊ देहबोलीवरच प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे हंशे वसूल करायचे असतात.
पुस्तकातील चित्रे
आपल्यापैकी बहुतेकांना बालपणी 'चांदोबा' तील चित्रांनी नक्कीच मोहवले असेल. खरोखर मासिके - पुस्तकातल्या कथांना अनुरूप अशी चित्रे बनवणे खूपच आव्हानात्मक काम असते, आणि अशी उत्तम चित्रे बनवण्यासाठी अत्युच्च दर्जाची प्रतिभा लागते.
या लेखमालेद्वारे काही प्रतिभावान चित्रकारांनी पुस्तकांसाठी बनवलेली चित्रे इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
एक "टवाळ" संध्याकाळ
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)