या पाच गोष्टी कोणालाही सांगू नयेत
1 आपल्या आर्थिक नुकसानीची चर्चा कोणाबरोबर करू नये. कारण कोणीही आपल्याला मदत करणार नाहीच पण आपल्याला कुठे मदत करावी लागेल म्हणून दुर पळतील.
2. आपले दुख: आपल्या पुरतेच ठेवावे. जर आपल्या दुखा:ची चर्चा इतरांशी केली तर लोक आपल्याला मदत करायची सोडून आपली टर उडवतील.
3. आपल्या घरातील भांडणे, वाईट गोष्टीची चर्चा बाहेर करू नये. कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.
4. कोणी आपल्याला फसवले तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा मुर्ख आहे अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील.
5. आपला कोणी अपमान केला तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल.