या पाच गोष्टी कोणालाही सांगू नयेत

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
6 Sep 2015 - 8:47 pm

1 आपल्या आर्थिक नुकसानीची चर्चा कोणाबरोबर करू नये. कारण कोणीही आपल्याला मदत करणार नाहीच पण आपल्याला कुठे मदत करावी लागेल म्हणून दुर पळतील.

2. आपले दुख: आपल्या पुरतेच ठेवावे. जर आपल्या दुखा:ची चर्चा इतरांशी केली तर लोक आपल्याला मदत करायची सोडून आपली टर उडवतील.

3. आपल्या घरातील भांडणे, वाईट गोष्टीची चर्चा बाहेर करू नये. कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.

4. कोणी आपल्याला फसवले तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा मुर्ख आहे अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील.

5. आपला कोणी अपमान केला तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल.

समाजविचार

प्रतिक्रिया

आँ सांगु नयेत असेच म्हणताय अन स्वतःच सांगताय ? नक्कि समजाय॑च काय भाबड्याजनांनी ?

जेपी's picture

6 Sep 2015 - 8:56 pm | जेपी

वेलकम टु निसो क्लब.

अवांतर- असले धागे उडवण्यास संमचे हात बांधले गेले आहेत का ?

पैसा's picture

6 Sep 2015 - 10:30 pm | पैसा

हे धागे पूर्णपणे धोरणात बसणारे आहेत. वाचकांनी आपला कंटाळ्याचा अधिकार जरूर वापरावा.

अरुण मनोहर's picture

7 Sep 2015 - 2:30 pm | अरुण मनोहर

वाचकांनी आपला कंटाळ्याचा अधिकार जरूर वापरावा.

टाळ्यांचा अधिकार वापरण्यात आला आहे! (पैसा ला टाळ्या मिळणारच ! )

अद्द्या's picture

6 Sep 2015 - 9:03 pm | अद्द्या

1 आपल्या आर्थिक नुकसानीची चर्चा कोणाबरोबर करू नये. कारण कोणीही आपल्याला मदत करणार नाहीच पण आपल्याला कुठे मदत करावी लागेल म्हणून दुर पळतील.
>>> हाहा
2. आपले दुख: आपल्या पुरतेच ठेवावे. जर आपल्या दुखा:ची चर्चा इतरांशी केली तर लोक आपल्याला मदत करायची सोडून आपली टर उडवतील.
>> हाहाहा
3. आपल्या घरातील भांडणे, वाईट गोष्टीची चर्चा बाहेर करू नये. कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.
>> हाहाहाहा
4. कोणी आपल्याला फसवले तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा मुर्ख आहे अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील.
>> हाहाहाहाहा
5. आपला कोणी अपमान केला तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल.

>> हाहाहाहाहाहाहा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Sep 2015 - 10:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हाँ. अश्शं ट्लॉलींग नै कलायचं लॉटकर कॉकाँच्या दाग्यावर. जनहितार्थ मारी.

अद्द्या's picture

6 Sep 2015 - 11:25 pm | अद्द्या

ओ त्यांनी हसायचं नाही असं कुठे म्हन्लय. .

आजकाल ट्लॉलींगपण करायला नाही देत मुलांना :-/

नाखु's picture

7 Sep 2015 - 8:20 am | नाखु

पुढच्या निबंदाचा विश्य "हसतील त्याचे दात दिसतील"
"हसणार्याने मिषरीने दात घासावेत, मगच गब्बर होतो"

नाखुस खालमाने
इ सातवी क
बाकडे भिताडाक्डून दुसरे
अद्द्याच्या पाठी आणि चिमण्याशेजारचे बाकडे (खिडकीजवळची जागा बॅट्या आणि धन्याने ढापलीय)

प्यारे१'s picture

6 Sep 2015 - 11:49 pm | प्यारे१

याला टप्प्याटप्प्यानं च... आपलं हसणं म्हणायचं का?

अद्द्या's picture

6 Sep 2015 - 11:52 pm | अद्द्या

जे समजायचं ते समजा.
पण सांगू नका कोणाला

आपके नबाबी शौकोंके बारे में हमें कतई खबर नहीं थी| अब आप ही गर बता रहे हो तो लाहौल विलाकुवत किसी के सामने नाचीझ की जुबाँ खुले| इत्मीनान रक्खे| ;)
- प्यारेमियाँ लखनवी
हलकं घे रे.

दिसामाजि काहीतरी लिहित जावे.
पण महत्त्वाचे म्हणजे कुणाला सांगू नये.

अद्द्या's picture

6 Sep 2015 - 9:12 pm | अद्द्या

ते जाऊदे .
रविवारी ओल्ड मंक मिळाली का तुला ?

अभ्या..'s picture

6 Sep 2015 - 9:14 pm | अभ्या..

मग लेका.
हे पण कुणाला सांगायचे नसते बे. ;)

चित्रगुप्त's picture

6 Sep 2015 - 9:29 pm | चित्रगुप्त

अश्या गोष्टी ज्यांना मोकळेपणाने सांगता येतील असे मित्र नसणे हे सर्वात मोठे करंटेपण.

हेमंत लाटकर's picture

6 Sep 2015 - 10:14 pm | हेमंत लाटकर

मित्र कधी शत्रू होतील हे सांगता येत नाही

कविता१९७८'s picture

6 Sep 2015 - 10:30 pm | कविता१९७८

जे स्वार्थापोटी आपल्याशी मैञी करतात ते नेहमीच आपले शञु असतात.

दिव्यश्री's picture

7 Sep 2015 - 11:26 am | दिव्यश्री

सहमत

भैड्या's picture

6 Sep 2015 - 10:22 pm | भैड्या

लंबर दोनविषयी असहमत.
आसल्या गोष्टी सांगाय आवरजुन मैतर शोधा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Sep 2015 - 10:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आयडी बदलुन घ्या ओ. टंकनचुका करायला लैचं स्कोप आहे तुमच्या नावात.

Sanjay Uwach's picture

6 Sep 2015 - 10:26 pm | Sanjay Uwach

नविन पंचतंत्र

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2015 - 10:29 pm | चौथा कोनाडा

सहमत.

आणखी एक राहिलीच :

6) फेबु व कायप्पा सारख्या सोने वरुन कंटाळा येइ पर्यंत फिरणारया उपदेश मात्रा मिपावर टाकु नयेत.
कृहघे.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

6 Sep 2015 - 10:48 pm | फुलथ्रॉटल जिनियस

६. आपला आयक्यू तपासून घ्यावा , जरि तो ५० आला तरी जगाला तो १५० सांगावा

रमेश आठवले's picture

6 Sep 2015 - 10:52 pm | रमेश आठवले

रहिमन नीज मनकी व्यथा मनही राखो गोय
सुनी इठलेगे लोग सब बाटी न लेहे कोय

रहिम या संताचा हा दोहा
इठलेगे- हसतील
गोय -जपून
बाटी -वाटून
लेहे - घेणार
कोय -कोणीही

वाह! क्या बात है... अप्रतिम दोहा. फारच सुंदर.

श्रीगुरुजी's picture

6 Sep 2015 - 10:55 pm | श्रीगुरुजी

या धाग्याचे विडंबन करू का?

(आधीच परवानगी विचारतो म्हणजे नंतर रूसवेफुगवे नकोत)

अद्द्या's picture

6 Sep 2015 - 11:24 pm | अद्द्या

७ )

विडंबन करू का असे विचारायचे हि नसते . मिपावर तर कधीच नाही .
ते फक्त पाडायचे असते

श्रीगुरुजी's picture

7 Sep 2015 - 1:46 pm | श्रीगुरुजी

मी त्यांच्या एका लेखाचे आधीच विडंबन केल्याने ते रागावले आहेत. त्यात भर नको म्हणून आगाऊ परवानगी विचारली.

हेमंत लाटकर's picture

6 Sep 2015 - 11:10 pm | हेमंत लाटकर

इतरांच्या धाग्यांचे विडंबन करण्यापेक्षा छान लेख लिहावा.

श्रीगुरुजी's picture

6 Sep 2015 - 11:13 pm | श्रीगुरुजी

इतका छान लेख लिहिता येण्याएवढी प्रतिभा अंगी नाही. तस्मात विडंबनच बरे.

इतका छान लेख लिहिता येण्याएवढी प्रतिभा अंगी नाही. तस्मात विडंबनच बरे.
श्री गुरुजी हा तुमचा विनय आहे, केवळ प्रतिभाशाली माणुस च विनयाने असे म्हणतो.
आणि लाटकर साहेब
तुम्ही त्यांच्या विडंबनाच्या तेजाने च इतके पोळला तर लेख कसा पेलवेल तुम्हाला ?

मनिमौ's picture

6 Sep 2015 - 11:47 pm | मनिमौ

तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे.

चित्रगुप्त's picture

7 Sep 2015 - 12:19 am | चित्रगुप्त

आता नवरोबांनी बायकोबींना आणि बायकोबींनी नवरोबांना काय काय सांगू नये यावरही धागा यावा.

बायकोबी म्हणजे कोबी सारखी बाय का बाय सारखा कोबी?

पण तुम्ही एकंदर नवराबायको विषयी बोलत आहात हे गृहीत धरुन खालील यादी.......

नवरोबाने कोबीशी कधी बोलू नये. तिखट मिठ कमी जास्ती झाले असेल तरी मान खाली घालुन गुमान गिळावे.

आणि नवरोबांनी बायशी तर कधीही / चुकुन सुध्दा बोलू नये ती म्हणेल त्यावर गपगुमान मुंडी हलवावी आणि एकमताने सुखी संसार करावा.

बाय ने नवरोबाला काय वाटेल ते, वाटेल तसे आणि वाटेल तिथे बोलावे आणि आपल्या नजरेच्या धाकात ठेवावे.

माहेरचे लोक कसे चांगले (विशेषत: आई) आणि सासरचे लोक कसे द्वाड (विशेषत: सासू) हे सतत ऐकवत रहावे.

शेजार्यांनी / मित्रमंडळिंनी घरात काय काय वस्तू घेतल्या ज्या आपल्याकडे नाहीत याची यादी सतत त्याच्या तोंडावर फेकावी.

मैत्रिणींचे नवरे कसे त्यांच्या मुठीत आहेत, तू कसा द्वाड, नठाळ, वेडसर, भोळा आहेस, दुनियादारी तुला कशी समजत नाही. मी म्हणून कशी तुला सांभाळुन घेत राहते आहे, दुसरी कोणी असती तर कधीच सोडून गेली असती. इत्यादी गोष्टी नवरोबाला सकाळ दुपार संध्याकाळ अशा किमान तीन वेळा तरी ऐकवाव्याच .

नवरोबाला काहीही बोलण्याची कधी संधीच देऊ नये.

बाय ने आपल्या माहेरी तसेच आजूबाजूला घडणार्या अप्रिय / गैरसोइच्या गोष्टी नवरोबाला कधी सांगु नयेत.

तसेच सासरची मंडळी चूकून चांगले / निट / प्रेमळपणे वागले तर ते देखील नवरोबाला चुकुन सुध्दा सांगु नये.

आणि (स्वत:च्याच) एकमताने सुखी संसार करावा.

(गेली १५ वर्षे सुखाने संसार करणारा अनुभवी) (खालामुंडी) पैजारबुवा,

हेमंत लाटकर's picture

7 Sep 2015 - 10:24 am | हेमंत लाटकर

यासाठी धागा काढण्याची गरज नाही. लग्नाआधी केलेले प्रताप सांगायचे नाहीत.

मनीषा's picture

7 Sep 2015 - 11:02 am | मनीषा

तुम्ही चक्क, अज्ञानी मिपाकरांना फसवाफसवीचे ज्ञान देताय की ...

चांगलय म्हणा ...
आपण आपल्याला सोयीस्कर तसे वागावे, आणि दुसर्‍याला नैतिकतेचे उपदेश करावे. छान !
देव तुम्हाला मदत करो.

हेमंत लाटकर's picture

7 Sep 2015 - 12:18 pm | हेमंत लाटकर

आपण आपल्याला सोयीस्कर तसे वागावे, आणि दुसर्‍याला नैतिकतेचे उपदेश करावे.

हा उपदेश नाहीये. चित्रगुप्तांच्या प्रतिसादाला उत्तर आहे.

त्यामुळे मागणी तसा पुरवठा....

लाटकर ..... लिहिते रहा....

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Sep 2015 - 1:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान विचार रे हेमंता.त्या इण्द्राणीचे प्रकरण चालू झाल्यापासून सगळीकडेच "काय करावे काय करू नये' ह्यावर सगळीकडेच लेख येत आहेत असे ह्यांचे निरिक्षण.

वेल्लाभट's picture

7 Sep 2015 - 2:22 pm | वेल्लाभट

वाव. दॅट इज सो.....थॉट्टफुल....

सूड's picture

7 Sep 2015 - 2:28 pm | सूड

ओह आय सी!!

अरुण मनोहर's picture

7 Sep 2015 - 2:32 pm | अरुण मनोहर

लाटकर तुम्ही लिहा,

आजकालच्या फ़ेबू मूर्खाना जितके शिकवले तितके कमीच आहे!

हेमंत लाटकर's picture

7 Sep 2015 - 3:42 pm | हेमंत लाटकर

आजकालच्या फ़ेबू मूर्खाना जितके शिकवले तितके कमीच आहे!

फेबु मुर्ख म्हणजे

मम्बाजी सर्वज्ञ's picture

7 Sep 2015 - 2:42 pm | मम्बाजी सर्वज्ञ

मुर्ख लक्षणे?

पुणेकर भामटा's picture

7 Sep 2015 - 3:38 pm | पुणेकर भामटा

लाटकर साहेब तुमची शप्पथ घेऊन सांगतो , अगदी कुणाला म्हणजे कुणाला सांगणार नाही.

मिपावर दोन विभाग करावेत. एक विभाग 'नवे लेखन' आणि दुसरा विभाग 'नवे दर्जेदार लेखन'.

दोन्ही विभागांना त्यानुसार स्वतंत्र संपादक नेमावेत

नाव आडनाव's picture

7 Sep 2015 - 4:02 pm | नाव आडनाव

दोन्ही विभागांचे स्वतंत्र सदस्य असावेत.

प्यारे१'s picture

7 Sep 2015 - 6:05 pm | प्यारे१

जातींची उतरंड संपवू असं म्हणून होत नाही तोवर नवीन वर्ण आणि वर्ग व्यवस्था आणू पाहणार्‍या स्वॅप्स यांचा जाहीर निषेध.

कोणीही जन्मतः जर्दा आपलं दर्जा घेऊन येत नाही. कर्माधिष्ठीत दर्जा विकसित करावा लागतो.
वाक्यावाक्यानंतर आपला निषेध तीव्रतर होत जाणार आहे याची जाणीव ठेवा.

पुन्हा एकदा निषेध.
-जेपीकडून निषेध बोर्ड उसने आणलेला.

एस's picture

7 Sep 2015 - 6:23 pm | एस

आमचे परममित्र जे की श्री प्यारे१ यांना अनुमोदन. स्वॅप्स या आयडीचा तीर्व आपलं ते तीव्र निषेध.

इ तो हमार उदयन महाराज के जैसे हो गया! खुदही को विरोध जता रहा है|
-प्यारक पंडीत

हा तुमचा 'भास' ही असू शकतो. :-)

आय जस्ट मिस्स्स्स्स माय 'सर'!
सर तुमी कुते आहात?

कोणीही
आपला जर्दा जन्मतः घेउन येत नाही,
जर्दा तमाखु पान किवाम कमवावा लागतो.
हिम्मते मर्दा तो मदद दे जर्दा
आज समाजाला उत्तम प्रतीच्या जर्दा ची गरज आहे,
तो वेळेत मिळाला नाही तर खुर्दा अटळ आहे,

हेमंत लाटकर's picture

7 Sep 2015 - 5:59 pm | हेमंत लाटकर

मिपावर दोन विभाग करावेत. एक विभाग 'नवे लेखन' आणि दुसरा विभाग 'नवे दर्जेदार लेखन'.
दर्जदार लेखन कोण ठरवणार

अरे ठरवून ठरवुन ठरवणार कोण...
लाटकरांशिवाय हायच कोण...
लाटकर साहेब आगे बढो. दर्जा तुम्हारे साथ है.

हेमंत लाटकर's picture

7 Sep 2015 - 6:36 pm | हेमंत लाटकर

लाटकर साहेब आगे बढो. दर्जा तुम्हारे साथ है.
हा!हा!हा!

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.लाटकर सायबांचा सत्कार काहीच न देता ,करण्यात येत आहे.

-शुभेच्छुक -जेपी आणी तमाम रिक्तहस्त कार्यकर्ते.

कंजूस's picture

7 Sep 2015 - 7:36 pm | कंजूस

पंचसुत्री आवडली.
.
.
परंतू चांगले पैसे देणारा प्रकाशक मिळाला तर 'मनोहर नाहीरे'सुद्धा सांगा.

चैतन्यमय's picture

7 Sep 2015 - 7:54 pm | चैतन्यमय

तुमचे दुख: वाचून मला दु:ख झाले आहे.

जर लेख आवड्ला नाहि तर प्रतिक्रिया देउ नये , लेखक समजुन घेईल , पण एवढे टोचुन
का लिहावे? मला कळ्ले नाहि.