विचार

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

इस्पिक राजा's picture
इस्पिक राजा in जनातलं, मनातलं
3 Sep 2015 - 3:45 pm

आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीनृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजास्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियासमीक्षालेखअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भमदतवाद

दुष्काळवाडा ... भाग ६ घुसमट श्रावणाची……..

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
3 Sep 2015 - 3:28 pm

घुसमट श्रावणाची……..
shravan
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी,
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋूतू तरी
काळ्या ढेकाळांच्या गेला
गंध भरुन कळ्यात
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत

मांडणीविचार

नात्यातले लहान मोठे

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
3 Sep 2015 - 11:12 am

कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल. आणि तेव्हा मग जर का मोठ्यांनी लहानांसारखे वागले तर त्यांना पुन्हा ऎकून घ्यावे लागते की "लहानांना मोठे होऊन मोठ्यांना समजवावे लागते आणि कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते"

समाजजीवनमानविचारलेखअनुभव

दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरू द्या प्याला

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
2 Sep 2015 - 5:39 pm
मांडणीविचार

दुष्काळवाडा.... भाग ३ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
31 Aug 2015 - 5:55 pm

भाग १ भाग २
कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास
ऊस तोडणी

मांडणीविचार

अजब महाभारत

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
29 Aug 2015 - 11:57 pm

मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे.
'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे.
वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते.

संस्कृतीकलाधर्मइतिहासवाङ्मयकथाभाषासाहित्यिकसमाजजीवनमानराजकारणमौजमजाप्रकटनविचारआस्वादसमीक्षालेखमतमाहितीसंदर्भविरंगुळा

दुष्काळवाडा......... भाग-२ ढगात अडकला कृत्रिम पाऊस

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
29 Aug 2015 - 4:54 pm

हजारो कोटींची तातडीची मदत जाहीर करण्यापेक्षा कोटीत कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी राहते. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न म्हणून मायबाप राज्य सरकारने मराठवाड्यासाठी कृत्रिम पावसाचे केंद्र मराठवाड्याला दिले. पाऊस पाडण्याचं नियोजन कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केले. जुलैच्या पहिल्या महिन्यात झालेल्या या घोषणेला प्रत्यक्षात यायला ऑगस्टचा पहिला आठवडाच उजाडला.

मांडणीविचार

दुष्काळवाडा........

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
28 Aug 2015 - 3:43 pm

जेव्हा जेव्हा निसर्ग चक्र उलटे फिरते तेव्हा तेव्हा मराठवाड्यातील शेतकरी फासाचा दोर जवळ करतात. मागील एक वर्षात मराठवाड्यात सुमारे चारशेच्यावर शेतकNयांनी आत्महत्या केल्या. अजूनही हा सिलसीला थांबलेला नाही. सततच्या दुष्काळाने उद्धस्त झालेली शेती व्यवस्था आणि निष्क्रीय उपाय योजनांमुळे मराठवाड्याची ओळख साNया देशाला आत्महत्या करणाNया शेतकNयांचा दुष्काळवाडा म्हणून होईल की काय याची भीती वाटते.

मांडणीविचार

सांगलीकरांचे काही खास शब्द

दा विन्ची's picture
दा विन्ची in जनातलं, मनातलं
28 Aug 2015 - 3:21 pm

प्रत्येक गावाच्या बोली भाषेचा एक विशिष्ट ढंग /लहेजा असतो. बऱ्याचदा हे काही खास शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या गावाला गेल्याची अनुभूती येते. मिपा वरती तसे पुणेकर , मुंबईकर, कोल्हापूरकर आणि नागपूरकर व त्यांची भाषा आणि खास ढंग यावर बरेच धागे आहेत . खाली काही खास सांगलीचे शब्द आहेत. कोल्हापूर अगदीच शेजारी असल्याने काही शब्द दोन्हीकडेही असणे शक्य आहे .
वरकी = बटर
डबरा= खड्डा
डोस्क = डोके
इस्कुट = खेळ खंडोबा
बाउ = मटण
वज्ज = ओझे
शिप्पारस = शहाणपणा
गबस = गप्प बस
लांबड = साप
कानुला = करंजी
आदुगर = आधी
आडग = वेडा

संस्कृतीविचार