समाज

प्रसन्नतेच्या लहरी!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 May 2022 - 7:23 pm

नमस्कार. आजपर्यंत अनेक वेळेस मुलांना आकाशातल्या गमती दाखवल्या होत्या. वेगवेगळे तारे, ग्रह आणि चंद्रावरचे खड्डे बघताना मुलांच्या चेह-यावर येणारा आनंद आणि त्यांना होणारं समाधान नेहमीच अतिशय ऊर्जा देऊन जातं. 'ऑ! अरे बापरे!' 'ओह माय गॉड' अशी एक एक दृश्य बघतानाची मुलांची (आणि वयाने जास्त असलेल्या मुलांचीही) प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. त्यासारखाच पण थोडा वेगळा असा सुखद अनुभव आज घेता आला. निमित्त होतं परभणीतल्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामधल्या मुलांच्या सुट्टीतील शिबिरामध्ये घेतलेल्या ज्ञान रंजन अर्थात् fun and learn सत्राचं.

धोरणसमाजलेखअनुभव

कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
9 May 2022 - 10:59 am

कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर सादर करत आहे.

१५ एप्रिल ते १५ मे - काय हा भयानक उन्हाळा आहे, असा उन्हाळा आधी कधीच नव्हता! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

३० जून च्या आसपास - पहिला पाऊस झाला आणि नंतर गुल झाला पाऊस! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

३० जुलै - फार जास्त पाऊस झाला हो, थांबायचे नाव नाही.

३० जुलै - खांदेश-मराठवाडा-विदर्भ - पाऊस न्हयी शे औंदा! येक्दाच पल्डा मंग पाऊस गेला. आता टँकरच बोलवा लागते. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

समाजप्रकटन

अनुभवातील व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती -१

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
2 May 2022 - 6:35 pm

मनुष्य स्वभावाचे बरेच अजब नमुने निमसरकारी नोकरीत असताना पहायला आणि अनुभवायला मिळाले. भले, बुरे, खरे, ढोंगी, सरळ, वाकडे, वेडे, झपाटलेले ! काहीना काही आठवणी, ठसे मनात ठेवून गेलेले. त्यातल्या काहींची मनाने जपलेली नोंद इथे नोंदवण्याचा हा प्रयत्न .

समाजअनुभव

मी, मराठी आणि माझं मराठी असणं

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
1 May 2022 - 11:22 pm

हो. मी मराठी आहे.

म्हणजे नक्की कोण आहे? आणि मला मराठी का म्हणायचं? दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेली एक राजसि भाषा बोलतो, वाचतो, लिहितो म्हणून? की अपरांतापासून ते विदर्भापर्यंत आणि सातपुड्यापासून करवीरापर्यंत पसरलेल्या प्रदेशात राहतो म्हणून? पोहे, मोदक, पुरणपोळी, पिठलं, शिरा खातो म्हणून की घरी गणपती बसवतो, गुढी उभारतो, भंडारा उधळतो म्हणून?

भाषासमाजजीवनमानविचारलेख

खुनी डॉक्टर व तारणहार आडनावबंधू

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
21 Apr 2022 - 4:30 pm

अमेरिकेच्या नॉर्थ करोलीना राज्यातील एका गावात घडलेली ही सत्य घटना.

डॉक्टर बेंजामिन गिल्मर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून नुकतीच पदवी प्राप्त केली होती. आता त्यांची ग्रामीण भागातील एका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. डॉक्टरांनी त्यांचे शिक्षण कर्ज काढून घेतलेले होते. आताच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यास ते उत्सुक होते. मोठ्या उत्साहात ते संबंधित दवाखान्यात जाण्यास निघाले. तिथे पोचल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दवाखाना गेली चार वर्षे बंद केलेला होता. अधिक चौकशी करता त्यांना मिळालेली माहिती अजूनच थरारक व धक्कादायक होती.

समाजलेख

हसरे चेहरे

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
15 Apr 2022 - 1:33 pm

जीवनात कितीतरी लोक येतात,जातात.काही आठवणीत रहातात काहींचे विस्मरण होते.काहीच बोटावर मोजण्याइतपत व्यक्ती की ज्या चटका लावून जातात.त्यातील काही खुपच महत्वाच्या तर काही अगदीच नगण्य.
माणसाच्या स्वभावावर बरेच काही अवलंबून आसते.आशीच आमच्या सोसायटीतील कचरा उचलणारी बाई.कधीच गैरहजर नाही.दुर्मुखलेला,केविलवाणा चेहरा स्वताच्या गरिबीचे रडगाणे कधीच नाही.

समाजप्रकटनविचारसद्भावना

एकटेपणा- सत्य कथा

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
13 Apr 2022 - 6:08 pm

मी प्लॅटफॉर्मवर पोहचलो. भरपूर लोक दिसत आहेत. थोडी गर्दी आहे. पण माझ्यासारखा कोणीच नाही. मला एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. कोणीही माझ्यासारखा दिसत नाहीय. असह्य एकटेपणा! मला खूप अस्वस्थ व बेचैन वाटतंय. नकळत मी सारखा बघतोय कोणी माझ्यासारखा दुसरा आहे का.

किती तरी वेळ गेला. गर्दीतही मी एकटाच. भीड में भी अकेला. असह्य एकटेपणा मला अस्वस्थ करतोय. मनात विचार सुरू आहे की माझ्यासारखा दुसरा कधी येईल, कधी येईल.

समाजजीवनमानविचार

तो शहाणा होतोय....

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
28 Mar 2022 - 12:15 pm

एक जाहिरात आहे एका खाद्यतेलाची. त्यातल्या आईला नृत्याची आवड,पण संसारात अडकलेल्या तिला नृत्य करायला वेळ मिळत नाही. मुलगी खिन्न होते. आईला मदत कोणी करत नाही पण अमुकतमुक खाद्य तेल ती आई वापरते, आणि लगेच.. कढईभर तेलात साबुदाणा वडे तळते.(ते वडे चक्क कच्चे दिसतात.) एकाच जेवणात साबुदाणे वडे, पुलाव आणि पाच इतर पदार्थ भरुन टेबलवर ठेवते. नंतर फडक्याला हात पुसत, मुलीच्या खोलीत जाऊन नृत्याची पोझ घेते. (अशाच एका आधीच्या जाहिरातीत ती गृहिणी गायिका असते.) विशिष्ट खाद्यतेल वापरल्याने स्वयंपाक "लवकर" कसा काय होतो आणि गायन, नृत्यादी कला जोपासण्यासाठी वेळ कसा काय मिळतो हे मला कळले नाही.

मांडणीसमाजप्रकटनविचार

प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
20 Mar 2022 - 12:54 pm

प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!

नमस्कार. आपण सर्व कसे आहात? नुकताच कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्याबद्दलचे माझे विचार शेअर करतो. कदाचित आपल्याला काही मुद्दे पटतील आणि काही पटणार नाहीत. पण वेगवेगळे अँगल्स, विचार आणि दृष्टिकोन कमीत कमी विचारात तर घ्यायचे असतात ना. म्हणून हे शेअर करावसं वाटलं.

समाजजीवनमानप्रकटनप्रतिसाद

ठेचेचा दगड

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
19 Mar 2022 - 10:05 am

दगडाची ठेच लागता
रक्त येई पायात
कशास होता पडला
दगड असा रस्त्यात

कितीतरी असे अडले असती
ठेच लागून पडले असती
परी न कुणी विचार करती
फेकून द्यावा तो दगड कुठती

असाच आला वेडा कुणी
खाली वाकला तो झणी
उचलूनी दगड तो पायी
लांबवर कुठे फेकूनी देयी

- पाषाणभेद
१९/०३/२०२२

शांतरसकवितासमाज