सोशल नेटवर्क
"So are you Indian?"
स्पेनच्या उत्तर पश्चिम टोकाला असणार्या A Coruña ह्या छोट्याशा शहरातल्या Take Away काउंटर पलिकडे Soledad नावाचा बॅज लावलेल्या त्या मुलीने माझ्या चेहर्याकडे बघून मी भारतीय आहे हे ओळखलं ह्यात काय कौतुक? ह्यांना प्रत्येक brown माणूस भारतीय वाटणारच.
"Yes Soledad, I am."
"व्हॉत पार्त ऑफ इंदिया?"
"आय अॅम फ्रॉम अ सिटी कॉल्ड पूने." (माझा "पूने" उच्चार प्रश्नार्थक असतो)
ओSSSह पु"णे"??? (मी चाट!). "एम जी रोड? कोरेगांव पार्क?? दागडूशेट गानापती बाप्पा मोरया!!!"
"सो यू'व बीन टू पुणे?" (माझे उच्चार सुधारले!)