श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात:
स्वयें आत्महत्या करणे
तो तमोगुणl (2.6.10)
तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जगणे असंभव वाटून निराश झालेला व्यक्ति आत्महत्या करतो. भारतात पाउणे दोन कोटी लोक दर वर्षी आत्महत्या करतात. त्यात 80 टक्के साक्षर असतात. 15 ते 40 वय गटात सर्वात जास्त लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचा निर्णय करणार्याचा असला तरीही काही आत्महत्या करणारे दुसर्यांवर दोष लावतात. मी मरणार पण दुसर्यालाही ही शांतिने जगू देणार नाही ही तमोगुणी वृती. आत्महत्येचे प्रमुख कारण प्रपंचात अयशस्वी होणे अर्थात घरातील कटकटी, शिक्षण, प्रेम भंग, रोजगार, अहंकारला ठेस लागणे इत्यादि इत्यादि. माझ्या दृष्टीने खरे कारण काम, क्रोध, निद्रा, आळस, अवास्तव अहंकार, मनात येईल तसे वागणे, माझ्या हिशोबाने जगाने चालले पाहिजे, दिवस रात्र नकारात्मक विचार करत राहणे इत्यादीं तमोगुणांच्या आहारी जाऊन माणूस भ्रमिष्ट होतो. आजच्या भाषेत म्हणायचे तर डिप्रेशन मध्ये जातो आणि आत्महत्या करतो. त्यात सोशल आणि दृश्य मीडियात अपराध आणि आत्महत्येचे महिमा मंडन किंवा त्यावर अनावश्यक चर्चा ही तरुणांच्या मनातील नकारात्मक विचारांना उत्तेजित करते. तरुणांच्या आत्महत्येचे एक कारण शैक्षणिक संस्थामध्ये पसरलेली नकारात्मक विचारधारा. तरुणाला वाटू लागते आजच्या सामाजिक व्यवस्थेत त्याच्या सारख्या तरुणांचे शोषण होत आहे. या काल्पनिक अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ति त्यात नाही त्यापेक्षा मरणे बेहतर. अश्या नकारात्मक विचारधारेच्या आहारी जाऊन रोहित वेमुला सारखे शिक्षित ही आत्महत्या करतात. असो.
प्रतिक्रिया
17 Feb 2023 - 5:01 pm | चित्रगुप्त
निराशा - डिप्रेशनची शेवटली पायरी म्हणजे आत्महत्या.
जगातील करोडो लोक निराशेचे शिकार असतात. बहुतेकांना अगदी सौम्य निराशा असते, त्यामुळे ती स्वतःच्या वा इतरांच्या लक्षात येत नसली तरी कालांतराने तिचे पर्यवसन गंभीर निराशेत होऊ शकते. यावर स्वतः करण्याचा उपाय सांगणारे खूप चांगले पुस्तक माझ्याकडे आहे. आत्ता नाव विसरलो आहे. हुडकून सांगतो.
निराशा, उदासी, निरुत्साह, दुश्चित्तपणा वगैरेंवर दासबोधात आणखी काही उतारे असतील तर अवश्य द्यावेत.
17 Feb 2023 - 8:10 pm | भागो
आत्महत्या करावीशी वाटणे हा मानसिक रोग आहे. त्याला दासबोध वाचणे हा उपचार नाही. आपल्या जवळपास जर असा कोणी रूग्ण वावरत असेल -निराशा डिप्रेशन- इत्यादि तर त्याला कृपा करून पुढील क्रमांकांशी संपर्क साधायला उद्युक्त करा.
Call us on +91 84229 84528 / +91 84229 84529 / +91 84229 84530
17 Feb 2023 - 11:19 pm | चित्रगुप्त
इथे दिलेले क्रमांक - Psyco-Therapists चे आहेत की Psychiatrists चे आहेत, आणि ते कोणत्या शहरातील आहेत हे कृपया कळवावे.
दासबोध-पठण हे एक कर्मकांड म्हणून न करता नीट समजून घेत, आवडीने मनःपूर्वक केलेला अभ्यास असेल तर अश्या व्यक्तीच्या जीवनात निराशा-डिप्रेशन-आत्महत्येचा विचार वगैरे कधी येणारच नाहीत हे स्वानुभवाने सांगतो.
मी उल्लेखिलेले खालील पुस्तक खूप उपयोगी, उद्बोधक आणि मननीय आहे.
18 Feb 2023 - 12:58 am | भागो
हे क्रमांक कुणाचे आहेत ह्याची मला कल्पना नाही. एका न्यूज पोर्टल आत्महत्येची बातमी असली की खाली हे नंंबर दिलेले होते. कदाचित एखाद्या सेवाभावी संस्थेचे सुद्धा असू शकतात. जर माझा प्रतिसाद अयोग्य असेल तर वेबमास्तरांनी अवश्य उडवून लावावा.
मी ते नोट करून ठेवले होते. हे क्रमांक विसरून जा. मला एव्हढेच म्हणायचे आहे कि चागल्या Psyco-Therapists/Psychiatrists सल्ला घ्यायला पाहिजे.
दासबोध-पठण...आत्महत्येचा विचार वगैरे कधी येणारच नाहीत.>>छान.
आता दासबोधा विषयी बोलायचे तर इतकेच सांगतो कि मी दासबोधाची कितीतरी पारायणे केली आहेत. हा एक महान ग्रंथ आहे यात संशय नाही. आमच्या घरी ती एक परंपराच होती. मनाचे श्लोक, करुणाष्टक ,सवाया, आणि इतर रामदासी नित्य नेम ह्यांच्यातच मी लहानाचा मोठा झालो आहे.
पण स्क्रिझोफेनिया डिप्रेशन हे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहेत. हातावर मोजण्या इतक्या लोकाना ह्याचा त्रास होतो. जगात बहुसंख्य लोकांची वागणूक "नॉर्मल " असते. त्यांना दासबोध नावाचा ग्रंथ अस्तित्वात आहे ह्याची कल्पना पण नसेल. तरीही ते आशावादी असतात.
पण मुद्दा हा नाहीये. मनोरुग्ण लोकांनी आणि त्यांच्या नाते वाईकांनी काय करावे हा आहे. त्यांनी दासबोध वाचावा कि Psyco-Therapists/Psychiatrists चा सल्ला घ्यावा हा आहे.
प्लीज अस काही लिहून मनोविकारांना ट्रिव्हिअलाइझ़् करू नका. मी असे काही रुग्ण अगदी अगदी जवळून बघितले आहेत. म्हणून तळमळीने लिहितो आहे.
18 Feb 2023 - 3:10 am | चित्रगुप्त
मनोचिकित्सकांकडे जावे याबद्दल शंकाच नाही, सर्वच शास्त्रांप्रमाणे मनोचिकित्सा शास्त्रही नवनवीन क्षितिजे उलगडत प्रगती करत आहेच.
मात्र Psychiatrists चिकित्सकांचा भर औषधे देण्यावरच असतो, त्यातून मूळ रोग बरा होतो की नाही हा एक प्रश्नच आहे.
याबद्दल एक फसलेले उदाहरण माझ्या शेजार्याचे बाबतीत घडलेले मी जवळून बघितलेले आहे. सदर इसम जन्मभर रेल्वेत व्यवस्थित नोकरी करून रिटायर झाल्यावर काही वर्षांनी त्याच्या मुलाला उत्तम नोकरी लागली. वडिलांनी प्लॉटवर बांधलेले घर त्याला जुनाट, मागासलेले वाटू लागले, आणि ते विकून सोसायटीचा आधुनिक फ्लॅट घेण्याचा त्याने लकडा लावला. त्याच्या आईची पण त्याला साथ होती, मात्र वडिलांची घर विकण्याची इच्छा नव्हती. इतक्या वर्षांपासून रहात असलेले, पुढे-मागे अंगण, मोठी गच्ची असलेले स्वतः कष्टाने बांधलेले मोकळेचाकळे घर सोडण्याची कल्पनाही त्याला नकोशी वाटत होती. परंतु बायको आणि मुलासमोर मान तुकवून त्याने ४० लाखात घर विकले, ती सगळी रक्कम आणि मुलाने घेतलेले कर्ज मिळून एक कोटीहून जास्त किमतीचा फ्लॅट घेऊन तिकडे रहायला गेले. नवीन फ्लॅट मधे एका खोलीत रहायचे, आंगण, गच्ची, शेजारचे मित्र वगैरे काही नाही, आणि आयुष्यभराची मिळकत खर्चून घेतलेले घर मुलाच्या नावाचे. याचा त्याच्या मनावर परिणाम होऊन तो हळू हळू नैराश्यग्रस्त झाला. एक-दोनदा आत्महत्येचा प्रयत्न विफल झाला. मग अपोलो हॉस्पिटलात Psychiatrists चा इलाज सुरू झाला. दररोज न चुकता औषधे घ्यावी लागायची.औषधामुळे गुंगी येऊन पडून रहायचे, गुंगी उतरली की परत औषध. यांना केंव्हाही कुठेही अजिबात एकटे सोडायचे नाही असे डॉ. ने बजावलेले होते. असा काही काळ गेला. एक दिवस बायकोच्या नकळत लिफ्टने खाली गेला, आणि त्यानंतर कुठे गेला याचा अद्याप पत्ताच लागला नाही. या घटनेला आता बरीच वर्षे झालेली आहेत.
कुठलीतरी जाहिरात वाचून अनोळखी मनोचिकित्सकाकडे अजिबात जाऊ नये, असे सांगावेसे वाटते.
18 Feb 2023 - 8:04 am | भागो
कुठलीतरी जाहिरात वाचून अनोळखी मनोचिकित्सकाकडे अजिबात जाऊ नये, असे सांगावेसे वाटते.>>> ह्याच्याशी पूर्ण सहमत आहे.
शाररीक व्याधीसाठी आपण ताबडतोब डॉक्टरकडे जातो. तसेच मानसिक व्याधींसाठी करावे. ह्या वर औषधे केवळ इमर्जन्सी साठी वापरावीत. पण दूरगामी परिणामांसाठी अॅॅनॅॅलीस्टची मदत घ्यावी.
हे मा वै म.
17 Feb 2023 - 9:25 pm | Trump
भारतात पाउणे दोन कोटी लोक दर वर्षी आत्महत्या करतात.????
17 Feb 2023 - 9:29 pm | Trump
https://ncrb.gov.in/sites/default/files/ADSI-2021/adsi2021_Chapter-2-Sui...
Number of Suicides, Growth of Population and Rate of Suicides during 2017 - 2021
Sl.No. | Year | Total Number of Suicides | Mid-Year Projected Population (in Lakh+) | Rate of Suicides (Col.3/Col.4)
1 | 2017 | 1,29,887 | 13091.6 |9.9
2 | 2018 | 1,34,516 | 13233.8 |10.2
3 | 2019 | 1,39,123 | 13376.1 |10.4
4 | 2020 | 1,53,052 | 13533.9 |11.3
5 | 2021 | 1,64,033 | 13671.8 |12.0
17 Feb 2023 - 10:08 pm | भागो
पावणे दोन कोटी ? हा आकडा बरोबर नाही ना? पावणे दोन लाख?
18 Feb 2023 - 8:09 am | भागो
जगात दरवर्षी जवळपास दहा लाख लोक आत्महत्या करतात.
Approximately 1 million people worldwide die by suicide each year. With a prevalence rate of 0.0145% and suicide accounting for 1.5% of death by all causes, it is the 10th leading cause of mortality worldwide (Hawton and van Heeringen 2009). Suicide is complex, multifactorial behavioral phenotype. Suicide is also familial: a family history of suicide increases risk of suicide attempts and completed suicide.
18 Feb 2023 - 10:19 am | भागो
दासबोध जरूर वाचा.
त्याबरोबर
१) "जब वुई मेट " हा पिक्चर बघा.
२)It's a Wonderful Life is a 1946 American Christmas fantasy drama film produced and directed by Frank Capra.
हे दोनी सिनेमे तुम्हाला कसे जगावे आणि आत्महत्या का करू नये ह्याची शिकवण देतील.
18 Feb 2023 - 10:53 am | सोत्रि
लेखाचं शिर्षक छान आहे पण लेख विस्कळीत आहे. नेमकं काय म्हणायचं हे स्पष्ट होत नाही.
एक चांगला विषय मांडणी अभावी निसटून गेला.
- (रामदासी) सोकाजी
18 Feb 2023 - 3:22 pm | विवेकपटाईत
पाऊणे दोन लाख लिहायचे होते चुकीचे कोटी लिहल्या गेले.