Skip to main content

समाज

कॅलेंडर

लेखक आजी यांनी मंगळवार, 21/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कुठेही एखादा फाॅर्म भरायला गेलो तर त्यात तारखेचा रकाना असतोच. आपली स्मृती आपल्याला दगा देते आणि आपल्याला नेमकी त्यादिवशीची तारीख आठवत नाही. मग आपण समोर पाहतो. तिथं भिंतीवर कॅलेंडर असतं. ते पाहून आपल्या ला तारीख आठवते,आपण ती लिहितो. कॅलेंडर अर्थात् दिनदर्शिका अशी एक उपयुक्त वस्तू आहे. दिनदर्शिका ह्या विविध प्रकाशनसंस्थांच्या, विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात.

वार्तालाप : (4) आत्महत्या एक तमोगुण

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 17/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात: स्वयें आत्महत्या करणे तो तमोगुणl (2.6.10) तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जगणे असंभव वाटून निराश झालेला व्यक्ति आत्महत्या करतो. भारतात पाउणे दोन कोटी लोक दर वर्षी आत्महत्या करतात. त्यात 80 टक्के साक्षर असतात. 15 ते 40 वय गटात सर्वात जास्त लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचा निर्णय करणार्‍याचा असला तरीही काही आत्महत्या करणारे दुसर्‍यांवर दोष लावतात. मी मरणार पण दुसर्‍यालाही ही शांतिने जगू देणार नाही ही तमोगुणी वृती.

प्रेम दिन : मिठी : काही क्षण कथा

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 14/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने गायीला मिठी मारली. गायीने त्याला शिंगे मारली. ..... डॉक्टर काकांनी बायकोला नवी पैठणी गिफ्ट केली. प्रेमदिन साजरा केला. त्याने तिला मिठी मारली. तिने त्याच्या मुस्कटात मारली. हवालदार ने शिट्टी वाजवली. .....त्याच्या बापाने वकिलाची फी भरली. त्याच्या मिठीत ती सुखावली. ... .. अबार्शनच्या लाईनीत उभी राहिली. मौजेसाठी तिला घेऊन तो बगीच्यात गेला. धर्मरक्षक आले..... लग्नाच्या बेडीत अटकला. आमच्या काळी नव्हता डे. मिठी कुणाला मारली नव्हती. खुन्नस की बोर्डवर काढली.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वस्तीशाळेवरचा अनुभव

लेखक मार्गी यांनी बुधवार, 08/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
✪ शाळा सोडून जाणा-या शिक्षिकेद्वारे विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शनाचं आयोजन ✪ ८० हून अधिक मुलं, ३५ हून अधिक पालक, शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग ✪ बलून प्रज्वलनाद्वारे सत्राची सुरुवात! ✪ औरंगाबादच्या लाडसावंगीजवळ गवळीमाथा येथील सुंदर आकाश ✪ ग्रह, तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ आणि "शाळा चांदोबा गुरुजींची" ✪ धुमकेतू बघण्याचा दुर्मिळ अनुभव आणि डोळ्यांची तपासणी! ✪ समंजस ग्रामस्थांचा आणि उत्साही विद्यार्थ्यांचा सहभाग ✪ विद्यार्थी नव्हे, ही तर सावित्रीची लेकरं! ✪ अंधारलेलं आकाश पण अनेक उजळलेल्या चांदण्या सर्वांना नमस्कार. औरंगाबादमध्ये काल दि.

वास्तुशांती ते मनःशांती

लेखक देवू यांनी बुधवार, 08/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राने त्याच्या गावी बऱ्याचदा येण्याचा आग्रह केला होता. एकतर त्याचे गाव बरेच दूर होते आणि हातात असलेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस सुट्टी काढून जाण्याचा योग येत नव्हता. यावेळेस त्याच्या घराची वास्तुशांती असल्याने त्याचे आमंत्रण स्वीकारले. त्यानिमित्ताने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष जवळून बघण्याचा अनुभव घ्यायला मिळणार होता. हातातील कामे थोडे जास्त वेळ काम करून पूर्ण केली. सकाळची सहाची बस पकडली आणि दुपारी दोन वाजता मित्राच्या गावी पोहोचलो. बस स्टॅन्ड पासून त्याचे घर चालत फार तर दहा मिनिटाच्या अंतरावर होते, तरीही मित्राने मला घ्यायला गाडी पाठवली होती.

शंभर अदाणी हवे आहेत…

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 06/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.

सावज-शशक(शत शब्द पेक्षा थोडेच जास्त)

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 06/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
ती- तू माझे व्हाट्सअप संदेश बघितले आणी तेंव्हापासून डोके फिरल्या सारखे वागतोयस. दररोज कटकट,भांडणे, वैताग आलाय.... ती- मी कितीवेळा सांगीतले तू समजतोस तसे काहीच नाही. तो-त्याला बागेत बोलव,प्रथम लांबून बघेन आणी मग काय करायचे ते ठरवेन ...... तो दुर कोपर्‍यात आडोशाला बसून सावजाची वाट बघत बसला होता. अचानक,पंजाबी पोशाख,चंदेरी केसांची फॅशनेबल बाॅयकट,ओठावर हल्की गुलाबी लिपस्टिक,रंग पोतलेला चेहरा अशी एक सौंदर्यवती त्याच्याच दिशेने येत होती. अचानक तिने त्याला आवाज दिला, "ए तू पेठेतला रोहनच ना! ऐकोणसत्तर बॅच...नुमवी.... मी "भवानी", तुझ्याच वर्गातली..." अय्या..!!!!

वेताळ टेकडी-ए आर ए आय टेकडीचा सत्यानाश

लेखक अनंतफंदी यांनी सोमवार, 06/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी पाय मोकळे करावे म्हणुन म्हटले जरा लांबवर फिरायला जावे. कौतुकाने कोथरुडच्या वेताळ टेकडी/परमहंस्/ए आर ए आय टेकडीवर फिरायला गेलो. बरीच मंडळी वरच्या दिशेने चढत होती. चढावर तुरळक झाडी होती. पण म्हटले सध्या हिवाळा आहे, पावसाळ्यात पुन्हा हिरवेगार होईलच की. वर जाऊन भिंतीपलीकडे गेलो मात्र सगळी कडे धूर पसरलेला दिसत होता. कोथरुड कचरा डेपो एका बाजुला असल्याने पहीले वाटले त्याचा- धूर असावा. पण नाही, पुढे गेल्यावर लक्षात आले की काही हौशी थेरडे मुद्दाम थिकठिकाणी गवत एकत्र करुन जाळत होते. विचारले का? तर म्हणे आम्ही ईथे खूप झाडे लावली आहेत, ती जागा मोकळी व्हावी म्हणुन.

विहीर

लेखक आजी यांनी सोमवार, 06/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
"विश्वास ठेवा अगर ठेवू नका,पण हे सत्य आहे." मी आता जी हकीकत सांगणार आहे,तिची सुरुवात वर दिलेल्या टिपिकल वाक्याने करावी असा मोह मला होतोय. पण तशी मी करत नाहीये. मी तर म्हणेन "विश्वास ठेवाच. कारण ही सत्य आहे. कारण मी हे डोळ्यांनी पाहिले आहे. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यासारख्या शहरांचाही त्यावेळी आजच्याइतका विस्तार झाला नव्हता. त्याच पुण्याजवळचं एक खेडं. ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारं. लहानशी वस्ती. त्या एरियात जमीन स्वस्त मिळायची. आता ती जागा अगदी मध्यवर्ती समजली जात असेल. माझ्या ओळखीचं एक जोडपं. दिलीप आणि प्रतिमा. प्रतिमा माझी मैत्रीण.

सुचलेले विषय पण हुकलेले लेखन

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 01/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
नियमित लेखनाचा छंद लागला की कालांतराने एक समस्या जाणवू लागते - लेखनासाठी नित्य नवे विषय सुचणे. आपल्या वाचन, मनन आणि निरीक्षणातून मनात अनेक ठिणग्या पडतात आणि त्यातून अनेक विषय मनात रुंजी घालतात. पण त्यातला लेखनासाठी कुठला विषय गांभीर्याने निवडावा यावर मनात बरेच दिवस द्वन्द्व होते. अशी संभ्रमावस्था बराच काळ चालते आणि मग अचानक एखादा विषय मनात विस्तारू लागतो. तो विषय आळसावर मात करून नेटाने पुढे रेटला तरच त्याचा लेख होतो. लेखकाच्या मनात घोळत असलेल्या अनेक विषयांपैकी किती विषयांचे लेखन पूर्ण होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे.