सावज-शशक(शत शब्द पेक्षा थोडेच जास्त)
ती- तू माझे व्हाट्सअप संदेश बघितले आणी तेंव्हापासून डोके फिरल्या सारखे वागतोयस.
दररोज कटकट,भांडणे, वैताग आलाय....
ती- मी कितीवेळा सांगीतले तू समजतोस तसे काहीच नाही.
तो-त्याला बागेत बोलव,प्रथम लांबून बघेन आणी मग काय करायचे ते ठरवेन ......
तो दुर कोपर्यात आडोशाला बसून सावजाची वाट बघत बसला होता.
अचानक,पंजाबी पोशाख,चंदेरी केसांची फॅशनेबल बाॅयकट,ओठावर हल्की गुलाबी लिपस्टिक,रंग पोतलेला चेहरा अशी एक सौंदर्यवती त्याच्याच दिशेने येत होती. अचानक तिने त्याला आवाज दिला,