(पाट्या) :/
सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं.
आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या
बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे
गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या
पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी
उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या.
अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या
वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या
लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल
नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या