बेसरकार...
17 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या रावळपिंडीचे विभागीय आयुक्त असलेल्या लियाकत अली चट्टा यांनी पाकिस्तानातच नव्हे तर आख्ख्या जगात खळबळ उडवून दिली !!! दहा बारा दिवसापासून पाकिस्तानात व्यवस्थेचा नंगा नाच सुरु आहे. राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्याची मत मोजणी सुरु झाल्यावर तिकडे धुमाकुळ सुरु झाला. इम्रानखानला आधीच तुरुंगात ठेवले आहे. त्याचा पक्ष मोडीत काढला. चिन्ह गोठवले. पुन्हा कधी निवडणूक लढण्याचे धाडस केले नाही पाहिजे अशी तजवीज करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात भलतंच घडलं. आम जनतेने त्यालाच डोक्यावर घेतले. त्याचे उमेदवार अपक्ष लढले. आणि सर्वाधिक संख्येने निवडून देखील आले.