मंडळी,
चर्चेसाठी एक रोचक विषय आहे. न्यायाधीशांना अक्कल शिकवणारे, अधिक्षेप करणारे वकील असंख्य असतात. पण वकीलांना सूतासारखे सरळ करणारे न्यायाधीश पण विरळाच...
मला न्यायालयीन कामकाजाच्या क्लिपा बघायचा छंद लागला आहे. त्यात हे एक न्यायाधीश महाशय सापडले. ते कायम अशा रूद्रावतारातच कोर्टरूममध्ये दिसतात.
त्यांच्या पुढील मुलाखतीत ते म्हणतात, कोर्टात दाव्यांचा महास्फोट झाला आहे. हे एक प्रकारे चांगलेच आहे. कोर्टातल्या दाव्यांची संख्या आणखी वाढायला हवी.
पण कोर्टातल्या दाव्यांची संख्या वाढणे हे समाजाला स्वास्थ्य मिळवून देईल का?का त्यामुळे फक्त वकीली व्यवसायाला चांगले दिवस येतील?
असे "रुद्रावतारी" न्यायाधीश प्रत्येक कोर्टात असावेत का?
२:०० मि० पासून https://www.youtube.com/watch?v=BRCCBU0KPnA