सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं.
आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या
बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे
गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या
पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी
उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या.
अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या
वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या
लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल
नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या
फ़्रीज झालेल्या, दमलेल्या, दोस्त-लोकांच्या तारखा,
अन, गझलेत गुंतून 'बसल्यावर' कंठभरल्या पाट्या
प्रतिक्रिया
23 Jun 2023 - 10:04 am | गवि
वाह सर. क्या बात है.
23 Jun 2023 - 5:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या 'वाट्यां'मुळे 'पाट्या' फूटल्या.
आभार.
-दिलीप बिरुटे
23 Jun 2023 - 10:40 am | Bhakti
आवडलीच!
23 Jun 2023 - 11:52 am | प्रचेतस
डिप्रेसलेली कविता.
23 Jun 2023 - 12:01 pm | Trump
छान लिहीले आहे सर. मी शक्यतो कविता वाचत नाही. तुमचे नाव बघुन धाग उघडला.
23 Jun 2023 - 12:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
गविंच्या वाट्यांनी बराच धुरळा उडवलाय वाटते!!
अन, गझलेत गुंतून 'बसल्यावर' कंठभरल्या पाट्या दंडवत!!
23 Jun 2023 - 12:08 pm | पंचक
पहिल्या ओळीनंतर लेखकाला मिलाक्राने ग्रासले असावे अशी शक्यता वाटली. थोडं पुढे जाऊन तो स्मरणरंजनात रमलेला दिसतो. तर शेवटी मित्रही पांगल्यावर(का ते लेखकच जाणो.) एकटाच 'बसून' आत्मपरिक्षण करीत असावा की काय अशी भोळी आशा वाटली. (मात्र खरंच तसं असेल तर मात्र तहे दिलसे शुभेच्छा)
23 Jun 2023 - 12:51 pm | अहिरावण
फार दिवसांनी जोरात वाजली.
23 Jun 2023 - 1:01 pm | इपित्तर इतिहासकार
पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी
उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या.
23 Jun 2023 - 5:31 pm | कंजूस
पाट्या मंतरलेल्या.
23 Jun 2023 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया लिहिणा-यांच्या उत्साह वाढविणा-या आहेत.
मूळ कवी, सर्व वाचक, प्रतिसादकर्ते, मनापासून आभार.
-दिलीप बिरुटे
(पाट्यावाला)
25 Jun 2023 - 9:50 pm | प्राची अश्विनी
:):):)
17 Nov 2023 - 5:30 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदर सुरेख ..... !
किती चित्रदर्शी !