आपण यांना का खाल्लंत ?
पूर्वी, दूरदर्शनवर संध्याकाळी, 'आपण यांना पाहिलत का ?' या नांवाचा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवणारा कार्यक्रम असे. त्यांत काही चेहेरे इतके भेसूर असत की माझ्या एका मित्राने, या कार्यक्रमाचे नांव, 'आपण यांना का पाहिलंत ?' असे ठेवले होते. पुढे अनेकवेळा बेचव वा विचित्र चवीचे अन्न खाल्यावर माझ्या मनांत, आपण यांना का खाल्लं ?' असा प्रश्न उभा रहात असे. तर अशा काही आठवणी सांगायचा बेत आहे. वाचक त्यांत आपापली भर घालतीलच.