एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
3 May 2015 - 1:30 pm

बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)

एक लाडोबा सोडला तर आम्ही तिघही पिंपरी-चिंचवडबद्दल अगदी पुर्ण परिचयाचे असल्याने कुठे भेटायचं हे आधीचं ठरलेलं होतं. काल दुपारी लाडोबाला फोन केला तेव्हा, "मी ना अग्गदी ३.३० ला वेळेत निघतो म्हणजे दोन अडिच तासात चिंचवड ला पोहचेन" असं म्हणाला. प्रत्यक्षात फक्त एक तासाचा उशिर करुन श्री. लाडोबा सर ठाण्याहुन निघाले. चिंचवडला उतरणार होता त्याऐवजी कपिलमुनिंनी त्याला तळेगावलाचं उतरवलं आणि गाडीत घालुन प्राधिकरणामधे आणलं. (लाडोबानी तळेगावला उतरावं म्हणुन अणाहिता चिंचवडला काळे झेंडे वगैरे घेउन उभ्या आहेत असा त्याचा समज करुन देण्यात आला असं आमच्या वि-श्वसनिय आणि गोप-निय सुत्रांकडुन समजलेलं आहे. ;) )

त्यांना थोडी वाट पहायला लावुन मी सुद्धा एक दहा-पंधरा मिनिटात तिथे भेटायला पोचलो. ह्या आधी कधीही एकमेकांना भेटलेलो नसुनही अगदी एका फटक्यामधे एकमेकांना ओळखलं. आयडीच्या नावावरुन किती फसायला होउ शकतं ह्याचा अनुभव काल परत घेतला. कपिलमुनी एखादे ४०-४५ वर्षांचे सद्गृहस्थ असतील अशी समजुत होती, हा तर चक्क समवयीन निघाला. टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की. हाय-हेलो करुन गाड्या-बिड्या पार्क करुन समोरचं असणार्या चि.सौ.कां. गीता पावभाजी सेंटरमधे जरा श्रमपरिहारासाठी गेलो. एकमेकांशी ओळख वगैरे करुन घेतली आणि मोदकाला फोन केला. मोदक जरा कामामधे असल्याने थोडा उशिरा येणार होता. इकडे कपिलमुनि, लाडोबा आणि माझं गाड्या, मिपा आणि मिपाकर ह्यांच्यावर गप्पा रंगल्या. तीन जणांनी कॉफी, चहा आणि लेमन सोडा असा त्रिरंगी मेनु संपवला त्यानंतर बराचं वेळ वेटरचा अंत बघुन मग टेबल रिकामं केलं. दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! ;) मोदक आणि आम्ही सगळे वाल्हेकरवाडीमधल्या रानमळा मधे भेटायचं ठरवलं होतं तिकडे कुच केलं.

रानमळामधे जाउन स्टार्टर्स जेमतेम संपेपर्यंत बुलेटवाले मोदकबाबा बुलेटसंप्रदायी अवतारामधे प्रकट झाले आणि मग खर्‍या अर्थानी गप्पांचा कट्टा रंगायला सुरुवात झाली. गाड्या, ट्रेक्स, भ्रमंती, मिपावरचे आयडी आणि त्यांच्या सवयी, लेखं आणि अनुभव वगैरे वगैरेंचे विषय सटासट बदलले जात होते. कालच्या गप्पांमधुन "केल्याने देशाटन" ह्या म्हणीची प्रचिती आली. जरा वेळानी झणझणीत गावरान चिकनची थाळी वगैरे मागवली. चविष्ट चिकनबरोबर गप्पांची चव द्विगुणीत झाली. (लाडोबानी थोडसं हाश-हुश करत का होईना पण खाल्लं ;) ). वयोगट आणि जवळपास समविचारी असल्यानी सगळे जण पहिल्यांदाच भेटत असुनही अगदी मोकळेपणानी गप्पा मारत होते. मोदक आणि कपिलमुनी ही दोघं लोकं सतत कुठेना कुठेतरी ट्रिपला जात असतात (शेप्रेट) अशी माहिती मिळुन बरीचं जळजळं झाली. गप्पा मारत असतानाचं बुवांचा कर्वेनगरहुन फोन आला, त्यांच्याशी जरा फोनवर गप्पा मारल्या. प्रत्यक्ष नाही तरी बुवांनी सुक्ष्मदेहानी हजेरी लावली असं म्हणायला हरकत नाही. गप्पा हाणत असताना टकाला एकदम आपल्याला पुण्यात नातेवाईकांच्या घरी जायचं आहे ह्याची आठवण झाली. त्याला पुण्यात धनकवडीला सोडायची जबाबदारी मी घेतलेली होती. आणि टक्या पत्ता चुकुन चुकल्यानी ती जागा धनकवडी नसुन फुरसुंगी आहे असं बर्‍याचं उशीरा लक्षात आलं. ए बाबा, हवं तर तुला ठाण्याला सोडतो पण फुरसुंगीला वगैरे सोडणार नै ज्जा अशी धमकी दिल्यावर टक्या पार रडवेला झालेला. (अनाहितांच्या ताब्यात देतो अशी धमकी देणार होतो पण उगीचं रडला बिडला अस्ता तर काय घ्या म्हणुन मोह आवरला. ) ;) ;) ;)

शेवटी त्यानी धनाजी वाकडे उर्फ स.गा. ला फोन केला आणि त्याची उतरायची सोय केली. (टक्याला आधी सगा नी येउ नको असं सांगीतलयं असं सांगुन आम्ही बराचं त्रास दिला. फायनली सगा कडे सोय झालीये हे कळल्यावर मात्र मग जरा थंडावला.) यथेच्चं जेउन प्रत्येकी तीन-तीन भले मोठे ग्लास सोलकढी ढोसली आणि हातपाय पसरुन परत गप्पा सुरु झाल्या. आठ साडेआठला ज्या गप्पा मारायला सुरुवात केलेली ते रात्री जवळ जवळ सव्वा अकरा साडे अकरा पर्यंत गप्पा कश्या रंगल्या हे समजलं सुद्धा नाही. शेवटी अगदी हाटेलमालकानी हाकलायला नको म्हणुन नाईलाजानी बाहेर पडलो. परत पार्किंगमधे बुलेट बद्दल दहा-पंधरा मिनिटं गप्पा रंगल्या. पुढे एकत्र प्रवासाचे थोडे फार बेत आखुन परत भेटायचे प्लान करुन कट्ट्याची सांगता झाली.

टक्याचं पुढे काय झालं? सगानी टक्याला घरात घेतलं का? हे वाचण्यासाठी आज वल्ली, बुवा, सगा आणि टक्याचा आत्ता पुण्यात कट्टा चालु आहे त्याचा वृत्तांत वाचावा लागेल. स्टे ट्युन्ड!!

असो. मिपामुळे असे विविध क्षेत्रामधले, समविचारी मित्र मिळाले ह्याचा आनंद वाटतो. मिपाकरांच्या भेटीचे असे प्रसंग वारंवार येवोत हिच एक इच्छा व्यक्त करुन धागा संपवतो.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 May 2015 - 1:42 pm | ज्ञानोबाचे पैजार

फोटु नाही तर कट्टा नाही.

पुन्हा एकदा कट्टा करा.

पैजारबुवा,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2015 - 1:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)

पुन्हा एकदा कट्टा करा

आयोजन करा ;)

मुंबैच्या एका कट्ट्याला हजर होता तो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2015 - 9:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटु नाही तर कट्टा नाही.
विषय संपला.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

3 May 2015 - 2:03 pm | पैसा

फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही.
(टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2015 - 2:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही पर्वाच चेपु वर माझा फोटु लैक केलेला आहे. त्यामुळे मी अस्तित्वात आहे ह्यावर शंका नसावी ;)

पैसा's picture

3 May 2015 - 3:52 pm | पैसा

फेस्बुकावर हेमामालिनीचा फोटो आपला म्हणून टाकणार्‍या पण माहीत आहेत. आहेस कुठे! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2015 - 6:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:21 pm | टवाळ कार्टा

फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही.
(टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी
बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 3:17 pm | टवाळ कार्टा

ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))

ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

पैसा's picture

5 May 2015 - 3:25 pm | पैसा

ते जमेल नक्की!

नाखु's picture

3 May 2015 - 2:04 pm | नाखु

हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे.
सबब
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन.

गपचिप नाखु

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2015 - 2:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

अन्या दातार's picture

3 May 2015 - 3:37 pm | अन्या दातार

माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P

असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

नाखु's picture

3 May 2015 - 3:47 pm | नाखु

अफवांवर विश्वास ठेऊ नकोस.

कट्टा ! अरे गफ्फा आहेत नुसत्या आणि तू भुललास असल्या भूलथापांना.

बाकीचा साक्षीदार
नाखु

अरे वा! मस्त कट्टा नि वृत्तांत.

माम्लेदारचा पन्खा's picture

3 May 2015 - 4:03 pm | माम्लेदारचा पन्खा

चला पुण्यनग्रीत जाऊ... तिथे मिसळपाव खाऊ !!!

बावले, अरे टवाळजी कार्टा पूना आया से? मण्णे तो पताही णा था.
सुकांताकी भी खबर णा थी. अव्हेंजर्स की भी णा थी.

सतिश गावडे's picture

3 May 2015 - 5:45 pm | सतिश गावडे

टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.

पैसा's picture

3 May 2015 - 5:47 pm | पैसा

बरा सापडला होता तर मला फोन नै का करायचा!

सतिश गावडे's picture

3 May 2015 - 5:50 pm | सतिश गावडे

तुम्ही पुण्यनगरीत आहात?

रच्याकने, माझ्याकडे तुमचा बेस्नेल नंबर नाही.

नंबर नाही? कधी लक्षातच आलं नाही! आता पाठवते.

बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:21 pm | टवाळ कार्टा

बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!

म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

यसवायजी's picture

3 May 2015 - 6:06 pm | यसवायजी

बसवला टेम्पोत? :))

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:21 pm | टवाळ कार्टा

बरा सापडला होता तर मला फोन नै का करायचा!

फोनवायच्या ऐवजी तुम्हीच या की हिकडे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2015 - 6:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्याला ठाण्याचा पत्ता तरी म्हैती होता का? ;) नाहीतर जायचा डायरेक्ट बेंगळुरला :P

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:21 pm | टवाळ कार्टा

टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.

चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

वृत्तांत मस्त.उरलेल्या वृत्तांत्तांच्या प्रतिक्षेत!!

धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:22 pm | टवाळ कार्टा

धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.

धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 May 2015 - 7:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दाग अच्छे है लिखो लिखो धनाजीराजे!!

श्रीरंग_जोशी's picture

3 May 2015 - 8:21 pm | श्रीरंग_जोशी

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून.

धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2015 - 8:45 pm | अत्रुप्त आत्मा

फो...........टूssssssssssssssssss?????? http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif

@गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>>
दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

@टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है।

@दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2015 - 9:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2015 - 9:11 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2015 - 9:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2015 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

Llllllllluuuuuuu :-\

सस्नेह's picture

3 May 2015 - 8:56 pm | सस्नेह

रंगीत कट्टा !
सचित्र वृत्तांत अधिक रंगतदार होईल

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2015 - 8:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P

आनन्दिता's picture

3 May 2015 - 10:06 pm | आनन्दिता

=)) अर्र्र्र्र्र्र्र लैच !!

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:22 pm | टवाळ कार्टा

सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P

मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

सस्नेह's picture

5 May 2015 - 3:10 pm | सस्नेह

मित्र कोण हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 3:20 pm | टवाळ कार्टा

मित्र कोण हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

आम्च्यात खूसफूस...पदराआडची बोलणी...कानगोष्टी असे प्रकार नस्तात :P

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 May 2015 - 7:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. आम्ही अगदी थेट मा.पं. काढतो. हो की नी रे टक्या. ६ फुट २ इंच. ;) ;)

माम्लेदारचा पन्खा's picture

6 May 2015 - 3:20 pm | माम्लेदारचा पन्खा

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ………

(सनी देओल मोड ऑन )

टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

टवाळ कार्टा's picture

6 May 2015 - 3:42 pm | टवाळ कार्टा

चिमणरावांनाच विचार ते =))

अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 5:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:22 pm | टवाळ कार्टा

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:22 pm | टवाळ कार्टा

अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!

अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 May 2015 - 7:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

*^%%&^&

देवांग's picture

4 May 2015 - 9:26 am | देवांग

आम्ही पण चिंचवड ला राहतो आम्हाला का नाही बोलावले ? किंवा का नाही सांगितले कि चिंचवड मध्ये कट्टा घेत आहे

श्रीरंग_जोशी's picture

4 May 2015 - 9:34 am | श्रीरंग_जोशी

सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:22 pm | टवाळ कार्टा

सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...

तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 8:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस's picture

4 May 2015 - 9:49 am | प्रचेतस

मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का.

बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला.

शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल.

हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं

पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला.

बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

अत्रुप्त आत्मा's picture

4 May 2015 - 10:15 am | अत्रुप्त आत्मा

@मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा.>>> =))))))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 8:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

इंग्रजी चित्रपट हिंदीमधे पहाणं हा

"गुनाह है ये"

प्रचेतस's picture

4 May 2015 - 8:04 pm | प्रचेतस

हो ना राव.
नशिब मी त्याआधी इंग्लिश पण पाहिला होता.

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:23 pm | टवाळ कार्टा

बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

मग...हैच मी शांत... :)

अजया's picture

4 May 2015 - 10:25 am | अजया

=))))

जेपी's picture

4 May 2015 - 10:29 am | जेपी

मोदकराव
01
चिमणराव
02
टवाळ कार्टा
03
कपिलमुनी
04

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 May 2015 - 12:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

1
फोटु अंजा वरुन साभार

पैजारबुवा,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 8:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हायला माझे मित्र पण हल्कचं म्हणतात मला. :/

यसवायजी's picture

4 May 2015 - 8:29 pm | यसवायजी

तरी बरं रविवारी नव्हतास. नाहीतर हल्कचा फोटो बल्कमधे टाकावा लागला असता. :))))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 8:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

का रे?

यसवायजी's picture

4 May 2015 - 8:48 pm | यसवायजी

चोम्पीटेशन होतं तुला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 8:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रकाटाआ

बॅटमॅन's picture

5 May 2015 - 1:08 pm | बॅटमॅन

जसे हिरवट, पिवळट, इ. म्हणतात तसे तुम्हांला हल्क-ट म्हणावे काय? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 May 2015 - 7:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळ्या मित्रांमधे ह्या-च्च नावानी प्रसिद्ध असल्यानी तुही तसं म्हणालास तर हल्कट नाही.

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:24 pm | टवाळ कार्टा

हायला माझे मित्र पण हल्कचं म्हणतात मला. :/

आम्ही "हल्क"ट म्हणणार

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:23 pm | टवाळ कार्टा

कपिलमुनी आणि मी आयर्न मॅन व थॉर्ची अदलाबदल करून घेत आहोत याची णोंद घेत्ली जावी

पियुशा's picture

4 May 2015 - 10:40 am | पियुशा

बाब्बो चान चान =))
बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)

पैसा's picture

4 May 2015 - 10:57 am | पैसा

=)) =)) =))

चिमणराव आसपास नाहीत ना हे बघून बाहेर पड!

=)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

4 May 2015 - 11:08 am | अत्रुप्त आत्मा

@ बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)>>> =))))))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 8:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खिक्कं!!!

गुर्जी मोडॉन

दु दु दु जिल्बुशा

गुर्जी मोडॉफ!!!

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:24 pm | टवाळ कार्टा

बाब्बो चान चान =))
बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)

चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा's picture

4 May 2015 - 10:47 am | टवाळ कार्टा

आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा)
चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 8:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चायला मोदक आणि कपिलमुनि दोघं साक्षी आहेत ;)

अजया's picture

4 May 2015 - 11:02 am | अजया

=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:24 pm | टवाळ कार्टा

=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))

ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा's picture

4 May 2015 - 11:54 am | पियुशा

=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))

नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.)
टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया ..........................
आखीर खाता क्या हे ....................................... ???????
चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;)

( आता मार खायच्या आत पलते ....)

अजया's picture

4 May 2015 - 1:46 pm | अजया

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 8:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:27 pm | टवाळ कार्टा

नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)

तुझे वय काय...तु पितो काय =))
वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2015 - 6:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चवीसाठी पितो रे..अजुनही आवडतं. वजन :/

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 2:25 pm | टवाळ कार्टा

=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))

नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.)
टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया ..........................
आखीर खाता क्या हे ....................................... ???????
चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;)

( आता मार खायच्या आत पलते ....)

हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी's picture

4 May 2015 - 12:14 pm | कपिलमुनी

रानमळा बेश्ट आहे.
काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम !
खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले.
बाकी पिंचिं महाकट्टाकरू या !
पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

मोहनराव's picture

4 May 2015 - 2:03 pm | मोहनराव

फोटू टाका!!