एक "टवाळ" संध्याकाळ
लेखनप्रकार
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)
एक लाडोबा सोडला तर आम्ही तिघही पिंपरी-चिंचवडबद्दल अगदी पुर्ण परिचयाचे असल्याने कुठे भेटायचं हे आधीचं ठरलेलं होतं. काल दुपारी लाडोबाला फोन केला तेव्हा, "मी ना अग्गदी ३.३० ला वेळेत निघतो म्हणजे दोन अडिच तासात चिंचवड ला पोहचेन" असं म्हणाला. प्रत्यक्षात फक्त एक तासाचा उशिर करुन श्री. लाडोबा सर ठाण्याहुन निघाले. चिंचवडला उतरणार होता त्याऐवजी कपिलमुनिंनी त्याला तळेगावलाचं उतरवलं आणि गाडीत घालुन प्राधिकरणामधे आणलं. (लाडोबानी तळेगावला उतरावं म्हणुन अणाहिता चिंचवडला काळे झेंडे वगैरे घेउन उभ्या आहेत असा त्याचा समज करुन देण्यात आला असं आमच्या वि-श्वसनिय आणि गोप-निय सुत्रांकडुन समजलेलं आहे. ;) )
त्यांना थोडी वाट पहायला लावुन मी सुद्धा एक दहा-पंधरा मिनिटात तिथे भेटायला पोचलो. ह्या आधी कधीही एकमेकांना भेटलेलो नसुनही अगदी एका फटक्यामधे एकमेकांना ओळखलं. आयडीच्या नावावरुन किती फसायला होउ शकतं ह्याचा अनुभव काल परत घेतला. कपिलमुनी एखादे ४०-४५ वर्षांचे सद्गृहस्थ असतील अशी समजुत होती, हा तर चक्क समवयीन निघाला. टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की. हाय-हेलो करुन गाड्या-बिड्या पार्क करुन समोरचं असणार्या चि.सौ.कां. गीता पावभाजी सेंटरमधे जरा श्रमपरिहारासाठी गेलो. एकमेकांशी ओळख वगैरे करुन घेतली आणि मोदकाला फोन केला. मोदक जरा कामामधे असल्याने थोडा उशिरा येणार होता. इकडे कपिलमुनि, लाडोबा आणि माझं गाड्या, मिपा आणि मिपाकर ह्यांच्यावर गप्पा रंगल्या. तीन जणांनी कॉफी, चहा आणि लेमन सोडा असा त्रिरंगी मेनु संपवला त्यानंतर बराचं वेळ वेटरचा अंत बघुन मग टेबल रिकामं केलं. दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! ;) मोदक आणि आम्ही सगळे वाल्हेकरवाडीमधल्या रानमळा मधे भेटायचं ठरवलं होतं तिकडे कुच केलं.
रानमळामधे जाउन स्टार्टर्स जेमतेम संपेपर्यंत बुलेटवाले मोदकबाबा बुलेटसंप्रदायी अवतारामधे प्रकट झाले आणि मग खर्या अर्थानी गप्पांचा कट्टा रंगायला सुरुवात झाली. गाड्या, ट्रेक्स, भ्रमंती, मिपावरचे आयडी आणि त्यांच्या सवयी, लेखं आणि अनुभव वगैरे वगैरेंचे विषय सटासट बदलले जात होते. कालच्या गप्पांमधुन "केल्याने देशाटन" ह्या म्हणीची प्रचिती आली. जरा वेळानी झणझणीत गावरान चिकनची थाळी वगैरे मागवली. चविष्ट चिकनबरोबर गप्पांची चव द्विगुणीत झाली. (लाडोबानी थोडसं हाश-हुश करत का होईना पण खाल्लं ;) ). वयोगट आणि जवळपास समविचारी असल्यानी सगळे जण पहिल्यांदाच भेटत असुनही अगदी मोकळेपणानी गप्पा मारत होते. मोदक आणि कपिलमुनी ही दोघं लोकं सतत कुठेना कुठेतरी ट्रिपला जात असतात (शेप्रेट) अशी माहिती मिळुन बरीचं जळजळं झाली. गप्पा मारत असतानाचं बुवांचा कर्वेनगरहुन फोन आला, त्यांच्याशी जरा फोनवर गप्पा मारल्या. प्रत्यक्ष नाही तरी बुवांनी सुक्ष्मदेहानी हजेरी लावली असं म्हणायला हरकत नाही. गप्पा हाणत असताना टकाला एकदम आपल्याला पुण्यात नातेवाईकांच्या घरी जायचं आहे ह्याची आठवण झाली. त्याला पुण्यात धनकवडीला सोडायची जबाबदारी मी घेतलेली होती. आणि टक्या पत्ता चुकुन चुकल्यानी ती जागा धनकवडी नसुन फुरसुंगी आहे असं बर्याचं उशीरा लक्षात आलं. ए बाबा, हवं तर तुला ठाण्याला सोडतो पण फुरसुंगीला वगैरे सोडणार नै ज्जा अशी धमकी दिल्यावर टक्या पार रडवेला झालेला. (अनाहितांच्या ताब्यात देतो अशी धमकी देणार होतो पण उगीचं रडला बिडला अस्ता तर काय घ्या म्हणुन मोह आवरला. ) ;) ;) ;)
शेवटी त्यानी धनाजी वाकडे उर्फ स.गा. ला फोन केला आणि त्याची उतरायची सोय केली. (टक्याला आधी सगा नी येउ नको असं सांगीतलयं असं सांगुन आम्ही बराचं त्रास दिला. फायनली सगा कडे सोय झालीये हे कळल्यावर मात्र मग जरा थंडावला.) यथेच्चं जेउन प्रत्येकी तीन-तीन भले मोठे ग्लास सोलकढी ढोसली आणि हातपाय पसरुन परत गप्पा सुरु झाल्या. आठ साडेआठला ज्या गप्पा मारायला सुरुवात केलेली ते रात्री जवळ जवळ सव्वा अकरा साडे अकरा पर्यंत गप्पा कश्या रंगल्या हे समजलं सुद्धा नाही. शेवटी अगदी हाटेलमालकानी हाकलायला नको म्हणुन नाईलाजानी बाहेर पडलो. परत पार्किंगमधे बुलेट बद्दल दहा-पंधरा मिनिटं गप्पा रंगल्या. पुढे एकत्र प्रवासाचे थोडे फार बेत आखुन परत भेटायचे प्लान करुन कट्ट्याची सांगता झाली.
टक्याचं पुढे काय झालं? सगानी टक्याला घरात घेतलं का? हे वाचण्यासाठी आज वल्ली, बुवा, सगा आणि टक्याचा आत्ता पुण्यात कट्टा चालु आहे त्याचा वृत्तांत वाचावा लागेल. स्टे ट्युन्ड!!
असो. मिपामुळे असे विविध क्षेत्रामधले, समविचारी मित्र मिळाले ह्याचा आनंद वाटतो. मिपाकरांच्या भेटीचे असे प्रसंग वारंवार येवोत हिच एक इच्छा व्यक्त करुन धागा संपवतो.
वाचने
50670
वाचनखूण
प्रतिक्रिया
133
In reply to रानमळा by कपिलमुनी
सोलकढी खरचं जब्राट होती. मला
In reply to रानमळा by कपिलमुनी
रानमळा बेश्ट आहे.
In reply to रानमळा बेश्ट आहे. by टवाळ कार्टा
आमेन!
In reply to आमेन! by पैसा
नक्की करू. तेव्हा तुमची
In reply to नक्की करू. तेव्हा तुमची by टवाळ कार्टा
ते ...
In reply to ते ... by पैसा
ते संचलनासाठी रे! तुला काय
आधी माहिती असतं तर टकाला
In reply to आधी माहिती असतं तर टकाला by पिलीयन रायडर
तुम्ही पिंचिंकर आहात हे माहित
In reply to तुम्ही पिंचिंकर आहात हे माहित by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही पिंचिंकर आहात हे माहित
In reply to तुम्ही पिंचिंकर आहात हे माहित by टवाळ कार्टा
त्यांना सदेह तुझ्यापासुन छुपं
In reply to आधी माहिती असतं तर टकाला by पिलीयन रायडर
आधी माहिती असतं तर टकाला
In reply to आधी माहिती असतं तर टकाला by टवाळ कार्टा
तू तर म्हणे नुस्ता नावानीच
In reply to तू तर म्हणे नुस्ता नावानीच by पिलीयन रायडर
पेंदा???? पेंदा नाही पैंदा.
In reply to पेंदा???? पेंदा नाही पैंदा. by बॅटमॅन
भा.पो ना...?
In reply to भा.पो ना...? by पिलीयन रायडर
भा.पो ना...?
In reply to पेंदा???? पेंदा नाही पैंदा. by बॅटमॅन
पेंदा???? पेंदा नाही पैंदा.
In reply to तू तर म्हणे नुस्ता नावानीच by पिलीयन रायडर
तू तर म्हणे नुस्ता नावानीच
In reply to तू तर म्हणे नुस्ता नावानीच by टवाळ कार्टा
वाट काय बघायची.. चिमणरावच
In reply to वाट काय बघायची.. चिमणरावच by पिलीयन रायडर
थर थर कापत होता अगदी. शेवटी
In reply to आधी माहिती असतं तर टकाला by टवाळ कार्टा
तु पेटलास तरी चालेल धागा
फोटो नाय म्हणजे कट्टा नाय,
In reply to फोटो नाय म्हणजे कट्टा नाय, by सूड
नावाप्रमाणे वागलचं पाहिजे का
In reply to नावाप्रमाणे वागलचं पाहिजे का by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी काय केलं आता? =))))
In reply to मी काय केलं आता? =)))) by सूड
मी काय केलं आता? =))))
In reply to मी काय केलं आता? =)))) by टवाळ कार्टा
संध्याकाळपर्यंत येतो सांगून
In reply to संध्याकाळपर्यंत येतो सांगून by सूड
दुपारी धन्याशी झालेल्या तुटक
In reply to दुपारी धन्याशी झालेल्या तुटक by टवाळ कार्टा
बरं आता धाग्यावरच विषय
In reply to बरं आता धाग्यावरच विषय by सूड
मालक आपण व्हॉट्स अॅप गृपमधे
In reply to मालक आपण व्हॉट्स अॅप गृपमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
>>मालक आपण व्हॉट्स अॅप
In reply to >>मालक आपण व्हॉट्स अॅप by सूड
व्यनि करतो.
मस्त व्रुत्तांत....
In reply to मस्त व्रुत्तांत.... by मुक्त विहारि
आवडला...
या चोच्या चिमण्याने
In reply to या चोच्या चिमण्याने by टवाळ कार्टा
आल्या असत्या तर त्यांना मस्त
In reply to आल्या असत्या तर त्यांना मस्त by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी एकटाचं हल्क-ट का रे?
In reply to मी एकटाचं हल्क-ट का रे? by टवाळ कार्टा
"बालाक्लावा" च आहे.
१००
In reply to १०० by कपिलमुनी
मी चुकुन कुरसुंदी वाचलं आणि
भारी वर्णन लिहिलं आहे. वर
वा मस्तच वृत्तान्त !!
In reply to वा मस्तच वृत्तान्त !! by प्रसाद गोडबोले
नेत्रदान कर रे. अशी
दगड लागता रक्त भळभळे इतके
In reply to दगड लागता रक्त भळभळे इतके by पुंबा
स्वारी.. गल्ली चुकलो.. :))