अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? "
"काय म्हणतेस सुले ?"
"होय रे माझ्या राजा "
-- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते.
-- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो.
टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात -
'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो....
कुठलेतरी कविराज कवत असतात --
"अशाच एका धुंद सकाळी -
मनात माझ्या स्फुरती ओळी -
जरतारी तो शालू आणिक -
धुंद मखमली नाजुक चोळी "