मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.