विमा कंपनीविरुद्ध यशस्वी लढा

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
2 Jan 2016 - 6:29 pm

"माझे व माझ्या पतीचे दोन विमा कंपन्यांचे स्वतंत्र मेडिक्लेम विमे आहेत . दोन्ही विम्यांमध्ये आमची दोघांची नावे घातलेली आहेत . माझ्या पतीची बायपास शत्रक्रिया एशिअन हार्ट इंस्टीट्युट येथे दि. ८ ऑगस्ट २००८ रोजी झाली . या शस्त्रक्रियेचा खर्च रु. ३ लाख २६ हजार ७४८ इतका झाला . आम्हाला दोन्ही विम्याचे मिळून रु. ३ लाख , २० हजार रु. मिळायला हवे होते . त्यापैकी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने ताबडतोब विम्याचे पैसे रु. एक लाख ७० हजार हॉस्पिटलकडे पाठवले . मात्र न्यू इंडिया अशुअरन्स कंपनीकडे सर्व कागदपत्रे पाठवूनसुद्धा हॉस्पिटल सोडेपर्यंत पैसे आले नाहीत . त्यामुळे कंपनीच्या टी . पी .ए. कडे माझे हेलपाटे सुरु झाले . प्रथम उत्तर देण्याची टाळाटाळ , नंतर अगदीच खनपटीला बसल्यावर रु. तीस हजार मिळतील असे उत्तर मिळाले . शेवटी आम्ही विमा कंपनीच्या चर्चगेट येथील मुख्य कार्यालयात गेलो . तेथील अधिकारी आम्हाला सांगू लागले की "आता टी . पि. ए . जेव्हडे पैसे मंजूर करत आहे तेव्हडे पदरात पाडून घ्या . बाकीच्या पैश्यांचे आपण नंतर बघू ." परंतु आंम्हाला हे मान्य नव्हते . अधिक चौकशी केली असता , विमा लोकपाल अशा तक्रारी स्वीकारतात अशी माहिती मिळाली .

आम्ही विमा लोकपालांच्या विलेपार्ले येथील कार्यालयात गेलो तेव्हा त्यांनी प्रथम आमचा कंपनीशी झालेला पत्रव्यवहार व इतर कागदपत्रे तपासली . नंतर त्यांनी कंपनीला एक नोटीस पाठवली . ७ जानेवारी २०१० रोजी लोकपालांनी त्यांच्या कार्यालयात आम्हाला व कंपनीला सुनावणीसाठी बोलावले . कंपनीने होस्पिटलकडून खोलीचे भाडे , इतर सेवाचे दर इ. माहिती घेतली नाही असा आक्षेप लोकपाल यांनी त्यांच्या प्रतिनिधीकडे घेतला . त्यावर कंपनी आम्हाला रु. ८५००० /- द्यायला तयार आहे असे प्रतिनिधीने सांगितले . पण ही रक्कम लोकपाल यांनाच मान्य झाली नाही . " विम्याची योग्य रक्कम देण्यास तुम्ही उशीर केला असल्याने तक्रारदाराला बराच त्रास झाला आहे . त्यामुळे सात दिवसांच्या आत त्याना रु. एक लाख पन्नास हजार द्यावेत व तसे आमच्या कार्यालयास कळवावे " असा आदेश लोकपाल यांनी दिला . यावरही कंपनीने खोडसाळपणा करून पूर्वी आम्हाला देऊ केलेले रु. २७,१०५ /- दिले आहेत असे समजून उरलेल्या रकमेचा धनादेश आम्हाला पाठवला. परंतु ही बाब लोकपाल यांना समजल्यावर त्यांनी कंपनीकडे स्पष्टीकरण मागवले . यातून योग्य तो बोध घेऊन कंपनीने त्या रकमेचा धनादेश आम्हाला पाठवला . अशा रीतीने तब्बल सोळा महिन्यांच्या कायद्याच्या लढाईनंतर आम्हाला न्याय मिळाला .
सौ. कल्पना गोखले यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात आपण वर वाचला . वकील किवा अन्य कोणाचीही मदत न घेता त्यानी हे यश मिळवले हे केवळ कौतुकास्पदच नाही तर अनुकरणीयही आहे . त्यांनी उल्लेख केलेल्या विमा लोकपाल यांच्याबद्दल थोडी पूरक माहिती अशी की खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांविरुद्धच्या रु. २० लाखापर्यन्तच्या तक्रारी लोकपाल यांच्या कडे करता येतात . मात्र त्यापूर्वी विमाधारकाने कंपनीकडे तक्रार करणे बंधनकारक आहे . तसेच कंपनीने विमाधारकाची तक्रार नाकारल्याचे पत्र मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे . तक्रार विहित नमुन्यात करावी लागते . त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही . वकील देण्याचीही गरज नाही . अर्जाचा नमुना व अधिक माहिती bimalokpal .mumbai@gbic.co.in येथे उपलब्ध आहे.

आभार --सौ. कल्पना गोखले, मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभाग

विशेष सूचना --- मुंबई ग्राहक पंचायत प्रथमच पुण्यात ग्राहक पंचायत पेठ आयोजित करत आहे . या पेठेत मुंबई व पुणे येथील उत्पादकांची दर्जेदार ग्राहकोपयोगी उत्पादने रास्त दरात उपलब्ध असतील . प्रत्येक खरेदीची पावती मिळेल . वस्तूबद्दल काही तक्रार असेल तर त्याच्या निवारणाची व्यवस्था असेल . ग्राहकांच्या प्रबोधनाचा 'जागो ग्राहक जागो' हा कक्ष, विद्यार्थ्यान्साठी जाहिरातींबाबत नीरक्षीरविवेक करण्यास प्रवृत्त करणारी स्पर्धा, पथनाट्य, पैठणी विणण्याचे प्रात्यक्षिक इ. या पेठेची वैशिष्ट्ये अनुभवण्यासाठी पेठेला भेट देण्याचे हे आग्रहाचे आमंत्रण !
स्थळ : लोकमान्य सभागृह , केसरीवाडा, नारायण पेठ , केळकर मार्ग , पुणे
कालावधी : ७ ते ११ जानेवारी २०१६ :
वेळ : सकाळी ११. ३० ते रात्री ८. ३०

धोरणमांडणीवावरशिक्षणप्रकटनबातमीअनुभवमतशिफारस

प्रतिक्रिया

मिलिंद's picture

2 Jan 2016 - 6:35 pm | मिलिंद

ग्राहकाने पाठपुरावा केल्याशिवाय बँका, इन्शुरन्स अशा अनेक कंपन्या संस्था तक्रारींची दखल घेत नाहीत. बरेचसे ग्राहक वेळेचा अपव्यय म्हणून या संस्था, कंपन्या यांच्यामागे लागत नाहीत त्यामुळे अशांचं फावतं.
ग्राहक म्हणून कल्पनाताईंचा पाठपुरावा अनुकरणीय आहेच.

अजया's picture

2 Jan 2016 - 6:54 pm | अजया

उपयुक्त माहिती.

चांगली माहिती, धन्यावद. वाचन खूण साठवली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jan 2016 - 8:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत उपयुक्त व अनुकरणीय माहिती.

धन्यवाद इथे ही सर्व माहिती प्रकाशित केल्याबद्दल.

palambar's picture

2 Jan 2016 - 8:24 pm | palambar

irda.gov.in या साईट वर सर्व माहिती आहे, विम्या संबधी.ही
insurance regulatory institute आहे.

बाबा पाटील's picture

2 Jan 2016 - 8:51 pm | बाबा पाटील

एकदा असा वाईट अनुभव आला होता, त्यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधीचा सत्कार केला,बरोबर २० मिनिटांच्या आत सगळी यंत्रना कार्यरत झाली.

तुषार काळभोर's picture

4 Jan 2016 - 10:37 am | तुषार काळभोर

??

आनंदराव's picture

2 Jan 2016 - 9:13 pm | आनंदराव

उपयुक्त माहिती
वा. खु साठवली आहे.
बाबा पाटील, तुमचा अनुभव सांगा की !

रेवती's picture

3 Jan 2016 - 12:48 am | रेवती

माहितीपूर्ण धागा आहे. कल्पनाताईंनी मिळवलेला न्याय वाचून चांगले वाटले.

मुक्त विहारि's picture

3 Jan 2016 - 8:14 am | मुक्त विहारि

वाखूसा

देशपांडे विनायक's picture

3 Jan 2016 - 11:26 am | देशपांडे विनायक

माहिती बद्दल धन्यवाद
वाखूसा

सुधांशुनूलकर's picture

3 Jan 2016 - 1:13 pm | सुधांशुनूलकर

महिती इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

चौकटराजा's picture

3 Jan 2016 - 3:33 pm | चौकटराजा

ही माहिती आमच्या सोसायटीच्या वात्स्याप वर शेअर करतो कारण शहाण पण प्रवाही असावे.

सांश्रय's picture

6 Jan 2016 - 8:29 am | सांश्रय

चांगली माहिती....

ग्राहक पंचायत पेठेत नक्की कसली विक्री होणार आहे?

पुणे मुंग्रापं's picture

6 Jan 2016 - 8:39 am | पुणे मुंग्रापं

सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे धन्यवाद...

@ बाबा पाटील - आपले अनुभव नक्की लिहा म्हणजे इतरांनाही माहिती होईल.

@ सांश्रय - ग्राहक पंचायत पेठेत - मुंबई ग्राहक पंचायतीच्या वितरणात देणे शक्य नसलेल्या तसेच वैयक्तिक आवड निवडीच्या असलेल्या वस्तू पंचायत पेठेत उपलब्ध करुन देण्याचे गेले ३८ वर्षे अविरत सुरु आहे. पुण्यात मात्र हे पहिलेच वर्ष आहे.

प्रसाद१९७१'s picture

6 Jan 2016 - 1:49 pm | प्रसाद१९७१

@ बाबा पाटील - आपले अनुभव नक्की लिहा म्हणजे इतरांनाही माहिती होईल.

त्यांच्या कडे मोठी दंबुक आहे, त्याच्या जोरावर ते आपली कामे करुन घेतात. त्यांच्या अनुभवाचा कोणालाही उपयोग होणार नाही. गरज पडली तर त्यांना प्रत्यक्ष बोलवावे म्हणजे ते काम करुन देतील.