कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
15 Jan 2016 - 10:54 pm

म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्‍या कोणातचं नसल्याने आज ही "गोsssSSssड कामगिरी" मी माझ्या अंगावर घेतो आहे.

(५ सेकंद कॅमेर्‍याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)

म्हाग्रु: माझ्या महागुरुंची ओळख करुन द्यायच्या आधी सर्वात प्रथम मी आजच्या भागाच्या प्रायोजकांचे आभार मानतो. आमच्या महागुरुंच्या येण्याजाण्याचा भत्ता देणारे घे-शियन पेंट्स (रेड पेश्शालिस्ट) ह्यांचे सर्वप्रथम भरभरुन आभार. मी आणि माझे गुरु दोघ्यांच्या आयुष्यात ह्या लाल रंगाने जी काय बरकत आणलिये म्हणुन सांगु.

aaa

तसचं आजच्या कॉफीच्या मगातला कटिंग ज्यांनी स्पॉन्सर केला त्या रेड लेबल चहावाल्यांचेही मी आभार मानतो. शेवटी प्रेक्षकांमधे जागृती निर्माण करायचं महान काम ज्यांनी केलं त्यांचे तोंडदेखल्या आभार मानायची पद्धत तोंडदेखल्या का होईना मी पाळतो.

a

(अंगवि़क्षेप करुन पडणारा विग सावरत कॅमेर्‍याच्या जवळ तोंड नेउन खाजगी आवाजात)

खरं तर ह्या कंपनीला चहा बनवायची आयड्या माझीचं. शिवाय त्या झाकीर हुसेनांच्या तबला बडवतानाच्या झैरातीच्या धर्तीवर माझीपण सतार खाजवतानाचा किंवा बासरी फुंकतानाची झैरात करु म्हणुन पण आयडिया दिलेली पण त्यांच्या दूत्त दूत्त डायरेक्टराला माझ्याएवढी डायरेक्शनची जाण नसल्याने ती कल्पना त्यानी फेटाळुन लावली. तर असो मुद्द्याची गोष्ट म्हणजे माझं गाणं....आपलं माझे प्रायोजक...हात्त तेजायला...माझे महागुरु.

राजाश्रय असल्याशिवाय कलाजंताची कला कधी फोफावते काय? आमच्या ह्या उपक्रमाला आमचे पच्चिम बाँगाल मधले आणि सौथिंडियन लाल भाई कम्युनिष्टांचाही पाठिंबा आहे.

aa

आता माझ्या महागुरुंबद्दल काय बोलावं? अर्थशास्त्रं, इतिहास, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, समाजसेवा, भारतीय वैद्यक, पाककलाशास्त्र, ग्याजेटशास्त्रं व अश्या कित्येक शास्त्रांमधे गुरुवर्यांनी आपली पथारी पसरलेली आहे. आजवर मिपा नामक उणिवर्सिटीमधे त्यांनी एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे तर तेवीस पी.एच.ड्यांचे. प्रबंध लिहिलेले आहेत. इच्छुकांनी सदर लिंकेवर जाउन लाल रंगात न्हाण्याची इच्छा पुरी करुन घ्यावी अशी नम्र विनंती. तसचं सदर प्रबंध तुम्हाला चिमण हटेला पब्लिशर्स बुक डेपो मधे ५००% किंमतीमधे मिळतील ह्याचीही इच्छुकांनी नोंद घ्यावी.

तर अश्या ह्या माझ्या गुरु'वर्ज' श्री.श्री.श्री.श्री.श्री. वसंत काटकर ह्यांचे ह्या लाल रंगमंचावर स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या, बसायच्या खुर्च्या आणि बरोबर आणलेल्या पाण्याच्या बाटल्या वाजवुन सहानुभुती व्यक्त करावी.

(समोरच्या गर्दीमधुन उगाचं दोन चार लोकं टाळ्या वाजवायचा आवाज येतो आणि म्हाग्रु पडक्या चेहेर्‍याने साउंड गाय कडे बघत)

एडिटिंग मधे टाळ्यांचा कडकडाट टाका रे.

(तेवढ्यामधे गुरुवर्ज वसंत काटकर लाल रंगाचा पडदा सारुन रंगपटावर प्रवेश करतात. पडदा सारुन पहिलं पाऊल रंगमंचावर टाकतानाचं स्वत:च्याचं धोत्राला अडखळतात आणि एक माकडउडी मारुन स्वतःचा तोल सांभाळतात. गुढग्याची वाटी चोळत चोळत थेट खुर्चीत लँड होतात)

म्हाग्रु: अरे वा गुरुजी अगदी कसलेल्या कुंग-फु वाल्याप्रमाणे कोलांटी उडी मारलीत सर्र्र्र्र्र्र तुम्ही.

वसंत काटकर्र्र्र्र्र्र्र्र सर (अ.का. व.का) शिंच्या, कुंग-फु, बिंग-फु चे माझे दिवस संपले. हि कला मी गेल्या दिल्ली दौर्‍यामधे त्या मफलरवाल्याकडुन गुरुदक्षिणा म्हणुन मिळवली की रे. बघ कसा अडखळता अडखळता थेट खुर्चीत पोचलो तें. तु ही शिक हो ही कला.

म्हाग्रु: अरे वा, गुरुजी तुमची विनोदबुद्धी ह्या वयातही शाबुत आहे म्हणायची.

व.का. : माझ्या विनोदबुद्धीला कांय धाड भरणारे. तेवढे तु यत्तां दुशली बं मधे असतांनां सांगायचास ते पाचकळ कमरेवरचे विनोद सांगु नकोस. पाहिजे तर माझं विनोदशास्त्रावरचं पुस्तकं विकतं घेउन वाचं हो शिंच्या. जाताना माझी चिठ्ठी घेउन जा म्हणजे घसघशीत दिड टक्का सुट देतील तुला.

म्हाग्रु: आज आपण माझ्याबद्दल नको बोलुयात बर्रं का सर. आज स्वत:ची ला....(जीभ चावुन)..स्वतःविषयी बोलायचा मान तुमचा. मी उरलो फक्तं प्रश्णं विचारण्यापुरता.

व.का.: असं म्हणतोसं? बरं मग आज कुठल्या विषयावर आपल्या प्रेक्षकांना ज्ञानामृत पाजायचं म्हणतोस? आज त्यांना आर्यकालीन पाककृती शिकवायची का बिकिनी घातल्यामुळे होणार्‍या संस्कॄतीच्या र्‍हासाबद्दल माहिती देउ म्हणतोस? का असं करुया जरा लेटेष्ट विषय घेउयात काय? म्हणजे बाजीराव मस्तानी आणि चित्रपटाची भन्साळ्याने केलेली काशी? आज प्रेक्षकांनमधे स्त्रीया जास्तं दिसतं आहेत मग म्हणालास तर सौंदर्य प्रसाधनाच्या साधनांवरही बोलु हवं तर. आपल्याकडे वाटायला बरचं आहे. प्रत्येक विषयामधे सखोल अभ्यास असल्याने आपण कोणात्याही विषयावर प्रेक्षकांचं परबोधन करु शकतो. काय समजासं शिंच्या?

म्हाग्रु: आपण असं करुयात का? की विषयामधुन विषय निघेल तशी आपली संभाषणाची गाडी कल्लुभायसारखी मोकाट जाउ द्यात काय? रस्त्याकडेला, रस्त्यावर आपले प्रेक्षक आहेतचं की. किंवा मी असं करतो विषयांतर होउ नये म्हणुन आपण फक्तं मिपा उणिवर्सिटीमधल्या तेवीस पी.यच्चं.ड्यांमधल्या सगळ्या थिसिसांवर क्रोनोलॉजीकली चर्चा करुयात?

व.का.: ठिक आहे. मग आपण माझ्या सगळ्यात आधीच्या सखोल आणि सर्वांच्या जिव्हाळ्याच्या अर्थशास्त्रावर बोलुयात का? तु मला प्रश्ण विचारुचं नको कसे. मीचं घडाघडा बोलीन. तुझ्या प्रश्णांनी माझ्या ज्ञानधबधब्यामधे अडथळा येईल. त्यामुळे तु आपल्या ओठांची घडी आणि हातावर बोट ठेउन त्या कोपर्‍यात शांतपणे जाउन बैस बरं. तर प्रेक्षकहो आपण बोलु...म्हणजे मी बोलु तुम्ही गपचुप ऐकु अर्थशास्त्रामधला एक महत्त्वाचा विषयः पगार दर आठवड्याला झाला तर काय ह्या जिव्हाळ्याच्या विषयावर.

(म्हाग्रुं ताडकन उठुन उभे रहात..घड्याळाकडे लक्ष जाउन ओरडतात...कट कट. वेळ झालीये एका ब्रेक ची. हा भाग स्पॉन्सर केलाय तुमच्या आमच्या पेश्शल ब्रँडने

a

अर्थात क्रमश:. भेटु पुढच्या भागात. तोपर्यंत पहात रहा म्हाग्रुंचे महागुरु काटकर ह्यांचे तोंड व लालेलाल जाहिराती.

क्रमशः

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

15 Jan 2016 - 10:56 pm | नूतन सावंत

जमलंय.

पैसा's picture

15 Jan 2016 - 11:03 pm | पैसा

=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2016 - 11:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लाल पापड कुठले असतात जरा लिंक व्यनि करा.

पैसा's picture

15 Jan 2016 - 11:08 pm | पैसा

1

हे घे लाल तिखटाचे पापड. पण मी म्हणत होते ते डांगर आणि लाट्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2016 - 11:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

एस's picture

15 Jan 2016 - 11:09 pm | एस

असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

पैसा's picture

16 Jan 2016 - 8:08 pm | पैसा

पापडांना काय वाटणार? कर्रम कुर्रम! अजून एक लाटी येणार बघा मग 'अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच का होतो?'

प्रचेतस's picture

15 Jan 2016 - 11:05 pm | प्रचेतस

=)) =)) =))

हेमंत लाटकर's picture

15 Jan 2016 - 11:08 pm | हेमंत लाटकर

शिंच्या बराच विनोदी आहेस रे. काटकर ऐवजी लाटकर टाकले असते तरी चालले असते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2016 - 11:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

मी-सौरभ's picture

18 Jan 2016 - 12:46 pm | मी-सौरभ

तुम्ही ह. घे. मुळे हा धागा शतकी व्हायची शक्यता कमी झलिये ;)

श्रीरंग_जोशी's picture

15 Jan 2016 - 11:16 pm | श्रीरंग_जोशी

लैच भारी.__/\__.
यासाठी पार्श्वभूमी तयार करून देणार्‍यांनाही धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2016 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा

ह्हीह्हीह्हीह्ही!

मुक्त विहारि's picture

16 Jan 2016 - 12:36 am | मुक्त विहारि

मस्त...

यशोधरा's picture

16 Jan 2016 - 12:44 am | यशोधरा

=))

बोका-ए-आझम's picture

16 Jan 2016 - 1:07 am | बोका-ए-आझम

कॅप्टन! पुनरागमन दणक्यात!

आगाऊ कुठचा.. असं म्हणले असते पण त्या डुबक्या खाणार्‍या संस्कृतीचं घोंगडं निस्तरते आधी आणि मग इथे येते हिहिहाहा करायला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2016 - 2:21 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

कंजूस's picture

16 Jan 2016 - 5:49 am | कंजूस

वसंत फुलला मिपावरी ।
परागांची लयलुट झेलू किती ।।

उगा काहितरीच's picture

16 Jan 2016 - 8:15 am | उगा काहितरीच

लोल ! पुभाप्र...

प्राची अश्विनी's picture

16 Jan 2016 - 8:38 am | प्राची अश्विनी

:):):)

प्रमोद देर्देकर's picture

16 Jan 2016 - 8:05 pm | प्रमोद देर्देकर

हायला चिमण्या पार बाजार उठवलास की.अता बुमरॅंग (लाट्या ) साठी तयार हो बरे.

सस्नेह's picture

16 Jan 2016 - 9:48 pm | सस्नेह

=)) चावट चिमण !

DEADPOOL's picture

17 Jan 2016 - 9:32 am | DEADPOOL

(हे वाक्य काहीही हं श्री च्या चालीवर म्हणावे!)
पापड गोखले ग्रुहउद्योगाचे आहेत का?

नाखु's picture

18 Jan 2016 - 2:47 pm | नाखु

बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे.

भाग दोन साठी

त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस..

सार्वकालीन माई .....

हेमंत लाटकर's picture

19 Jan 2016 - 12:01 pm | हेमंत लाटकर

कॅप्टन पहिल्याच भागात काॅफी थंड झाली. :)

टवाळ कार्टा's picture

10 May 2016 - 11:12 am | टवाळ कार्टा

आरारा