कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्या कोणातचं नसल्याने आज ही "गोsssSSssड कामगिरी" मी माझ्या अंगावर घेतो आहे.
(५ सेकंद कॅमेर्याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)
म्हाग्रु: माझ्या महागुरुंची ओळख करुन द्यायच्या आधी सर्वात प्रथम मी आजच्या भागाच्या प्रायोजकांचे आभार मानतो. आमच्या महागुरुंच्या येण्याजाण्याचा भत्ता देणारे घे-शियन पेंट्स (रेड पेश्शालिस्ट) ह्यांचे सर्वप्रथम भरभरुन आभार. मी आणि माझे गुरु दोघ्यांच्या आयुष्यात ह्या लाल रंगाने जी काय बरकत आणलिये म्हणुन सांगु.
तसचं आजच्या कॉफीच्या मगातला कटिंग ज्यांनी स्पॉन्सर केला त्या रेड लेबल चहावाल्यांचेही मी आभार मानतो. शेवटी प्रेक्षकांमधे जागृती निर्माण करायचं महान काम ज्यांनी केलं त्यांचे तोंडदेखल्या आभार मानायची पद्धत तोंडदेखल्या का होईना मी पाळतो.
(अंगवि़क्षेप करुन पडणारा विग सावरत कॅमेर्याच्या जवळ तोंड नेउन खाजगी आवाजात)
खरं तर ह्या कंपनीला चहा बनवायची आयड्या माझीचं. शिवाय त्या झाकीर हुसेनांच्या तबला बडवतानाच्या झैरातीच्या धर्तीवर माझीपण सतार खाजवतानाचा किंवा बासरी फुंकतानाची झैरात करु म्हणुन पण आयडिया दिलेली पण त्यांच्या दूत्त दूत्त डायरेक्टराला माझ्याएवढी डायरेक्शनची जाण नसल्याने ती कल्पना त्यानी फेटाळुन लावली. तर असो मुद्द्याची गोष्ट म्हणजे माझं गाणं....आपलं माझे प्रायोजक...हात्त तेजायला...माझे महागुरु.
राजाश्रय असल्याशिवाय कलाजंताची कला कधी फोफावते काय? आमच्या ह्या उपक्रमाला आमचे पच्चिम बाँगाल मधले आणि सौथिंडियन लाल भाई कम्युनिष्टांचाही पाठिंबा आहे.
आता माझ्या महागुरुंबद्दल काय बोलावं? अर्थशास्त्रं, इतिहास, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, समाजसेवा, भारतीय वैद्यक, पाककलाशास्त्र, ग्याजेटशास्त्रं व अश्या कित्येक शास्त्रांमधे गुरुवर्यांनी आपली पथारी पसरलेली आहे. आजवर मिपा नामक उणिवर्सिटीमधे त्यांनी एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे तर
अर्थात क्रमश:. भेटु पुढच्या भागात. तोपर्यंत पहात रहा म्हाग्रुंचे महागुरु काटकर ह्यांचे तोंड व लालेलाल जाहिराती.
(अंगवि़क्षेप करुन पडणारा विग सावरत कॅमेर्याच्या जवळ तोंड नेउन खाजगी आवाजात)
खरं तर ह्या कंपनीला चहा बनवायची आयड्या माझीचं. शिवाय त्या झाकीर हुसेनांच्या तबला बडवतानाच्या झैरातीच्या धर्तीवर माझीपण सतार खाजवतानाचा किंवा बासरी फुंकतानाची झैरात करु म्हणुन पण आयडिया दिलेली पण त्यांच्या दूत्त दूत्त डायरेक्टराला माझ्याएवढी डायरेक्शनची जाण नसल्याने ती कल्पना त्यानी फेटाळुन लावली. तर असो मुद्द्याची गोष्ट म्हणजे माझं गाणं....आपलं माझे प्रायोजक...हात्त तेजायला...माझे महागुरु.
राजाश्रय असल्याशिवाय कलाजंताची कला कधी फोफावते काय? आमच्या ह्या उपक्रमाला आमचे पच्चिम बाँगाल मधले आणि सौथिंडियन लाल भाई कम्युनिष्टांचाही पाठिंबा आहे.
प्रतिक्रिया
जमलंय.
=))
लाल पापड कुठले असतात जरा लिंक
व्यनि कशाला
पापडवाल्यांना पुढच्या लेखात
असं कसं? असं कसं?
कर्रम कुर्रम
=)) =)) =))
शिंच्या बराच विनोदी आहेस रे.
लाटकर टाकायला हरकत नव्हती पण
@ हे. ला. _/\_
लैच भारी
ह्हीह्हीह्हीह्ही!
जमलय....
=))
ज्जे बात!
आगाऊ कुठचा.. असं म्हणले असते
=)) =)) =))
वसंत फुलला मिपावरी ।
लोल ! पुभाप्र...
:):):)
हायला चिमण्या पार बाजार
=)) चावट चिमण !
काहीही हं जॅकभौ!!!!
चिमण्या
कॅप्टन पहिल्याच भागात काॅफी
आरारा