डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही.
परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला.
मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो.
टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले.
मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो.
कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला.
मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो.
मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद्ध इतर असा वाद-विवाद न काढायचे ठरवले.
कट्ट्याच्या मुक्कामावर पोहेचताच, मि.माप आणि सौ.माप ह्यांनी स्वागत केले.
वाहतूकीच्या बोजवार्यामुळे उशीर झाला, अशी कारणमीमांसा त्यांना दिली.
हॉटेल जवळ-पास रिकामेच होते.आता हा टका आपल्याला नक्की काय काय खायला घालतो? असे वाटले पण जातीवंत मिपाकर एकदा टेबलावर बसला की, जे काही समोर येईल ते पोटात ढकलतो.
असो,
मेन्यु कार्ड आधी टकाच्या ताब्यात दिले आणि आम्ही आता टका काय ओर्डर देतो? ह्याकडे कान लावून बसलो.
ट्काने २-३ पदार्थांची ओर्डर दिली आणि सांगीतले की, आता तुम्ही पण ऑर्डर द्या.
पदार्थ टेबलावर येईपर्यंत "माझीही शँपेन" आणि "सुबोध खरे" हजर झाले.
गप्पा रंगत गेल्या आणि मग एक एक पदार्थांच्या मागणीला सुरुवात झाली.
शेवटी मॉकटेल पिवून झाले.पण गप्पा काही संपेनात.
आम्ही वेटरला विचारले की इथे अजून कितीवेळ बसले तरी चालते?
वेटर म्हणाला बसा किती ही वेळ.रात्री १२ला हॉटेल बंद होणार.
आता वेटनेच परवानगी दिल्याने, आम्ही अज्जुन गप्पा हाणायला लागलो.
आमचा एकूण रागरंग बघून आमच्या सौ.ने "गप्पा आवरत्या घ्या" अशी खूण केली आणि मग आम्ही हॉटेल मधल्या गप्पा आवरत्या घेतल्या.
टकाने गाडी सुरु करेपर्यंत रस्त्यावर परत एकदा थोड्याफार गप्पा मारल्या.
टकाने आम्हाला आणि मि.मोदक ह्यांना ठाण्याला सोडले.
मी आणि सौ.मुवि, डोंबोलीला आलो आणि कट्ट्याच्या आठवणी मनांत घोळवत झोपी गेलो.
प्रतिक्रिया
16 Sep 2015 - 3:27 pm | होबासराव
:))
16 Sep 2015 - 3:32 pm | प्यारे१
आणीबाणी मधली वृत्तपत्रं आणि बातम्या कशा असतील याचा थोडाफार अंदाज आला.
चार उशीर, आठ गप्पा, एक गोष्ट, तीन पदार्थ, अबाउट टर्न तेज चल.
16 Sep 2015 - 3:39 pm | मुक्त विहारि
आमच्या घरात खरोखरच आणी-बाणी आहे....
सध्या
आम्ही उरलो फक्त प्रतिसादा साठी.
16 Sep 2015 - 3:47 pm | मी-सौरभ
आणलेलं ईनो फुकट गेले
16 Sep 2015 - 3:53 pm | मुक्त विहारि
"ईनो फुकट गेले....."
फोटो अजून बाकी आहेत....
आणि
मि.मोदक, ह्यांचा प्रतिसाद देखील.....
सगळेच मिपाकर फोटो कढण्यात दंग होते.
16 Sep 2015 - 3:53 pm | मांत्रिक
हं, अगदीच सरकारी उद्घाटन कार्यक्रमाचा वृत्तांत वाटतोय.
16 Sep 2015 - 3:54 pm | मांत्रिक
मुवीजी तुमचा माझा प्रतीसाद येक्काच वेळी. अपने तो जमेगी साहब!
16 Sep 2015 - 4:16 pm | मुक्त विहारि
नक्कीच जमेल....
फक्त २ गोष्टी टाळल्यात तर उत्तम........
१. मला नुसतेच "मुवि" असेच म्हणा.
२. कृपया "साहेब" म्हणू नका.
("जी" म्हटले की "हुच्चभृ" झाल्यासारखे वाटते आणि "साहेब" म्हटले की गुलामगिरी.मिपाकर कधीच "हुच्च" नसतो आणि कुणाचा "साहेब" पण नसतो.)
16 Sep 2015 - 3:50 pm | नाखु
निव्वळ सरकारी वार्तांकन असून दुर्लक्ष्यात आले आहे !!!!
संदर्भ : "सूड वचन" खंड २ भाग १
16 Sep 2015 - 3:55 pm | पैसा
कट्टा झालाच नाय असा सौंशय घ्यायला जागा आहे.
16 Sep 2015 - 6:11 pm | दिपक.कुवेत
याची देहि याची डोळा फोटो बघण्यात आलेले आहेत.
16 Sep 2015 - 4:14 pm | मदनबाण
फोटो आधीच कायअप्पा वर पाहिले असल्याने कट्टा जोरदार झाल्याचे कळलेच होते,पण वॄतांत लिहण्यात मध्यवर्ती डोंबिवलीकरांनी हात आखाडता घेतल्याचे दिसते ! इ नॉय चॉल बे....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||
16 Sep 2015 - 4:36 pm | सूड
चटावरलं श्राद्ध उरकल्यागत वृत्तांत!! मदनबाण फोटो बघितलेत म्हणतोय म्हणून कट्टा असावा.... ख-खो ठाण्यातला कौपीनेश्वर जाणे!!
16 Sep 2015 - 4:46 pm | अत्रन्गि पाउस
आमच्या एरियात कट्टा अन आम्हाला पत्ता नाही ??
धिक्कार आमचा !!
16 Sep 2015 - 6:12 pm | दिपक.कुवेत
एवढा त्रोटक व्रुत्तांत?? आपसे ये उम्मीद नहिं थी!
16 Sep 2015 - 6:21 pm | रेवती
फोटू दिल्याशिवाय कट्टा झालाय यावर विश्वास ठेवणार नाही.
16 Sep 2015 - 6:26 pm | अत्रुप्त आत्मा
जोरदार +१ .. आनी टक्कूमक्कूशोनूचा परतिसाद पन हवा धाग्याव्
16 Sep 2015 - 6:46 pm | अजया
वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय तर कट्टा नाय!
16 Sep 2015 - 7:04 pm | मुक्त विहारि
ह्याला म्हणतात, घरचा आहेर.
एक तर कसे बसे बातमीपत्र टंकले आणि फोटो असलेला मोबाईल घेवून सौ.मुवि, बाहेरगावी गेल्या.
आणि ज्यांच्याकडे फोटो आहेत, ते व्हॉटस अपवर गुंतलेले आहेत.
आम्ही सध्या इतर आंतरजालीय साधनांचा वापर करत नसल्याने, आमचीच गोची झाली आहे.
हे प्रभो,
निदान पुढच्या जन्मी तरी मला बर्यापैकी फोटोग्राफर बनव.
16 Sep 2015 - 11:07 pm | एस
प्रभोंना व्यनि करून पहा. ;-)
17 Sep 2015 - 3:36 pm | अजया
=))
16 Sep 2015 - 10:00 pm | खटपट्या
आवो काय हे? आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकल्यासारखे वाटले...जरा मिठ मसाला येवद्या...
17 Sep 2015 - 12:18 pm | नाखु
नको तिथं काटकसर करणार्यांचा निसेध असो निसेध असो निसेध असो !!!!
अभामिपाकट्टाकराफोटोटाकाजळवाकळवापळवामिळवाहळहळवावाचक्संघाकडून मिपाकर हितार्थ जारी.
18 Sep 2015 - 12:53 pm | मोदक
नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन करीत वृत्तात देत आहे. गोड मानून घ्यावा.
आज भेटू की उद्या असे ठरवता ठरवता शेवटी मंगळवारी भेटण्याचे ठरले. मुवींनी रोखठो़ख धागाही टाकला. ठरलेल्या वेळी टका भेटला आणि आणि आम्ही ठाण्याच्या ट्रॅफीकमधून मुंगीच्या गतीने टकाच्या घरी मार्गस्थ झालो, वाटेत एक शॉर्टकट मारूनही फारसा फायदा झाला नाही. तिकडेही ट्रॅफीक होतेच. या दरम्यान मुविंचे फोनवर फोन येवू लागले "आम्ही २ मिनीटात पोहोचतो आहोत", "जवळच आहोत", "पांच मिनीटात पोहोचतो आहोत" असे सांगत होतो. शेवटी एकदा "जितेंद्र आवाडच्या ऑफीस जवळ आलो आहोत" असे सांगितल्यानंतर मुविंचे फोन थांबले ;)
या दरम्यान बिल्डींग नंबर आणि फ्लॅट नंबर ऐकण्यात घोळ होवून श्री व सौ मुवि वेगळ्याच बिल्डींगमध्ये एका ठिकाणी भेट देवून पुन्हा सोसायटीमध्ये येवून थांबले होते. टकाकडे पोहोचून लगेचच त्याच्या चारचाकीतून आम्ही चौघांनी कट्ट्याकडे प्रयाण केले. घरातून लगेचच बाहेर पडलो म्हणून टकाच्या मातोश्रींनी काजूचे एक पाकीट आमच्या हातावर ठेवले होते. सौ मुवि आणि मी त्याचा फन्ना उडवणे सुरू केले. ट्रॅफीकमधून वाट काढत आणि आजुबाजूच्या बेशिस्त वाहनचालकांची विचारपूस करत टका गाडी हाणत होता. यथावकाश ३८ बँकॉक स्ट्रीटवर पोहोचलो.
आजुबाजूला असलेल्या हॉटेल / दुकानांच्या तुलनेत येथे झकास हिरवा प्रकाश पसरला होता...
तेथे श्री व सौ मामलेदारच्या पंख्याची भेट झाली व आम्ही सर्वजण वरच्या मजल्यावर प्रयाण केले.
डॉ. खरे, माझीही शँपेन हे दोघे येत आहेत अशी माहिती मिळाली.
सुरूवात सूप पासून केली.
Khou Suey सूप..
टॉम यम सूप.
आणखी बरेच स्टार्टर्स मागवले जात होते व त्याचा फन्ना उडत होता. ऑर्डर देण्याची मुख्य जबाबदारी टकाकडे होती व तो ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत होता. मात्र कोणत्या पदार्थाचे नांव काय आहे आणि नक्की कोणत्या पदार्थाची ऑर्डर दिली आहे याचा मेळ घालण्याचा टकाने अयशस्वी प्रयत्न केला व शेवटी नाद सोडून दिला. :)
मुवि, माप, मी आम्ही लोक सर्वजण समोर येईल ती प्लेट रिकामी करण्यात गुंतलो होतो. एक डिश खूपच आवडली म्हणून तेथल्या बुवाला बोलावून त्याचे (पक्षी: डिशचे!) नांव विचारले असता ती डिश कमळाच्या देठांची एक डेलीकसी आहे असे कळाले. (चवीला खरोखरी स्वादिष्ट असणार्या त्या डिशचे नांव कोणाच्या लक्षात आहे का?)
आणखी काही पदार्थांचे फटू देत आहे. नांवे विचारू नयेत.
खाणे सुरू असतानाच मॉकटेलची टूम निघाली.. व मॉकटेल्स मागवली गेली...
मँगो लिची स्मूदी..
व्हर्जिन चॉकलेट मार्टिनी
या पेयाचे नांव महिती नाही - हे डॉ खरेंनी मागवले / त्यांना मिळाले होते. अधिक माहिती तेच सांगू शकतील. ;)
आणखी बरेच भाताचे प्रकार आणि करीचे प्रकार मागवले गेले पण त्यांची अप्रतीम चव, भूक आणि गप्पा या गडबडीत फोटो काढणे जमले नाही.
हशा आणि खादाडी सोबत गप्पांचे विषय आणि आवाका बदलत होता... टकाने केलेली बँकॉक ट्रीप, प्रत्येकाचे ऑफीस, काम, पोपटी कशी करतात, राजस्थानमध्ये मिळणारे सामिष भोजन व त्याच्या स्पेशल एडीशन्स, वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळणारे वेगवेगळे खाद्यपदार्थ असा फेरफटका मारून मुवि, मी आणि डॉक्टर खरे शेवटी "क्रुड ऑईल प्रोसेसींग आणि भारताचा ऑईल रिझर्व" यावर पोहोचलो, टका, श्री व सौ माप आणि शँपेन यांचा उघड वेगळा गट पडला होता व ते कोणत्यातरी दुसर्या विषयांवर चर्चा करत होते.
आमच्या तेलाच्या चर्चेवरून व मध्यपूर्वेतील देशांच्या उल्लेखांवरून आमच्याबाबतीत "सरहद के ऊस पार" वगैरे कमेंट्स पास केलेल्या ऐकू येत होत्या - त्या फाट्यावर मारून आमची घमासान चर्चा सुरूच होती.
यादरम्यान एक कॉम्प्लीमेंटरी डेझर्ट टेबलावर आले.
शेवटी मुविंनी वेटरला बोलावून "आणखी थोडा वेळ बसले तर चालेल का?" असे विचारले व होकार मिळवला.
डॉक्टरांचे वेगवेगळ्या पेशंटचे अनुभव ऐकत ऐकत कट्टा संपला.
थाई, इंडोनेशीयन शाकाहारी पदार्थांचा फन्ना उडवला, भरपूर गप्पा झाल्या..!
एकंदर मजा आली :)
18 Sep 2015 - 1:26 pm | प्रभाकर पेठकर
अत्तिशय जळावू लिखाण आणि छायाचित्रं.
गणपतीचे दिवस असल्याकारणाने 'मोदकाला' क्षमा केली आहे.
माझ्या नशिबात कांही असे चमचमीत कट्टे नाहीत ह्याची खंत जरूर आहे.
18 Sep 2015 - 6:28 pm | मुक्त विहारि
दादा....
तुम्ही आता मुंबई परीसरात या तर खरं.
परत एक फर्मास कट्टा करू.
18 Sep 2015 - 10:06 pm | प्रभाकर पेठकर
अरे मुवि, मी कोणाला दोष देत नाहीये. माझ्याच व्यस्त वेळापत्रकातून, मलाच वेळ मिळाला नाही. नाहितर ह्या खेपेस पुण्याचा कट्टा माझ्या घरीच करावयाचा विचार होता.
18 Sep 2015 - 10:57 pm | मुक्त विहारि
पण,
परत एक डाव प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
पेचेक ह्या सिनेमातील माझे आवडते वाक्य (मुळ वाक्य वेगळे आहे.मराठी रुपांतर) ======> परत एकदा प्रयत्न करून बघू या.
18 Sep 2015 - 8:53 pm | अत्रुप्त आत्मा
पूर्ण +++++++++++++१११११११११११११११
दू दू दू दू दू दू मोदक! :-/ ल्लुल्लुल्लुल्लुल्लु :-/
18 Sep 2015 - 1:47 pm | एस
कट्टेकर्यांचे फोटो नसल्यामुळे अजूनही शंकेला वाव आहे.
18 Sep 2015 - 2:09 pm | नाखु
२ च्य फोटो दिसतायत एक हाटेलाचा आणी एक चोख्णळी पेयाचा त्यामुळे नाइलाजाने तितकेच मार्क द्यावे लागत आहेत.
कट्टेकरी दिसेनात कुठे ते?
इतक्या "चव"कशी वेळेत एक कट्टा झाला असता पिंची भागात !!!!
मोदकराव पुण्यपतनी कट्ट्यास यावे.
नाखु
18 Sep 2015 - 4:15 pm | मोदक
काकानु.. पुण्यात आल्यावर फोनवा.
एक नवीन आईसक्रीम पार्लर सापडले आहे. आपल्यासमोर आईसक्रीम "तयार करून" देतात.
18 Sep 2015 - 3:11 pm | बोका-ए-आझम
इसको कहते है कट्टा! पण कट्टेक-यांचे फटू कुठे सांडले? Xxx नेमका त्यादिवशी वेस्टर्न रेल्वेचा पाय घसरला आणि मग फोन पण बंद झाला. म्हणून अस्मादिक सूप आणि करी रेमटवायला येऊ शकले नाहीत. नाहीतर मुखिया बिहारींचे आमंत्रण मिळाले होते. असो. पुढच्या वेळी.
18 Sep 2015 - 3:57 pm | बोका-ए-आझम
त्या डिशचं नाव Java Lotus Stems. मस्त लागतो. गळ्याला अंमळ खवखवतो पण.
18 Sep 2015 - 4:07 pm | मोदक
भारी प्रकार होता.. आणखी एकदा घसा खवखवला तरी चालेल. ;)
19 Sep 2015 - 2:08 pm | कवितानागेश
खवखवले म्हणजे अळूची देठे घातली असणार भेसळ म्हणून! :प
18 Sep 2015 - 6:16 pm | सुबोध खरे
ते स्ट्रॉबेरी व्हानीला कोलाडा आहे
18 Sep 2015 - 9:48 pm | माझीही शॅम्पेन
फोटो का टाकले नाहीत हा सध्या जाज्वल्य प्रश्न असला तरी आम्हा कट्टे करी मंडळी मध्ये एक raw चा undercover agent असल्यामुळे राष्ट्रीय गुपित असल्या मुळे फोटो शकलो नाही …
असो खर तर कट्टा हुकणार होता म्हणून खंत वाटावी अशी स्थिती निर्माण व्हायच्या आत बॉस ने परवानगी दिली आणि सुसाट ४ उड्डाण पूल गाठून ३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे येथे १२ मिनिटात हजर झालो (कोण रे ते ठाण्यास ट्राफिक मुळे बदनाम करतंय )
मोदकाची भेट खरतर दारा कट्टा येथे शेकडो वर्षा-पूर्वी झाली होती , एकटा पुणेकर सहसा तावडीत सापडत नाही पण पुन्हा येतोय म्हटल्यानंतर साधी साधली. मी चक्क शेवटी पोहोचाणारा कट्टे करी नाही हे बघून जीव भांड्यात पडला
घुसल्यावर श्रीमान श्रीमती माप आणि टका ह्याच्या टेबलावर स्थानापन्न झालो , एका मागो माग एक चविष्ट पदार्थ , अनेक विवादास्पद गरमा गरम विषयावर चर्चा , लय भारी mango litchi स्मूदी एकदम मज्जाच मज्जा
बिल द्यायचा सुमारास टक्कू मोक्कु शोनु यांनी काही कुपन स्पॉन्सर दिले , पण नाकी किती कुपन देताय ते सांगा असं ठणकावून सांगून मोदकाने टकाला कात्रज चा घाट दाखवून पूणे करांच नाव बँकॉक मध्ये पण रोशन केल ;)
तो पर्यंत ११:३० वाजुन गेले हे कळले च नाही , श्रीमती मुवी यांनी श्रीमान काही तर गुप्त इशारा करून कट्टा पुढे चालू ठेवण्याचा डावं उधळून लावला :)
अश्या तर्हेने एक चांगला कट्टा केल्याच समाधान घेवून घरी परत आलो
18 Sep 2015 - 9:53 pm | अभ्या..
मुविकाका प्लीज सांगा ना ह्यांना सगळ्यांना. थोड्या वेळात मला वाटेल की बैंकॉक कट्टा म्हणजे मिपा महा संमेलन होते की काय?
18 Sep 2015 - 10:12 pm | प्यारे१
>>>> बैंकॉक कट्टा
ठाण्याचा बैंकॉक कट्टा.
धन्यवाद.
19 Sep 2015 - 9:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तो जो एजंट आहे ना त्याला एकदा पुण्याच्या कट्ट्याला कोपर्यात घ्यायचा आहे. सद्ध्या वेळ मिळत नाही त्याला पण :/
19 Sep 2015 - 11:22 am | मोदक
धनकवडी IBM वाला तोच ना रे? ;)
17 Sep 2015 - 3:40 pm | होबासराव
कब कब आयेंगे फोटो
18 Sep 2015 - 7:18 pm | अभ्या..
खुशखबर.... खुशखबर....... खुशखबर...............
ज्यांना कुणाला कट्ट्याला यायची ईच्छा असते पण जमत नाही, आपले नाव अन चित्र झळकावे अशी ईच्छा असलेल्याणी मला तुमचे स्वतःचे काहीही खाताना, कुठल्याही कपड्यात असे फोटो पाठवून द्यावेत. मी हव्या त्या ठिकाणी त्यांचा कट्टा फोटोशॉपमध्ये तयार करुन देईन. (कुणीही भेसळ ओळखू शकणार नाही याची ग्यारन्टी) एका कट्ट्याचे तीन चार फोटो तरी देईन. एका कट्ट्याच्या फोटोवर ४ सदस्य ओळखपरेड फोटो फ्री फ्री फ्री. त्वरा करा.
ऑफर मोजक्याच कालावधीसाठी. (व्रूतांताचे चार्ज वेगळे पडतील.)
18 Sep 2015 - 7:23 pm | मुक्त विहारि
उगाच पैशे खर्च करू नका.
आम्ही बातमीपत्र लिहायला नुकतीच सुरुवात केली आहे.
आम्ही बातमी-पत्रे प्रकाशित करू.
18 Sep 2015 - 7:31 pm | प्यारे१
आपल्या (न झालेल्या) कट्टयाचे फ़ोटो आणि वृत्तांत टाक की! 'पहले इस्तेमाल फिर विश्वास' असं होईल म्हणजे. ;)
18 Sep 2015 - 10:10 pm | प्रभाकर पेठकर
ह्या प्रतिसादामुळे 'आपण हजर असू तोच खरा कट्टा' बाकी सगळे 'फोटोशॉप' असा समज दृढ होण्यास बराच वाव आहे.
18 Sep 2015 - 9:00 pm | अजया
यात कट्टेकर्यांचा फोटु नसल्याने हे हाटेलाचे फोटो कट्टयाचे म्हणून खपवले असल्याचा संशय घेतल्या गेला आहे !!
काय मुवि! कट्टयासाठी काही पण;)
18 Sep 2015 - 9:27 pm | प्यारे१
तुमचं नेटवर्क 'लै वीक' झाल्याची शंका घ्यायला वाव निर्माण झालेला आहे...!
कट्टयासाठी कैच्या कै. :P
18 Sep 2015 - 10:59 pm | मुक्त विहारि
उद्या आमच्या सौ.च्या मोबाइल मधले फोटो टाकतो.
आम्ही कट्ट्यासाठी काही पण करू.
पण कट्टा न करताच झाला, असे सांगणार नाही.
19 Sep 2015 - 11:19 am | सुबोध खरे
पण कट्टा न करताच झाला, असे सांगणार नाही.
उलट कट्टा झाला तरी एक वेळ सांगणार नाही पण
पण कट्टा न करताच झाला, असे कधीच सांगणार नाही असे हवे.
19 Sep 2015 - 11:30 am | मुक्त विहारि
तेस यु आर राइट्ट.
18 Sep 2015 - 9:21 pm | होबासराव
:))
18 Sep 2015 - 10:21 pm | सूड
कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट दिसतंय!!
18 Sep 2015 - 11:02 pm | मुक्त विहारि
तू गप राव रे.
(मनोगत : हा "सूड" पक्का पुणेकर दिसतोय.कध्धी कध्धी म्हणून कौतूक करणार नाही.)
19 Sep 2015 - 9:19 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अत्यंत तोकडा वृत्तांत लिहिल्याबद्दल मिपाकट्ट्प्पा मुविंचा णिषेध!!
(बाहुबली) कॅजॅस्पॅ!!
19 Sep 2015 - 9:34 am | मुक्त विहारि
णिषेध स्वीकारण्यात आला आहे.
खर्या मिपाकरांच्या मताचा, आम्ही नेहमीच आदर करतो.
(फूल्ल बॉटल लेमनवॉटरच्या नशेत, फुकाचा गहनविचार करून, उद्दाम पणे नाना डू-आय-डी, घेणार्या, अवतारी सोंगांपेक्षा, परखड पणे साब्दिक आसूड ओढणारे आणि निखालस प्रेम करणारे, खरे मिपाकर, आम्हाला तरी नेहमीच आदरणीय)
19 Sep 2015 - 11:58 am | सुबोध खरे
कट्ट्याला जायचे कि नाही हे येणाऱ्या रुग्णांवर अवलंबून होते त्यामुळे शेवटपर्यंत मी येणार आहे हे सांगितले नव्हते. शेवटी रुग्णांनी कृपा केल्याने साडे आठ ला दवाखाना बंद करून मामलेदारांना व्यनी पाठवला (२०.३६ वा) कि निघतो आहे. तेवढ्यात एका डॉक्टरचा फोन आला कि एक रुग्ण पाठवायचा आहे. मी विचारले तातडीचा आहे का? ते नाही म्हणाल्यावर मी उद्या पाठवा सांगून निःश्वास सोडला. घाईघाईने मोटारसायकल काढून अर्ध्या तासात स्थानापन्न झालो. वेगवेगळे थाय पदार्थ टक्याने मागवले होते. नवे विचारली काही तरी विचित्र नावे होती . आपण आंबे खावे, कोयी मोजण्यात काय हशील आहे या विचाराने नवे लक्षात ठेवण्याचे कष्ट घेतले नाहीत. तोंड दोन्ही कारणांनी चालू होते( बडबड आणी खाणे). पदार्थ येत गेले आणी आम्ही खात गेलो.
TOM YUM आणी KHOU SUEY अशी सुपची नावे होती
JAVA LOTUS STEM, VIETNAMESE SUMMER ROLL, KUNG PAO COTTAGE CHEESE, KATSU SHITAKE MUSHROOM, EXOTIC VEGETABLES WITH BLACK BEAN SAUCE हे STARTERS HOTE. यात भरपूर पोट भरले त्यामुळे फक्त भाताचे पदार्थ घ्यावे यात एकमत झाले आणि KHAO PHAD KRAPAO, NESI LEMAK आणी KHAO PHAT CHE असे तीन भाताचे प्रकार खाऊन पोट भरण्यात आले. यानंतर वर म्हटल्या प्रमाणे तीन तर्हेची मॉकटेल ( एका वर एक फुकट ) म्हणजे सहा ग्लास पिऊन पोटातील उरली सुरली जागा व्यापून बंद करण्यात आली. त्यामुळे वर आईस क्रीम खाण्याचा बेत रद्द करण्यात आला.
ज्यांनी कट्टा हुकवला त्यांचे बडीशेप आणी ओवा देऊन सांत्वन करण्यात येत आहे.
ज्यांना जळजळ होत आहे त्यांनी त्रिफळा चूर्ण खाऊन आपला उदारागनी शांत करावा असा ( मोफत) सल्ला देण्यात येत आहे.
चला मुवि
पुढच्या कट्ट्याच्या तयारीला लागू या.
19 Sep 2015 - 12:07 pm | मुक्त विहारि
पुढच्या कट्ट्याची प्रात्थमिक आखणी झाली आहे.
उत्सवमुर्तींना वेळ मिळाला की, ते म्हणतील तिथे आणि ते म्हणतील त्या वेळेला आणि तारखेला कट्टा करायचे ठरले आहे.
कट्याची रीतसर घोषणा होईलच.
19 Sep 2015 - 10:44 pm | भाते
कृपया कट्टा सोमवार ते गुरुवार या दिवशी न ठेवता सुट्टीच्या दिवशी / शुक्रवारी किंवा विकांताला ठेवावा म्हणजे कट्टयाचा सदेह आनंद घेता येईल. कट्टा हुकल्यामुळे कट्टा वृत्तांत वाचुन आणि फोटो बघुन समाधान मानावे लागते.
माझ्या विनंतीची दखल घेतली जाईल याची खात्री आहे.
19 Sep 2015 - 12:01 pm | सुबोध खरे
ता क -- खवय्यांनी लिहिलेली नावे गुगल करून पहावी( स्वतःच्या जबाबदारी वर). म्हणजे काय पदार्थ आहेत आणी कसे करावे त्याची कृती आणी फोटो सापडतील. जळजळ आणी चिडचिड झाल्यास कट्टेकरी जबाबदार नाहीत.