सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही.
अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु नवरा किंवा बायको वृद्ध असली आणि मुलगा-सुन दोघेही नौकरी करणारे असतील तर मात्र अशा वृद्धाची किंवा रूग्णाची अवस्था खुप दयनीय होते. त्यांचे करण्यासाठी माणूस किंवा बाई लावावी म्हणले तर पेपरमधील बातम्या वाचून भीती वाटते. शेवटी प्रत्येक अंथरूणाला खिळलेल्या वृद्धाच्या व रूग्णाच्या मनात सच्चे वरण मिळाले तर बरे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या मनातील विचार कळतील.
प्रतिक्रिया
6 Sep 2015 - 1:10 pm | आदूबाळ
या ऐवजी "पिच्छाकरंन" हे विडंबन जास्त जमलं असतं. अर्थात मला ग्रीक शब्द माहीत नाही.
6 Sep 2015 - 1:18 pm | पीके
मला मराठी समजत नसल्यामुळे लेख समजला नाहि. फक्त जर्मन, ग्रीक आणी फ्रेंच भाषेतील शब्दांमुळे वरणावरती काहीतरि आहे एवढे कळले. क्रूपया कन्नड आनी तेलगु शब्द पण दिलात तर जास्त सोपे पडेल समजायला..
6 Sep 2015 - 1:52 pm | अभ्या..
@श्रीगुरुजी
कच्चे हरण नावाची मांसाहारी आवृत्ती काढा. मग अच्चे सरण, जल तरण, जे काही काढायचे ते काढा पण एकदाचा हा विडंबनाचा तरास थांबवा.
श्रीगुरुजी लिहितायत म्हणल्यावर मोदींच्या वरणभातावर नाहीतर दाळिंच्या भावावर, निदान डेरा सच्चा सौदावर लिहितील वाटले तर हे असले. :(
काढून टाकतील हा तुम्हाला कार्यकारिणीतून. तुम्ही असले लिहिणे अपेक्षित नाही. ;)
7 Sep 2015 - 12:05 am | बोका-ए-आझम
रोफललो वाचून!
7 Sep 2015 - 10:04 am | नाखु
त्यांनी "सत्तेचे कुरण" नावाचे पीठ आंबवायला घातले आहे. विरज्ण माईंकडे मागीतले पण त्या "नेहमीप्रमाणे" नाही म्हणाल्या मग अत्यंत जड अंतःकरणाने दादुमियांकडून अदमुरे लोणी आणले (त्यांचेकडील लोणीही आंबलेल्या दह्यापेक्षा जालीम असते अगदी रबडी-बासुंदीचेही दही बनवू शकते असा मिपामान्य समज्+संकेत आहे).
पीठ पुरेसे लागेपर्यंत प्रतीक्षा करणेच आप्ल्या हाती आहे असे आमचा भोकरवाडीचा वार्ताहर चिमणु चोच्मारकर उर्फ "टोक्टॉक ताशीव" कळवीतो.
अभामिपामांकसंचालीतवेळीदैनीक्तरूणभारतकासामनासकाळीवाचकांनाजागरण्त्रिकाळी यावर्तमानपत्रामधून साभार.
8 Sep 2015 - 3:10 pm | बॅटमॅन
गुर्जी क्यान डू मच्च ब्येटर्र.
6 Sep 2015 - 2:05 pm | मारवा
पेपरमधल्या बातम्या वाचुन भीती वाटते म्हणताय.
अशा रुग्णांचे नातेवाइक ज्या जाहिराती टाकतात ती वाचुन तर चक्कर च येते.
तुम्ही वाचली असेल बघा मराठी पेपरात छोट्या जाहीरातीत येते.
अशी अमुक अमुक कामे करण्यासाठी विनापाश बाई पाहीजे.
विनापाश म्हणजे नेमकी काय अपेक्षा असते अजुन कळलेल नाही.
काही शब्द फिक्स होउन जातात जाहीरातवाल्यांचे
होतकरु उमेदवार, गरजु, आणि ते मैत्री करायचीय? हिंदी पेपरात असतात
अमुक अमुक बाबा लव्ह प्रोब्लम , सौतन से छुटकारा
6 Sep 2015 - 2:07 pm | प्यारे१
थोडा भात वाढा रे!
6 Sep 2015 - 2:18 pm | मारवा
जपानी भातशेती,
भात आणि वजनाचा अन्योन्न संबंध
धुतल्या तांदळासार खा खी म्हणजे नेमकी कशी
भातखंडे यांचे भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदान
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी पाट मांडला भाताचा गाता दंगल गाणी या कवितेची अस्तीत्ववादी समीक्षा
भाता लोहाराचा कुठल्या मटेरीयल ने बनवतात त्याची समकालीन उपयुक्तता काय ? यादवकालीन भात्याची वैशिष्ट्ये कुठली ?
हिंदीतल्या तेरी जुदाई दिल को नही भाती मधील भाती हि मराठी भातांची (जेवणातल्या एकुलती एक पत्नी की) लोहाराच्या भाताची भार्या याचा व्युत्पत्तीशास्त्रान्वये इंडॉलॉजीच्या अंगाने अभ्यासपुर्ण लेख येउ दया.
अजुन काय काय आहे तुमच्या भात्यात सगळे येउ द्या.
भातावर जमेल तेवढा प्रकाश टाका
ह.घ्या.
7 Sep 2015 - 12:07 am | बोका-ए-आझम
भाते यांचा उल्लेख न केल्याबद्दल दुसरे ज्येष्ठ मिपाकर माहितगार यांचा कनिष्ठ मिपाकर बोका-ए-आझम यांच्याकडून मिशा फेंदारुन णिशेध!
7 Sep 2015 - 12:09 am | बोका-ए-आझम
माहितगार नाही.
6 Sep 2015 - 6:24 pm | हेमंत लाटकर
सामान्य विडंबन
6 Sep 2015 - 10:42 pm | श्रीगुरुजी
मान्य आहे. मूळ लेखाच्या तुलनेत विडंबन अतिसामान्य आहे. पुढच्या वेळी दर्जा सुधारायचा प्रयत्न करेन.
8 Sep 2015 - 4:27 pm | सूड
आडात नाय तर पोहर्यात कुठून येणार!!
7 Sep 2015 - 7:19 pm | द-बाहुबली
वाचनखुण साठवत आहे.
8 Sep 2015 - 4:43 pm | तिमा
सच्चे वरण मिळत नसेल तर सच्चे मरण मागावे, ते नक्की मिळेल.