कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल. आणि तेव्हा मग जर का जाड्यांनी लुकड्यांसारखे वागले तर त्यांना पुन्हा ऎकून घ्यावे लागते की "लुकड्यांना जाडे होऊन जाड्यांना समजवावे लागते आणि कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते"
वजनाने लुकडे असल्याचा प्रत्येक नात्यात गॆरफायदा घेतला जातो.
"हा नियम सगळ्या नात्यांना सारखाच लागू होतो"
मग ते कोणतेही नाते असो:
पिता-पुत्र, पिता-पुत्री, सासरे-जावई, सासू-सून, पती-पत्नी, भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहीण-बहीण, नणंद-भावजय, मेहुणा-साळा.
आणि याला कारणीभूत असते परंपरागत चालत आलेली अंधपणाने पाळली जात असलेली जाड्यांना बळीचा बकरा बनवणारी दांभिक शिकवण. मान आणि मोठेपणा न देता कर्तव्याची अपेक्षा कशी बरे करणार? आणि जाड्यांची आज्ञा पाळायची वेळ लुकड्यांवर आली की जर का असा विचार समोर येत असेल की "जमाना बदलला अाहे आता. कसले जाड आणि कसले लुकडे? सर्व समान! ज्याचा अनुभव महान तो जाड!" मग जर असे असेल तर मग कर्तव्य आणि हक्क सुद्धा दोघांनी समसमान वाटून घेतले पाहिजे. पण वरिल सर्व नात्यातील जर लुकडे हे जाड्यांना योग्य मान देत असतील आणि आज्ञा पाळत असतील तर ते नाते अधिक दृढ होते यात शंकाच नाही.
प्रतिक्रिया
3 Sep 2015 - 8:50 pm | जेपी
मोड ऑन- काहि हं श्री-मोड ऑफ.
अवांतर-जिलब्या टाकायच बंद करा.
4 Sep 2015 - 2:58 pm | कपिलमुनी
यावरून मोड येणे हा वाक् प्रचार आठवला
4 Sep 2015 - 3:40 pm | कैलासवासी सोन्याबापु
लॉरेल एंड हार्डी च विडंबन आहे का हे?
(गोंधळलेला) बाप्या
4 Sep 2015 - 10:22 pm | गामा पैलवान
जाडे = हिंदू
लुकडे = ओळखा पाहू!
-गा.पै.
5 Sep 2015 - 8:56 am | कैलासवासी सोन्याबापु
१. जाड़े - यूरोपियन
लुकडे - सीरियन पोरगे
२. जाड़े - ठोकणारे ऑस्ट्रेलियन
लुकडे - ठोकले जाणारे भारतीय
३. जाड़े - आपण मराठी
लुकडे - उत्तर भारतीय
४. जाड़े - तमिळ लोक
लुकडे - नॉन तमिलियन जनता
गापै , कितीतरी जोड्या लावता येतील मला वाटते दर वेळी "हिंदु-????" करण्यात काही हशील नाही.
हे माझे वैयक्तिक मत आहे
भूलचूक माफ़ी
(सेक्युलर अन कदाचित तुमच्या भाषेत सिक्युलर) बाप्या
5 Sep 2015 - 12:43 pm | श्रीगुरुजी
बापरे! काय चाललंय हे? मी हे विडंबन गंमत म्हणून लिहिलं तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काही जण हे गांभीर्याने घेऊन थेट हिंदू-अहिंदू, मराठी-उत्तर भारतीय असा संबंध लावतील ते. आता विडंबन सुद्धा समजावून सांगायची वेळ आलीये.
6 Sep 2015 - 12:27 pm | गामा पैलवान
श्रीगुरुजी, लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून अंदाज आला होता की ही गंमत असणारे. म्हणून मीही थोडी गंमत केली. ;-)
आ.न.,
-गा.पै.
5 Sep 2015 - 8:41 am | भीमराव
'वजनाने लुकडे' ?
लुकडे वजनाने असतात का आकाराने?
5 Sep 2015 - 9:10 am | श्री गावसेना प्रमुख
कर्तव्य आणि हक्क सुद्धा दोघांनी समसमान वाटून घेतले पाहिजे. बारके लोक नेहमी कर्तव्य नाकारतात आणी हक्क मागतात।है क्या नही
5 Sep 2015 - 8:03 pm | मनीषा
नात्यातले कधीकाळी लुकडे असलेले जाडे ..
असाही एक लेख येऊ शकेल .. :D