लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला. सिग्नलला थेट मामाशेजारी उभं राहुन त्यांना फोन केला तर ते वल्लींची वाट पाहत रस्त्यावर उभे होते आणि वल्लींनी "अग्दी पाच मिंटात येतो बर्का असं अर्ध्या तासापुर्वी बोलल्याचं शुभवृत्तांत कळला". ;).. तो फोन संपवुन थोडा पुढे जातोय तोपर्यंत Gogglya उर्फ नितीनचा फोन आला. तो अगदी वेळेआधी १५ मिनीटं गणेशतलावापाशी जाउन उभा होता. शिका रे कैतरी नव्या आयडींकडुन. असो. पुढच्या १० मिनिटात मीसुद्धा गणेश तलावापाशी पोचलो. मंडळी कुठेही दिसेनात म्हणुन मी जरा तलावाच्या बाजुच्या रस्त्याला गाडी दिसली तर मुवि त्यांच्या चिरंजीवांच्या गाडीवर बसताना दिसले. त्यांना हात केला. तिथेचं झकासरावही भेटले. त्यांच्याशी बोलत असतानाचं मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो ह्याचा फोन आला. त्याला पत्त्याला लाउन आम्ही बागेकडे जायला निघालो.
(ह्या लोकांनी आणि पहिला राजा ह्या आयडीने बागेबाहेर बराचं उद्योग केल्याचं लक्षात आलं. बागेजवळ बसलेल्या चार टाळक्यांना त्यांनी "मिसळपाव?" असा प्रश्ण टाकला आणि त्या टाळक्यांनी पण "नाssSssSsही, वडापाव" असं उत्तर देउन गार केलं. दोनदा झालं हो असं. शेवटी ती पोरं येईल त्याला वडापाव असा आवाज द्यायला लागली असं ऐकुन आहे. ;) ;) )
मग आम्ही सगळ्यांनी बागेकडे कुच केलं. लांबुनचं बागेच्या पोडियम वर थांबलेले वल्लीबुवा दिसले (वल्लीबुवा-वल्ली आणि बुवा नव्हे). गाड्या लाउन मुविंबरोबर पोडियमवर पोचलो. तिकडे मितान तै, त्रि-----------------वे--------------णी तै (एखादा स्पेस कमी पडला असेल तर माफ करा हो), सौ. मुवि आणि अजुन एक तै होत्या (सॉरी, मला नावं नीट ऐकु आलं नाही. धाग्यामधे अपडेट कराल का? :( ). सौ. मुविंनी चविष्ट चिरोटे देउन सगळ्यांचं स्वागत केलं. इकडे अन-अनाहितामधले वल्ली, नितीन पाटील उर्फ gogglya, नाखु'न'काका, एक्काकाका, चौ.रा.काका, पहिला राजा इ.इ. मंडळींनी स्वागत केलं. नितीननी सगळ्यांना कॅटबर्या दिल्या आणि चौराकाकांनी पेढे वाटले. मग ओळखपरेडीचा कार्यक्रम चालु झाला. सगळ्यांची नावं कळली. (त्या एका तैंच नाव नीट ऐकु आलं नाही आणि काहितरी वैचारिक उपद्व्याप करायच्या नादामधे मी विचारायचं राहुन गेलं). तेवढ्यात गणेशा कंपनीला टँजेंट हाणुन कट्ट्याला आले. आणि गप्पा-टप्पांना सुरुवात झाली. हे होतयं न होतय तोपर्यंत आत्मुस बुवांचा (फेमस कथानायकाचे साहित्तीक निर्माते, दिगदर्शक, उत्तम लेखक, फुलराणीप्रेमी, जिलबीसंप्रदायाचे स्थापनकर्ते ई.ई.) फोन आला आणि येतोय असं कळवलं. ते येताहेत हे कळल्यावर मंडळींचे चेहेरे आनंदाने उजळले. =)). कपिलचाही फोन आला.
तेवढ्यात अनाहिताधर्माला जागुन समस्तं तै वर्गानी बागेमधे एंट्री घेउन वेगळा कट्टा चालु केला. =))
थोडा वेळ बाहेर उखाळ्या-पाखाळ्या काढुन, नं आलेल्या आयडींना उचक्या लावण्यामधे मंडळी गुंतली. (अन्या दातार, कालच्या तुला लागलेल्या उचक्यांना संपुर्णपणे नाखुनकाका जबाबदार आहेत रे). दंबुकवाले डॉक का आले नसावेत ह्यावरुन बराचं खल झाला आणि एक्काकाकांनी ते प्रॅक्टीसमधे गुंतलेले असल्याने आले नसावेत असा अंदाज व्यक्त केला. (पेशंट प्रॅक्टिस का टारगेट शुटिंग प्रॅक्टीस ही अंमळ शंका आहे) ;). तेवढ्यात दाढीधारी औरंगजेबाचं सपत्नीक आगमन झालं. त्याच्या पाठोपाठ कपिलही आला. मग सगळ्यांनी बागेमधे कुच केलं. अंधार व्हायला लागलेला होता. मंडळींनी इथे माझी खेचायचा माफक अतिअयशस्वी प्रयत्न करुन पाहिला =)). नाखुनकाकांना चौथा कोनाडा ह्या सखोल आयडीचा फोन आला आणि परत त्यांना आणायसाठी म्हणून आम्ही बागेबाहेर आलो. चौथा कोनाडाही सपत्नीक आलेले होते. एवढी हसत खिदळत चाललेली मंडळी बघुन बागेच्या गार्डांची पाचावर धारण बसली असावी असा अंदाज आहे. सगळेजण सावरकर उद्यानामधल्या धबधबा चौथर्यावर जमले. चिरोट्यांचा राउंड टु झाला. तिकडे परत गप्पांचा राउंड टु सुरु झाला. तिकडे जेमतेम १० मिनिट होतायत तोपर्यंत बुवांचा फोन आला. त्यांनाही बागेपाशी बोलावलं. त्यांना घ्यायला म्हणुन मी परत बागेच्या दाराशी गेलो. (अश्या फेर्या रोज मारल्या असत्या तर काठीसारखा बारिक झालो असतो. असो).
बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. त्यांना घेउन परत धबधब्यापाशी गेलो. जाता जाता गेल्या चार दिवसात त्यांच्यावर झालेल्या खरडहल्ल्याविषयी माफक चर्चा केली. बुवांनी दुर्लक्ष करणे (उर्फ फाट्यावर मारणे) ह्या हत्याराचे उपयोग समजाउन सांगितले. धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली. बुवा अजुनही फुलराणी कोण हे सांगायला तयार नाहित असं एक निरि़क्षण नोंदवतो. आता उशिर झाल्याने जेवायला जायचा बुट काढला गेला. कुठे जायचं ह्यावरुन चार-सहा हॉटेलांची नावं चावली गेली. शेवटी रसोई से फायनल करुन मंडळी बागेबाहेर यायला निघाली. सिक्युरिटी गार्डाच्या बाहेर पडाच्या शिट्ट्यांना चक्क फाट्यावर मारुन मंडळी रमतगमत बाहेर आली. बाहेर पार्किंग मधे पण परत थोडा वेळ कट्टा रंगला. आणि मंडळी जेवायला रवाना झाली. मी, कपिल आणि नितीन जेवायला जाणार नसल्याने बागेबाहेर आलो. कपिलही गेला. मग नितीनशी थोडा वेळ गप्पा हाणुन आम्ही आपापल्या घराकडे रवाना झालो.
कोणाचा गफलतीनी नामोल्लेख राहिला असेल तर सांगा रे.
(जेवण वृत्तांत लिहा रे कोणीतरी.)
डावीकडुन नितीन पाटील (gogglya), इस्पिकचा एक्का, झकासराव, उत्सवमुर्ती मुवि, चौरा, पहिला राजा, वल्ली, नाखु आणि मुवि ज्युनिअर.
प्रतिक्रिया
30 May 2015 - 2:48 pm | टवाळ कार्टा
http://www.misalpav.com/comment/701057#comment-701057
हे कधी झाले मग? आणि सोवळ्यातला कट्टा शेप्रेट झाला कै?
30 May 2015 - 2:50 pm | टवाळ कार्टा
बाकी कट्टा आज अस्ता तर यायचा विचार चाल्लेला ;)
30 May 2015 - 3:09 pm | अजया
एवढाच वृ आणि एकच फोटो? भर घाला कट्टा उपस्थितांनो!
30 May 2015 - 3:37 pm | त्रिवेणी
मझा रुमाल टाकुन जाते.
त्या एका तईन च नाव- मोनु(आम्हा सर्व शांत्-समंजस अनाहितांपैकी एक).
30 May 2015 - 3:55 pm | टवाळ कार्टा
खिक्क -
आम्हा सर्व शांत्-समंजस अनाहितांपैकी एक असे पेश्शल लिहावे लाग्ते वाट्टे =))
30 May 2015 - 4:17 pm | नाखु
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.
30 May 2015 - 4:23 pm | टवाळ कार्टा
प्रत्येकावर १ लेख होउ शकेल
30 May 2015 - 10:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
सेफ्टी कम्स फर्स्ट.
आधी प्रजा मग राजा.
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
कॉलिंग बुवा.
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला?
उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.
30 May 2015 - 4:35 pm | पॉइंट ब्लँक
ऐश केली आहे कि राव!
30 May 2015 - 5:43 pm | श्रीरंग_जोशी
एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही.
असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच.
अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?
30 May 2015 - 5:46 pm | लालगरूड
सगळीच ज्येष्ठ आहेत. :-D :-D .
30 May 2015 - 6:47 pm | टवाळ कार्टा
अतिशय वादग्रस्त वाक्य आहे हे ;)
30 May 2015 - 6:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हो ना तु आला असतास तर जरा कट्ट्याच्या वयाचं अॅव्हरेज वाढवता आलं असतं ३०-४० नी.
30 May 2015 - 11:16 pm | लालगरूड
खिक्क .. माझे वय 19
31 May 2015 - 12:18 am | टवाळ कार्टा
मग तुम्हीच ज्येष्ठ...इथे सगळे १८ वाले आणि १६ वाल्या हैत
31 May 2015 - 1:02 am | यसवायजी
पुणेकर १२ चे आणी पिंचीकर १४ चे आहेत.
31 May 2015 - 7:45 am | लालगरूड
तरूणपणा ऊफाळून आलाय वाटत ;-) ....
31 May 2015 - 1:49 pm | भीडस्त
पुणेकर १२ चे
आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात्
सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा.
दंडवत हये तुम्हाला.
चवदाकर.
31 May 2015 - 7:46 am | लालगरूड
टका ला मिपा तरूण सदस्याचा पुरस्कार द्या....
30 May 2015 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा
@वल्ली धरलेणीकर >>>
@मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> चला..,नाम'करण सार्थ झालं!
@बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा!
@धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच जाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला..
दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे..
परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला.
दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली.
================
समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/
30 May 2015 - 6:24 pm | प्रचेतस
ह.बुव्याचा उपवृत्तांत जबरदस्त.
30 May 2015 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा
30 May 2015 - 6:49 pm | टवाळ कार्टा
"ह." ही कोणती पदवी?
30 May 2015 - 8:16 pm | प्रचेतस
ओळख पाहू. ;)
30 May 2015 - 8:22 pm | अत्रुप्त आत्मा
ट क्या ओळखु नकोस! :-D
तो सवयी प्रमाणे कट्ट्यावर बसून आपली(च) हाणामारी बघेल.
30 May 2015 - 8:23 pm | प्रचेतस
तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही.
30 May 2015 - 8:39 pm | अत्रुप्त आत्मा
माझ्या मनात काहीच नाही!
30 May 2015 - 8:42 pm | प्रचेतस
खरंच?
30 May 2015 - 8:55 pm | अत्रुप्त आत्मा
नायतर काय, खोटच!!!??? :P
30 May 2015 - 9:07 pm | टवाळ कार्टा
मला ३ अक्षरी शब्द वाटतोय...तोच आहे कै?
30 May 2015 - 9:22 pm | पैसा
हसरे बुवा!
तुला काय वाटलं?
30 May 2015 - 9:41 pm | टवाळ कार्टा
हो तेच तेच ;)
30 May 2015 - 9:52 pm | अत्रुप्त आत्मा
@ हसरे बुवा!
तुला काय वाटल>> :-D अगदी बरोब्बर!!!! आगोबा "आले आले, हसरे बुवा..आले!" ,असेच अन्यत्र म्हणत असतो. :-D धन्यवाद पै तै!
30 May 2015 - 9:54 pm | टवाळ कार्टा
मी नै ऐकले ते मागच्यावेळी
30 May 2015 - 10:06 pm | अत्रुप्त आत्मा
हो का?
मग मनातल्या मनात जप कर की अत्ता!
म्हणजे तुझं तुला कळेल,आणि समाधानही मिळेल!
30 May 2015 - 6:48 pm | टवाळ कार्टा
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)
30 May 2015 - 6:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.
30 May 2015 - 7:05 pm | अत्रुप्त आत्मा
@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P
30 May 2015 - 7:39 pm | श्रीरंग_जोशी
सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते.
खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे.
बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.
1 Jun 2015 - 3:19 pm | सूड
तो तलवारीने वारा घालणारा स्मायली आवडला.
2 Jun 2015 - 1:26 am | डॉ सुहास म्हात्रे
तो तलवारीने वारा घालणारा स्मायली आवडला.
=))तो शरणागतीचे पांढरे निशाण हालवत आहे !
30 May 2015 - 6:51 pm | यशोधरा
मस्त आहेत दोन्ही वृ.
30 May 2015 - 7:00 pm | अजया
बुवाश्टाईल वृत्तांत आवडल्या गेला आहे!
30 May 2015 - 7:39 pm | खटपट्या
दोन्ही व्रुत्तांत खूप छान...
30 May 2015 - 8:14 pm | भाते
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग!
आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद!
फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत!
नशिब, मी हा धागा आजच पाहिला.
धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!
30 May 2015 - 9:24 pm | अन्या दातार
मस्त वृत्तांत. ह. बुवांचा उपवृत्तांतही नेहमीप्रमाणेच मस्त. बादवे माझाच्च फक्त गणेशा झालाय का फोटोच्या बाबतीत??
30 May 2015 - 9:33 pm | जुइ
तेवढे फटु अजून येऊद्या.
30 May 2015 - 10:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला कट्टा वृत्तांत.
-दिलीप बिरुटे
30 May 2015 - 11:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग
गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान
ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो.
एक बर्यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...
.
.
.
.
बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...
.
.
इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली.
दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला !
मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...
.
.
.
माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.
.
वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य...
मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली !
(* MST = मिपा स्टँडर्ड टाईम)
यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला अहेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !)
लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...
.
.
पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !).
प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे !
बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...
.
शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...
...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...
.
पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...
.
.
(या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.)
.
जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...
.
रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...
.
तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल !
हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...
.
.
.
बुटीकचे मालक...
अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच !
.
30 May 2015 - 11:39 pm | आदूबाळ
अरे! तुम्ही नादमध्ये गेला होतात का? मस्त दुकान आहे.
31 May 2015 - 9:38 am | प्रसाद गोडबोले
एकदम अनुमोदन !
त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =))
बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)
31 May 2015 - 9:50 am | प्रचेतस
हीहीही.
पण त्याला गणेश चटणी पानाची सर नै राव.
31 May 2015 - 12:21 pm | बॅटमॅन
गणेश चटणी =)) काय नाव तरी =)) उद्या शंकर भाजी, स्कंद पुरी, इ. नावेही आली तर आश्चर्य वाटायला नको. =))
30 May 2015 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा
जबरीच!
30 May 2015 - 11:52 pm | श्रीरंग_जोशी
एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे.
बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन.
बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?
31 May 2015 - 12:11 am | डॉ सुहास म्हात्रे
माणशी दहा रुपये शुल्क आहे.
31 May 2015 - 12:26 am | टवाळ कार्टा
बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क? >>> =))
31 May 2015 - 7:00 am | मुक्त विहारि
सकाळी नि:शुल्क
आणि
संध्याकाळी सशुल्क
1 Jun 2015 - 9:58 am | नाखु
सशुल्क केल्याबद्दल
कपीलमुनी आणि कॅप्टनकडून जाहीर निषेध खलीता.
पोष्टमन नाखुस
1 Jun 2015 - 10:43 am | टवाळ कार्टा
दंबूक ठेवायला एकच खांदा लागतो हो =))
31 May 2015 - 12:26 am | टवाळ कार्टा
या वृत्तांतात सुध्धा बर्रेच काही हातचे राखून ठेवलेले आहे ;)
31 May 2015 - 3:35 am | जुइ
तपशीलवार वर्णन आणि फोटो आवडले!
31 May 2015 - 7:52 am | लालगरूड
आवडला वृत्तांत
31 May 2015 - 8:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
जब्राट =))
नै ओ कुठलीही खास झाडं किंवा जागा :P
31 May 2015 - 8:14 pm | बाबा पाटील
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५
आपला बाबा पाटील
31 May 2015 - 8:27 pm | मुक्त विहारि
पॉईंट नोटेड....
६-७ जूनला परत एक क्ट्टा आहे.
पुण्यातच आहे.
जागा ठरली की नक्की सांगूच.
31 May 2015 - 8:34 pm | बाबा पाटील
_/\_
31 May 2015 - 12:14 am | एस
मस्त कट्टा!
31 May 2015 - 12:38 am | काळा पहाड
फोटो खाली नावं ल्ह्या ना राव
31 May 2015 - 7:45 am | लालगरूड
तरूणपणा ऊफाळून आलाय वाटत ;-) ....
31 May 2015 - 8:17 am | चौथा कोनाडा
खुपच धमाल कट्टा !
माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले !
रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली.
कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच!
जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो :
आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले.
पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए :
नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण !
असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !
31 May 2015 - 8:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
छान फोटो आणि लिहिलं पण छान. अजुन लिहित जा की म्हणजे आयडीशी ओळख होईल.
31 May 2015 - 8:29 am | चौथा कोनाडा
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !
1 Jun 2015 - 10:57 am | नाखु
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच!
एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा.
वाचक नाखु
1 Jun 2015 - 12:07 pm | चौथा कोनाडा
;-))) धन्यु नाखु !
तुमच्या सारखे दिग्गज असताना आमी म्हंजे ३५० सीसी बुलेट पुढे ५० सीसी ढुर्र ल्युना !
1 Jun 2015 - 12:13 pm | टवाळ कार्टा
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अॅक्सेसरी* होती
*इथे औरंगजेब मागतोय तीच
1 Jun 2015 - 12:22 pm | चौथा कोनाडा
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !
1 Jun 2015 - 3:32 pm | पैसा
३५ सिसी होती. शोधून बघ. मी पायडल मारून स्टार्ट करून चालवली आहे १९८५ ला.
1 Jun 2015 - 7:36 pm | श्रीरंग_जोशी
कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो.
लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.
1 Jun 2015 - 7:40 pm | श्रीरंग_जोशी
टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती.
बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.
1 Jun 2015 - 7:55 pm | पैसा
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!
1 Jun 2015 - 8:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
शाळेत असताना चढावर असणार्या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =))
त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!
1 Jun 2015 - 8:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.
1 Jun 2015 - 8:01 pm | श्रीरंग_जोशी
टिव्हिएसची स्कूटी होती का?
मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही.
लुना व सनी वापरणार्यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अॅक्टिवाने तर संपवलाच.
1 Jun 2015 - 8:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अॅक्टिव्हा अँड कायनेटिक होंडा बिलाँग्ज टु व्होल डिफ्रंट लिग्स!!
1 Jun 2015 - 8:11 pm | श्रीरंग_जोशी
कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.
1 Jun 2015 - 12:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
गाडी कितीही सी.सी.ची असुद्या पाठलाग ८०-१०० सी.सी.चाच करावा लागतो आयुष्य्भर.
1 Jun 2015 - 7:41 pm | श्रीरंग_जोशी
म्हणणे एकदम बरोबर आहे पण पाठलाग 'आयुष्य्भर' का बरे?
1 Jun 2015 - 7:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
म्हणायची एक पद्धत हो.
1 Jun 2015 - 8:03 pm | श्रीरंग_जोशी
मला दुसरी शक्यता वाटली होती.
शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.