अणुयुद्ध (शतशब्दकथा)
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट..
रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !!
त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त..
युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !!
केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात...
जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !!
अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी...
बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !!
आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता...
त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !!