मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

स्वच्छ भारत अभियान की पब्लिसीटी स्टंट ??

Sanjay Kokare ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे. मा.

(सोबती)

स्वप्नज ·
लेखनविषय:
प्रेरणा- www.misalpav.com/node/30059 मुळ कवीयित्रीची क्षमा मागून तसेच 'तांब्या' संप्रदायाच्या मठाधिपती, महागुरु, सर्व सेवक व भक्त यांना वंदन करुन हे विडंबन सादर करत आहे. जेवणाला मिळतील सोबती खूप सोडायला तुम्ही एकटेच असता कितीही जवळचं वाटलं कोणी शेवटी लांबूनच पाहणारे निघतात ज्याचं त्याला लागतं कुंथावं प्राक्तनात असलेलं चुकत नसतं कुणी किती जरी खाल्ला मऊ घास दैवात कुंथणे टळत नसतं हेच जर आहे चिरंतन सत्य नुसतं कुंथून भागणार नसतं रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत कुंथणं योग्य असत समर्पण- 'तांब्या' संप्रदायातील सर्वांनाच 'त्या' गोष्टीसाठी तांब्या परवडत नाही.

" युवकाच्या देशात युवकांच्या समस्या "

Sanjay Kokare ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
" ये देश युवाओका है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देशम्हटल तर तेउचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ?या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

माहितगार ·
लेखनप्रकार
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

माझेच (म्हणणे) खरे

नाखु ·
वि.कुं ची क्षमा मागून्.आणि खरे काकांना दंडवत घालून (शीर्षकात खरे शब्द वापरू दिल्याबद्दल) वाचनापूर्वी (गर्भीत) सूचना :काव्यरस व लेखन विषय नजरेखालून घालावा नंतर पश्चाताप नको. नेहमी प्रमाणे यावरील खुलाश्यास वा स्पष्टीकरणास आम्ही बिलकुल बांधील नाहीत तेव्हा अपेक्षा करून मुखभंग करून घेऊ नये. :-| :| =| :-| वि.सू.

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

डॉ सुहास म्हात्रे ·
लेखनविषय:
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही.

वॉरेन अँडरसनचा मृत्यू आणि आमेरीकेची रासायनीक गोपनीयता

माहितगार ·
लेखनप्रकार
भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्‍या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं. अर्थात अमेरीकन लोक फक्त परकीयांशीच असे वागतो समजून वागतात पण इतरांसाठी खोदलेले स्वतःसाठीच कामाला येते असे काहीसे आमेरीकेचे झाले.

देढ इश्कीयां अर्थात दोन बायकांचा दादला अजून कुंवारा!

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाच अंकी आधारित राजकीय नाटक अंक १ प्रवेश १ फ़्लॆश फ़ॊरवर्ड... वाड्यामधील दिवाणखान्यात, डुगडुगत्या खुर्चीवर देवाजी एकटाच बसला आहे. लग्नाचे व-हाड घेऊन इथे आलो होतो. आणि दोन बायांचा तमाशा पहावा लागला. माझी आज ना...ती, ना...ही अशी स्थिती झाली आहे.......... देवाजीच्या नजरेसमोर घटनापट उलगडत होता.... मुंबईतील वाड्यामधे नरुभाऊंच्या कुटुंबातील कोणी निवास करून एकोणीस वर्षे होऊन गेली. देवाजी आता खरे तर घोडनवरा झाला होता. आज इतक्या वर्षांनी मुंबईमधल्या आलीशान वाड्यात घर बसवायचा चानस आला होता. नरुभाऊंना हर्षाच्या उकळ्या फ़ुटत होत्या.

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय । टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते.

पत्रकार ब्रॅडली...

विकास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वॉशिंग्टन पोस्टच्या एकेकाळच्या कार्यकारी संपादकाचे, बेन ब्रॅडलीचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या बायकोने मध्यंतरी गुपित फोडले त्यानुसार ब्रॅडलींना काही वर्षे अल्जायमर झालेला होता ज्यामुळे त्यांची स्मृती लयाला गेली होती. पण त्यांच्या नेतृत्वाखाली १९७०च्या सुरवातीस वॉशिंग्टन पोस्टने जे काही केले त्यामुळे त्यांच्या बद्दलच्या स्मृती आजही अमेरीकन माध्यमात जाग्या असलेल्या दिसल्या. बेन ब्रॅडली हे मुळचे बॉस्टनचे.