ये कहाणी थी दियेकी और तुफानकी
जर तुम्हापैकी काही लोकांना आठवत असेल, कि ८ वी किंवा ९ वी मध्ये इंग्रजीच्या पुस्तकात बायबलमधील ऐक कथा धडा म्हणून होती, 'डेविड आणी गोलायथ' असा, अश्याच काहिश्या आधुनिक कथेचा मी आज इंटरनेटद्वारे अनुभव घेत आहे. अस म्हणतात, जेव्हा इस्रायेलचा राजा सॉल आणि फिलीस्तिनी सैन्य लढाईमधे एकमेका समोर उभे ठाकले होते, जेव्हा फिलीस्तिनी योद्धा गोलायथ, जो की जवळ जवळ ९ हात उंच, व बराच धिप्पाड, मजबूत चिलखताने मढलेला, मैदानात पाहून, इस्रायेली सैन्यातले बहुसंख्य भीतीने चळाचळा कापू लागले, त्यांची लढ्याची उर्मी कमी होऊ लागली. अश्या परिस्थितीत ऐक तरुण पुढे आला, तो होता डेविड.