ते दोघ
विदयार्थी दशेत असताना 2004 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मी एका प्री पोल सर्व्हे मध्ये भाग घेतला होता . त्यावेळेस अमरावती लोकसभा मतदार संघात पण काही चकरा कराव्या लागल्या होत्या . शिवसेनेचे अनंत गुढे आणि लोकशाही आघाडीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होती . त्यावेळेस कोणी एक बच्चु कडू अस विचित्र नाव असणारा कोणी एक पोरगेला उमेदवार पण अपक्ष म्हणून उभा होता . या दिग्गजांच्या लढतीमध्ये पोरांचं टोळक घेऊन फिरणारा आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा आर्थिक परिस्थिती यथातथाच असणारा हा पोरगा काय करणार असाच एकूण सूर होता .