राजकारण

काही प्रश्न (कृ. ह. घेणे)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
14 Sep 2014 - 11:30 am

काही काळापूर्वी ऐक जाहिरात दिसायची टीव्हीवर,
क्रिकेटच्या ऐका सामन्यात ऐक कप्तान हजर आहे व दुसर्या संघाकडून कप्तान जाहीरच होत नाही,
बिनकप्तानाची टीम काय जिंकणार ? असा सवाल विचारला जातो आणि मतदान अमुक ऐका पक्षाला कराच असे
सांगितले जाते. या विधानसभा निवडणुकीत, तो संघ बिना कप्तानच मैदानात उतरणार असे दिसते !

मला माहीत असलेले रामायण

पोटे's picture
पोटे in काथ्याकूट
13 Sep 2014 - 10:42 pm

(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)

________________________________________________________

आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.

सीता ही भूमीकन्या होती.

________________

वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?

मोझाम्बिकची निवडणूकः १

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
13 Sep 2014 - 7:51 pm

१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे.

मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल.

मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली. नाही, म्हणजे चालत किंवा रस्ता शोधत नव्हतं यायचं मला; पण तरी निदान पृथ्वीच्या कोणत्या तुकड्यावर आपण असणार हे जाणून घ्यायचं कुतूहल होतं मला.

राजकारणलेखअनुभव

आपण यांना पाहिलंत का ?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
11 Sep 2014 - 11:55 am

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी (फक्त आणि फक्त) भारतीय केंद्रसरकार आणि राज्य सरकार, लष्कराचे शर्थीचे प्रयत्न करत असून, हवाई दल, नौदलाचे कमांडो आणि निमलष्करी दलांचे लाखो जवान या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसते. अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो.
वरील फुटीरतावादी मंडळी पुरात वाहून बेपत्ता झाल्या काय ? म्हणूनच 'आपण यांना पाहिलंत का' , या दूरदर्शनच्या कार्यक्रमात यांचे फोटू दाखवावे का ?

पेरू : भाग ११ : लोकजीवन

समर्पक's picture
समर्पक in जनातलं, मनातलं
8 Sep 2014 - 12:37 am

या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मइतिहासभाषासमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरअर्थकारणराजकारणशिक्षणचित्रपटछायाचित्रणप्रकटनअनुभवमाहिती

दोन अश्रू आणि एक सलाम..!

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
15 Aug 2014 - 11:13 am

शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं,
त्यांना कधीच विसरलो आहोत...
त्यांच्या नावानं जे पुढारले,
त्यांच्यावरच विसंबलो आहोत...

15 ऑगस्ट, 26 जानेवारी...
मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील..
सुट्टी जर जोडून आली,
तर फारच बहार आणतील...

तीन-चार दिवस स्वातंत्र्याला,
बघा कसं उधाण येईल..
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले,
त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल...

जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी,
पुन्हा कशाला आठवायच्या..?
असे जर म्हणत असाल,
तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..?

संस्कृतीइतिहासकवितासाहित्यिकसमाजराजकारण

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
15 Aug 2014 - 9:42 am

आज १५ ऑगस्ट २०१४ , आज भारतात सगळीकडे ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.

सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

राजकारणशुभेच्छा

इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in काथ्याकूट
3 Aug 2014 - 11:28 am

I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh

जिल्हा - पालघर

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
1 Aug 2014 - 10:59 am

आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे.

Palghar District

राजकारणबातमी

<इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत>

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
25 Jul 2014 - 2:35 pm

महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .)
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-bord...