राजकारण

आम्हाला सदर कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मसुदा लिहिण्यास मदत करावी

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
14 May 2014 - 10:11 am

ऐका हो ऐका, आमच्या गावी ओसाडवाडीच्या माळरानावर, हर ५ सालाबाद परमाने जत्रेमध्ये, यापावतो दस्तूर खुद्द जादुगार न. म. सरकार यांचे जादूचे शो १६ मे पासून, लागणार हाये हो, जादुगार हे मुळचे रा. मु. पो. ढेबेवाडीचे असून, त्यांचा टुरिंग शिनेमाचा ह. मु. ओसाडवाडीच्या नदीकाठ येथे आहे.

राजकारणमत

गांधीजींबद्दलची भुमिका डावे-समाजवादी स्पष्ट करतील का?

विकास's picture
विकास in काथ्याकूट
14 May 2014 - 6:38 am

आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली:

"....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत नेमके काय केले, याबाबतच इतिहास पुन्हा समोर आला पाहिजे', "

पुस्तक परिचयः

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
13 May 2014 - 8:50 am

मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या, ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाचा, श्री.नरेंद्र गोळे ह्यांनी केलेला, ’आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’, हा मराठी अनुवाद १०-०५-२०१४ रोजी पुण्यात प्रकाशित झाला. हे पुस्तक माधवी-प्रकाशन-पुणे येथे, खालील पत्त्यावर विक्रीस उपलब्ध आहे.

समाजराजकारणप्रकटनसमीक्षालेखमाहितीभाषांतर

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
9 May 2014 - 5:32 pm

.
"" मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -""

(चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी)

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी
अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ...

नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा
माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा "
का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी ..... अर्ध्यावरती .....

भार्या वदली बघत एकएक यादीमधला फोटो
"उद्या पहाते दुसऱ्या आपुल्या प्रभागात मी फोटो "
पण नवऱ्याला नव्हती खात्री दूर बसे जाऊनी .......अर्ध्यावरती....

करुणकविताविडंबनराजकारणमौजमजा

बोला, व्हायचे आहे का तुम्हालाही 'शहीद' ??

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
7 May 2014 - 10:18 am

,.,

एकादी मृत व्यक्ती 'शहीद' ठरवली जाते, तेंव्हा त्या व्यक्तीच्या संदर्भात काही गोष्टी घडत असलेल्या दिसून येतातः

१. त्या व्यक्तीचा मृत्यु हा कुणीतरी घडवून आणलेला असणे.

आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
6 May 2014 - 10:53 am

आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे. हे पुस्तक विकत घ्यावे आणि वाचावे ही विनंती!

- नरेंद्र गोळे २०१४०५०६

समाजजीवनमानराहणीराजकारणप्रकटनमाहिती

विठ्ठलराव गाडगीळ यांच्या बद्दलच्या लेखाकरीता माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
25 Apr 2014 - 7:03 pm

विकिपिडियावर माजी खासदारांची नावे चाळताना विठ्ठल गाडगीळ यांच्या बद्दल माहितीचा अगदीच अभाव असल्याचे लक्षात आले. मराठी विकिपीडियावर "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री. फेब्रुवारी ६ इ.स. २००१ रोजी त्यांचे निधन झाले." एवढीच ओळ आहे. इंग्रजी विकिपीडियावर त्यांच्या नावाचा लेखही आढळला नाही.

१) जन्म

२) व्यक्तीगत जीवन

३) कारकीर्द

४) लेखन आणि भाषणे

परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा.

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
24 Apr 2014 - 11:48 am

जेव्हा एखादा भारतीय प्रवासी आमेरीकेत जातो आणि आमेरीकेच्या संदर्भाने निरीक्षणे नोंदवतो त्यातून तो ज्या हितसंबंधांचे आणि पूर्वग्रहांचे प्रतिनिधीत्व करतो ते हितसंबंध आणि पूर्वग्रह असलेली निरीक्षणे अभ्यासून वगळल्यावर उरलेल्या निरीक्षणांचे आमेरीकेच्या अभ्यासात महत्व असते कारण हितसंबंध आणि पूर्वग्रह विरहीत त्रयस्थ पक्षाची निरीक्षणे तटस्थ म्हणून अधिक विश्वासार्ह असण्याची शक्यता असू शकते.

संस्कृतीइतिहासराजकारणविचार

गरोदर निवडणूक

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
23 Apr 2014 - 4:20 pm

अजून मे महिना आणि त्याची १६ तारीख लई लांब आहेत. आणि आता कधी एकदाचं हे पोटुशा निवडणुकीचं बाळांतपण उरकून नव्या सरकारचा जन्म, त्याचं बारसं, आणि 'आईवर गेलाय अगदी...' चे नवलाईचे दिवस संपतायेत एकदाचे असं झालंय. अहो जिकडे बघावं तिकडे निवडणुकीशिवाय चर्चाच नाहीत! मागे काही दिवसांपूर्वी आमचे दुग्धदमित्र महिन्याचं बिल घ्यायला घरी आले होते. दुग्धदमित्र म्हणजे घरी दूध आणून देणारे हो; लंगोटीयार अशी मैत्रीची एक व्याख्या असू शकते तर दुग्धदमित्र का नाही? जसं जलद म्हणजे जल देणारे तसे दुग्धद म्हणजे दूध आणून देणारे. ते तसे कधीही उगवतात. महिना संपल्यावरच येतात असं नाही.

राजकारणविरंगुळा