शहीद म्हणजे काय ?

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
6 May 2014 - 8:15 pm
गाभा: 

नुकताच एसकाळवर हा लेख पाहिला

माझ्या शहीद पित्याचा अपमान कधीच विसरणार नाही

ह्या निमित्ताने शहीद म्हणजे नक्की कात ह्यावर जरा चर्चा करुयात ... कोणाला शहीद म्हणायचे कोणाला देशद्रोही कोणाला माथेफिरु कोणाला मौत का सौदागर अशा जरा व्याख्यांवर चर्चा अपेक्षित आहे .

नोट : धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ...अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल :D

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 May 2014 - 8:17 pm | पैसा

मी रात्री गस्त घालणार नाय! आताच सांगून ठेवते!

प्रकाश घाटपांडे's picture

6 May 2014 - 8:22 pm | प्रकाश घाटपांडे

आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना शहीद मानतो.राष्ट्राचे, जनहिताचे काम करताना ज्यांनी आपला जीव धोक्यात असताना देखील काम चालू ठेवले व त्यात ज्यांना अनैसर्गिक मृत्यू आला ते शहीद.

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2014 - 8:29 pm | प्रसाद गोडबोले

.राष्ट्राचे, जनहिताचे काम करताना ज्यांनी आपला जीव धोक्यात असताना देखील काम चालू ठेवले व त्यात ज्यांना अनैसर्गिक मृत्यू आला ते शहीद.

>>> मग अफजल गुरुलाही शहीद मानता येईल की .... रादर आजाद कश्मीर वाले तसे मानतातही :)

प्रकाश घाटपांडे's picture

6 May 2014 - 8:44 pm | प्रकाश घाटपांडे

हो, त्यांच्या दृष्टीने.

मंदार दिलीप जोशी's picture

8 May 2014 - 3:05 pm | मंदार दिलीप जोशी

आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना शहीद मानतो>>.

तुमच्या दॄष्टीने :P

आत्मशून्य's picture

6 May 2014 - 9:35 pm | आत्मशून्य

सहमत आहे.

मंदार दिलीप जोशी's picture

8 May 2014 - 3:05 pm | मंदार दिलीप जोशी

आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना शहीद मानतो.>>

:D

मैत्र's picture

8 May 2014 - 3:58 pm | मैत्र

सहमत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2014 - 8:27 pm | प्रसाद गोडबोले

शहीद म्हणलं की सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर येतात ते मदनलाल धिंग्रा ... मग खुदीराम बोस ...अनंत कान्हेरे !
पण
आज ह्या लोकांची कोणी आठवण ही काढत नाही..
... आज आपल्याच तमीळ बाधवांच्या बाबत निष्ठुर वागणारे राजीव गांधी शहीद ठराहेत.... ....कालाय तस्मै नमः !

आजानुकर्ण's picture

6 May 2014 - 9:12 pm | आजानुकर्ण

काय सांगता? आजकाल शहीद शब्द चालतो काय?

शहीद हा शहादत म्हणजे इस्लामसाठी मृत्यू पत्करणारा या अर्थाने निर्माण झालेला शब्द आहे तो आपल्या हुतात्म्यांना वापरू नये असे वाटते.

हुताशनीतील आहुती या अर्थाने मदनलाल धिंग्रा प्रभृतींना हुतात्मा म्हणावे!

शेखर's picture

7 May 2014 - 1:07 am | शेखर

+१

नानासाहेब नेफळे's picture

6 May 2014 - 8:34 pm | नानासाहेब नेफळे

कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता जो इतरांसाठी स्वतःचे प्राण देतो तो शहीद.

रमेश आठवले's picture

7 May 2014 - 10:21 pm | रमेश आठवले

+१

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2014 - 12:21 am | प्रसाद गोडबोले

कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता जो इतरांसाठी स्वतःचे प्राण देतो तो शहीद.

मग नथुराम पण शहीद ठरेल की !

म्हणताय की आणखी दुसरा अर्थ अभिप्रेत आहे ?

असो शहीद म्हणजे अशी व्यक्ती जी देशासाठी, त्यातील लोकांसाठी माथेफिरु वैचारीकतेला बळी न पडता प्रसंगी स्वतःचे प्राणही अर्पून जाते ती व्यक्ती शहीद असा माझा समज आहे. (शब्दशः अर्थ माहीत नाही).

शहीद विषयावर धागा तो सुधा "जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही .." असे लिहुन या विषयाचे गांभीर्य घालवायचा किळसवाणा प्रयत्न बघुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.

नानासाहेब नेफळे's picture

9 May 2014 - 11:55 am | नानासाहेब नेफळे

नथुराम शहिद

कसा हो??
जो इतरांसाठी प्राण देतो तो शहीद असे म्हंटलेलय , नथुराम कोणासाठी मेला?
संघासाठी?... त्यांनी तर हात वर केले होते.आमचा त्याच्याशी काही संबंध नाही असे सांगितले.
सावरकरांसाठी??... त्यांचा गांधीहत्येशी कोणताही संबंध नाही असे तेच स्वतः कोर्टात म्हणाले होते.
ब्राह्मण हिंदू वगैरेंसाठी??... त्यांनी तर असा कोणताही आदेश नथुरामला दिला नव्हता.
स्वतःच्या अतिरेकी विचारातून इतरांचा निघृण खून करणे व त्याचा आळ इतर समाजावर यावा यासाठी दाढी वाढवून, सुंता करणे याला माथेफीरुपणा म्हणतात, शहिद होणे नव्हे.

प्रसाद गोडबोले's picture

9 May 2014 - 4:14 pm | प्रसाद गोडबोले

अखंड भारत नावाचे एक हिंदुराष्ट्र होते ...त्या लोकांसाठी नथुराम हा शहीद होता ...पण आता ते राष्ट्रच उरले नाही त्यामुळे नथुराम शहीद ठरणार नाही ...

अजुनही अखंडभारताचे वेडे स्वप्न पाहणारे काही लोक आहेत म्हणे त्यांच्या साठी कदाचित तो शहीद असावा ...नक्की कल्पना नाही .

नोट : मी अखंड भारतवादी नाही उलट सावरकर-संघ आदी प्रभृतींना न जुमानता बापुंनी ज्या योग्य प्रकारे फाळणी घडवुन आणली त्याबद्दल त्यांच्या विषयी आदरच आहे ! इथे १५-२०% आवरत नाहीत ३५-४०% असते तर वाटच लागली असती !!

नानासाहेब नेफळे's picture

9 May 2014 - 5:07 pm | नानासाहेब नेफळे

अखंड भारताने नथुरामला बडीशेप दिली होती काय?

प्रसाद गोडबोले's picture

9 May 2014 - 7:55 pm | प्रसाद गोडबोले

अं...हं ... गांजा दिला असावा कदाचित !

अनुप ढेरे's picture

9 May 2014 - 5:08 pm | अनुप ढेरे

१५-२०% आवरत नाहीत

कोण ओ कोण.. नक्की कोणाबद्दल बोलताय?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2014 - 2:18 am | निनाद मुक्काम प...

म्हणून ह्या अर्थी आत्मघाती हल्लेखोर तालिबान काही लोकांना शहीद वाटतात.
पंजाबात व तामिळनाडू, महाराष्ट्र येथे तेथील लोकात शहीद म्हणून ओळखले जाणारे भारताच्या कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरतात.
मुशरफ म्हणूनच गेला आहे.
एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो.
तेव्हा तुम्ही कोणत्या चष्म्यातून पाहतात ते महत्वाचे

तुमचा अभिषेक's picture

9 May 2014 - 12:05 am | तुमचा अभिषेक

एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो.

दहशतवादी हा स्वताच्या स्वातंत्र्यासाठीच लढत असेल असे गरजेचे नसते. समोरच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी लढत असेल आणि त्यात त्याचा बळी गेला तर त्याला शहीद नाही म्हणता येणार.
कसाब हा कोणासाठीही शहीद झाला नाही. अगदी इस्लामसाठीही शहीद झाला नाही. कारण इस्लामच्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणली नाही की त्याविरुद्ध लढताना त्याने आपले प्राण गमावले. इस्लाम खतरेमे अशी आपणहूनच बांग देऊन आत्मघाताचा मार्ग स्विकारणार्‍यांना शहीद हा शब्द अनफिट !

ते गांधी परिवार स्वत:च्या चुकुने मेलय . फुकनीच काय शहिद बिहीद नाय.

बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता मध्ये वाचल का? साँडर्य हत्या : भगतसिंग निर्दोष असल्याचे सिद्ध पाकिस्तानी पोलीसांचा निर्वाळा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2014 - 9:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+५०००००००००००

मंदार दिलीप जोशी's picture

8 May 2014 - 3:06 pm | मंदार दिलीप जोशी

ते गांधी परिवार स्वत:च्या चुकुने मेलय . फुकनीच काय शहिद बिहीद नाय.>>

अनुमोदन

मंदार दिलीप जोशी's picture

8 May 2014 - 3:08 pm | मंदार दिलीप जोशी

बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता मध्ये वाचल का? साँडर्य हत्या : भगतसिंग निर्दोष असल्याचे सिद्ध पाकिस्तानी पोलीसांचा निर्वाळा >>

(१) त्यासाठी पाक पोलिसांच्या सर्टीफिकेटची गरज नाही
(२) निर्दोष याचा अर्थ त्याने सँडर्सचा खून केलाच नाही असा होतो. खून केला तरच तो हुतात्मा. त्याने खून केलाच आहे अशी आमची खात्री आहे. आणि तेच योग्य आहे (खून करणे त्याने)

तुषार काळभोर's picture

8 May 2014 - 5:07 pm | तुषार काळभोर

सध्या भगतसिंग यांच्या निर्दोषत्वाचा मुद्दा पाकिस्तानात (आणि अर्थातच भारतात) गाजतोय. कुणीतरी तत्कालीन एफ आय आर ची एक प्रत मागवली आणि त्यात म्हणे भगतसिंग यांचे नावच नाही. अर्थात भगतसिंग हे निर्दोष होते.
मग त्यांनी जे कॄत्य केले(जे तत्कालिन सरकारने व न्यायव्यवस्थेने गुन्हा ठरवले), व ज्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले, ते त्यांनी केलेच नव्हते का? मग तरीपण त्यांना देशभक्त/क्रांतिकारक म्हणायचे का? आणि जर या न केलेल्या कॄत्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले असेल, तर त्यांना 'शहीद' म्हणायचे का?

महत्वाचे: मला भगतसिंग यांच्याबद्दल, त्यांच्या क्रांतिकार्याबद्दल, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल अभिमान आहेच. पण हा जो त्यांना निर्दोष ठरवण्याचा अट्टाहास/प्रयत्न चालू आहे, त्याने काय साध्य होणार आहे ? जे कॄत्य त्यांनी केले म्हणुन अभिमान वाटतो, ते त्यांनी केलेच नाही, हे सिद्ध करून त्यांच्या विषयीचा अभिमान वाढेल की कमी होईल?

बॅटमॅन's picture

8 May 2014 - 5:50 pm | बॅटमॅन

रोचक अन योग्य शंका.

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2014 - 8:58 pm | अत्रुप्त आत्मा

धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ...
अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल Biggrin>>> *ROFL*
==================
धाग्याची..
सुर..वात!
http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-volley-smiley-emoticon.gif
मध्य
http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-smash-smiley-emoticon.gif
अंत
http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/game-set-match-smiley-emoticon.gif
*lol*
==========
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-player-serving-smiley-emoticon.gif

>>अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल

आपणही कधीतरी स्त्रीआयडी होतात म्हटलं गिर्जाकाका!! =))))

आणि हो. जिलेबी नसून जिलबी असतंय ते!!

.....आणखी किती अवांतर हवंय बोला. माताय अवांतर करण्यात तर आपण संक्षींना पण हार जाणार नाय !!

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2014 - 11:22 pm | अत्रुप्त आत्मा

@स्त्रीआयडी होतात म्हटलं गिर्जाकाका!! >>> =)) अरे....खरच की!!! =))

आत्मशून्य's picture

6 May 2014 - 9:40 pm | आत्मशून्य

म्हणजे नक्कि काय झाले की तिथे शांतीसेना पाठवायचा निर्णय घ्यावा लागला ? कोणी उहापोह करेल काय ? मानवी हक्काचे कारण पुढे करत साधा श्रीलंका ताब्यात ठेवणे आपल्याला जमले नाही ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2014 - 10:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

राजीव गांधी हत्या=श्रिलंकेमधे शांतीसेना पाठवली, आपल्याचं तमिळ लोकांना मारलं त्याचा बदला म्हणुन झाली. तस्मात शहीद होऊ शकत नाहीत.

ईंदिरा गांधी हत्या= भिंद्रनवाले प्रकरण नडलं. शहिद नाही.

म. गांधी= सतत हिंदुंच्या विरोधात भुमिका घेत राहीले. तुम्ही यंव केलं नाही तर मी उपोषण करीन तुम्ही त्यंव केलं नाही तर मी उपोषण करीन असं सतत ब्लॅकमेल केलं. पाकिस्तानला केलेली मदत भोवली. शहिद नाहीत.

श. लाला लजपतराय= माझ्या माहितीमधला एकमेव शहिद कॉंग्रेस नेता. ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. शहीद आहेत कारण स्वत:च्या प्राणाची पर्वा नं करता ब्रिटिशांचा विरोध केला.

श. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव- खरे शहिद. आत्मकेंद्रीत राजकारणाचे बळी.

काँग्रेस चं आणि गांधी घराण्याचं कोणीही शहिद नाही. स्वतःच्या चुकांचे बळी.

आत्मशून्य's picture

6 May 2014 - 10:35 pm | आत्मशून्य

या न्यायाने जनरल वैद्य कोण ठरतात आपुलिया नजरेत ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2014 - 7:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बळी.

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2014 - 6:23 pm | प्रसाद गोडबोले

+००७

आत्मशून्य's picture

8 May 2014 - 1:05 am | आत्मशून्य

मग या न्यायाने इंदीरागांधी सुधा देशाच्या अखंडतेसाठी बळी गेल्या असे ठरत नाही काय ?

चौकटराजा's picture

7 May 2014 - 7:12 am | चौकटराजा

शहीद काय , देशभक्त काय, देशद्रोही काय ही सर्व आपल्या दृष्टीकोनाची लीला आहे. माझ्या मताने कोणत्याही उद्देशाने कार्य
करत असताना त्या कार्याची प्रतिक्रिया म्हणून मृत्यू आल्यास त्याला शहीद म्हणता येणार नाही. ही व्याख्या अनेकाना पटणार नाही.या दृष्टीकोनाने सैनिक, राजकारणी, क्रांतिकारक कोणीही शहीद ठरणार नाहीत. तर पंजाबमधे जे निरपराध लोक
अतिरेक्यांकडून मारले गेले ते शहीद ठरू शकतात. कोणत्याही युद्धात मग ते सैनिकांचे असो वा क्रांतिकारकांचे वा राजकारण्यांचे दोन्ही बाजूनी युद्ध हा एक अपराधच आहे. त्यात दोन्ही बाजू दोषी असतात.त्याचवेळी युद्ध होत असते.

साती's picture

7 May 2014 - 7:44 am | साती

जास्तं वटवट करून संपादकांना रात्रपाळी घडवणारे आयडी अनेक संकेतस्थळावरून दुसर्या सकाळी गायब होतात त्याला 'शहीद होणे ' म्हणतात.

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2014 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले

रात्रपाळी >>> =))))

पैसा's picture

7 May 2014 - 7:50 pm | पैसा

पण हे शहीद आयडी नंतर "वासांसि जीर्णानि यथा विहाय" म्हणत दुसरे कपडे घालून येतातच परत!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 May 2014 - 12:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अप्रुव्ह कसे काय होतात? आणि लेजिटिमेट आयडी चार चार महिने रखडतात. मग मुळात इतर संस्थळांसारखे तत्काळ सदस्यत्व का देत नाही ??

पिलीयन रायडर's picture

8 May 2014 - 1:15 pm | पिलीयन रायडर

+१

पुर्वी सुद्धा हे एकदा विचारुन झालय.. तरीही अजुन एकदा..

सरळ सरळ डु आयडी आहेत हे कळत असताना ते अप्रुव्ह कसे होतात?

बाळ सप्रे's picture

8 May 2014 - 2:19 pm | बाळ सप्रे

सरळ सरळ कळत असलं तरी 'प्रुव्ह' करता येत नसल्याने 'अप्रुव्ह' होत असावेत !! *scratch_one-s_head*

आत्मशून्य's picture

8 May 2014 - 2:30 pm | आत्मशून्य

समजा एखाद्याला स्प्लिट पर्सनेलिटी विकार आहे व त्यामुळे त्याचे दोन आयडी असतील तर ते डु आयडी ठरतील काय ?

स्प्लिट पर्सनेलिटी असेल तर ते डु आयडी आपापसातच भांडतील ना!! *lol*

पैसा's picture

8 May 2014 - 3:48 pm | पैसा

:ROFL:

प्यारे१'s picture

8 May 2014 - 4:03 pm | प्यारे१

एका गंभीर धाग्यावर अशा प्रकारे अत्यंत ज्येष्ठ मिपाकरांकडून (बाकीचं अध्याहृत) विनोद केला गेलेला पाहून एक सामान्य मिपाकर म्हणून शरम वाटली. :(

आत्मशून्य's picture

8 May 2014 - 4:34 pm | आत्मशून्य

आत्मलज्जा भये आपल्यास जो क्लेश झाला त्याबद्दल दिलगीरी म्हणून समस्त मिपाकरांनी 1 मिनिट शांतता पाळावि असा प्रस्ताव सुचवतो.

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2014 - 7:15 pm | अत्रुप्त आत्मा

@स्प्लिट पर्सनेलिटी http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif असेल तर ते डु आयडी आपापसातच http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif भांडतील ना!! >>> तुफ्फा..............न!!! http://www.sherv.net/cm/emo/happy/super-excited-boy-smiley-emoticon.gif मारलय!

>>समजा एखाद्याला स्प्लिट पर्सनेलिटी विकार आहे व त्यामुळे त्याचे दोन आयडी असतील तर ते डु आयडी ठरतील काय ?

तुमचे आहेत का दोन आयडी??

प्रतिसादासाठी नवीन धागा काढला आहे:
बोला, व्हायचे आहे का तुम्हालाही 'शहीद' ??
http://www.misalpav.com/node/27814

मदनबाण's picture

7 May 2014 - 10:55 am | मदनबाण

हॅहॅहॅ... व्हॉट ए जोक ! ;)
या सर्वाला अमेठीचा संदर्भ आहे ना ? गांधी कुटुंबियांच्या जिव्हाळ्याशी संबंध आहे ना अमेठीचा ? घ्या मग भाजपा चे उत्तर !

जाता जाता :- आता विचार करतोय कॉग्रेस,रागा आणि प्रियांका यांना नक्की "विकास" म्हणजे नक्की काय ? आणि याचा "अर्थ" तरी माहित आहे का ? तसेच अमेठी मधल्या लोकांना फक्त भावनात्मक आव्हानावर पोट भरायची इच्छा आहे की त्यांनाही विकास हवा आहे ते येणार्‍या काळात कळेलच. नविन म्हण सांगुन जातो :- यथा मूर्ख प्रजा तथा धुर्त राजा.

आनन्दा's picture

7 May 2014 - 1:46 pm | आनन्दा

माझा अर्थ -
धर्मासाठी ज्याने प्राणांची आहुती दिली तो हुतात्मा.

जेपी's picture

7 May 2014 - 6:32 pm | जेपी

आता धागा निट वाचला .
"शहिद मंजे नक्की कात" अस दिसतय. मंजे कात असुन बी धागा काय रंगला नाय.कुनीतरी चुना लावा रे.

(मळकरी) जेपी

एकादी मृत व्यक्ती 'शहीद' ठरवली जाते, तेंव्हा त्या व्यक्तीच्या संदर्भात काही गोष्टी घडत असलेल्या दिसून येतातः

१. त्या व्यक्तीचा मृत्यु हा कुणीतरी घडवून आणलेला असणे.

२. सदर व्यक्ती ही अमूक एक देश, समाज वा गटातील लोकांच्या 'हिता'साठी काहीएक कार्य मृत्युपूर्वी करत होती, अशी एकंदरित लोकांची, आणि बहुतेकदा स्वतः त्या व्यक्तीचीही - समजूत असणे.

३. हे कार्य ती व्यक्ती स्वेच्छेने, 'कर्तव्य' भावनेने, निरपेक्षपणे करत असणे, किंवा 'मरावे परि कीर्तीरूपे उरावे' ही आकांक्षा. किंवा:

४. ते कार्य करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर सोपवण्यासाठी अन्य व्यक्ती, संस्था, सरकार, इ. ने त्याबद्दल काही वेतन, सुविधा, बक्षीस वगैरे देऊ केलेले असणे.

५. प्रत्यक्ष वेतन, बक्षीस वगैरे खेरीज मरणोपरांत स्वर्ग, जन्नत, हेवन वगैरेत चिरकाल सुखोपभोगात, ऐय्याशीत दंग राहण्याची संधी लाभणार असल्याचे आमिष त्या व्यक्तीला दिले गेलेले असणे.
('हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम' अर्थात युद्धात तू मारला गेलास, तर तुला स्वर्ग लाभेल, आणि जिंकलास, तर पृथीचे राज्य भोगशील" )

***
अमूक एका गटातील लोकांनी 'शहीद' ठरवलेली व्यक्ती अन्य गटातील लोकांना अपराधी, पापी, समाजकंटक वगैरे वाटू शकते.
बाकी एकंदर 'बघ्या' लोकांना या शहीदांचे काही सोयरसुतक नसते. जुन्या शहीदांच्या नावाने एकादी सुटी मिळते, तर नवीन शहीदांविषयी बातमी एक चटपटीत 'ब्रेकिंग न्यूज' असते.
***
काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात. एकादा प्रसिद्ध नेता वा सत्ताधारी 'शहीद' झाला, तर या गोष्टीचे भांडवल करून त्याचे वारस, वंशज वा नामसादृश्याचा फायदा घेणारे बिलंदर त्या शहिदाचे चित्र नोटांवर छापून, गावोगावी रस्त्यांना त्याचे नाव देऊन समाजमानसात त्याची स्मृती जागृत ठेवून पिढ्यान पिढ्या सत्ता उपभोगतात. त्यातून त्या वंशात आणखी कुणी 'शहीद' झाले, तर मग विचारायलाच नको. त्या शहिदांची स्मारके उभी करणे, त्यांचा नावांच्या संस्था काढणे अश्या अनेक खटपटीतून भरपूर बेगमी करता येते.

कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. "जरा आंख मे भरलो पानी" वगैरे गाणी रचणारे, गाणारे, ऐकताना डोळ्यातून टिपे काढणारे, कादंबर्‍या-नाटके लिहिणारे, पुतळे बनवणारे, चित्रे-सिनेमे काढणारे, या सर्वांना प्रसिद्धी मिळते ... एकंदरित दुसरे कुणीतरी 'शहीद' होणे, हा बर्‍याच लोकांसाठी 'फायदेमंद' सौदा असतो.

... राहता राहिले त्या शहीदांचे आप्त-स्वकीय. ते काही काळ दु:खी, अस्वस्थ रहातात, आणि शेवटी ते ही 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे' या सर्वव्यापी नियतीच्या अटळ गतीस प्राप्त होतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2014 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात.
कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात.
याचा रोख या लेखावर्ही आहे असा सौंशय येतोय =))

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2014 - 10:40 pm | प्रसाद गोडबोले

सौंशय

>> आँ ? अजुन संशयच आहे ? अहो हा जिलबीचा घाणा थंड झालाय आम्ही आता लवकरच नवीन जिलबी टाकायची तयारी करतोय ...जिलबी. क्र. २ : गैरफायदा म्हणजे काय :D

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2014 - 10:54 pm | प्रसाद गोडबोले

संशय ? ऑं ? अजुन संशयच आहे होय ?

इथे हा जिलबीचा घाणा थंड पडलाय म्हणुन आम्ही नवीन जिलबी टाकायच्या तयारीत आहोत

जिलबी क्र. दोन = गैरफायदा म्हणजे काय ? :D

चित्रगुप्त's picture

9 May 2014 - 10:22 am | चित्रगुप्त

समजा, काही सैनिक दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोहीमेवर गेले, मात्र ते सर्व दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडून ठार झाले, आणि त्यांचा 'शहीद' म्हणून गौरव करण्यात आला. पुढे खात्रीलायक पुराव्यावरून (उदा व्हिडियो शूटिंग इ.) असे कळले, की प्रत्यक्षात ते सैनि़क समोरून मोठ्या संख्येने येणार्‍या दहशत वाद्यांना घाबरून शस्त्रे टाकून पळ काढत होते, आणि त्यांना पाठीमागून गोळ्या घालून ठार केले गेले होते.
अश्या स्थितीतही ते 'शहीद' झाले, म्हणवले जातील का?
किंवा अश्या मोहीमेवर गेलेल्या शंभर सैनिकांपैकी काही गोळ्या लागून ठार झाले, काही बाँबस्फोटात, काही सर्पदंशामुळे, काही बर्फवृष्टीमुळे, तर काही अज्ञात कारणामुळे. यापैकी सर्वच 'शहीद' म्हणवले जातील का? नसल्यास कोणकोणते?
किंवा एकाद्या गावातील अनेक लोक बिबट्या सारख्या नरभक्षक प्राण्याने मारल्यावर त्यापासून गावकर्‍यांची सुटका करण्यासाठी एकजण निस्वार्थ बुद्धीने, तर दुसरा त्या कामाबद्दल मोबदला घेऊन जंगलात गेले, आणि दोघांनाही त्या प्राण्याने ठार केले, तर ते दोघेही 'शहीद' म्हणवले जातील का ?

चित्रगुप्त's picture

9 May 2014 - 10:22 am | चित्रगुप्त

समजा, काही सैनिक दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोहीमेवर गेले, मात्र ते सर्व दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडून ठार झाले, आणि त्यांचा 'शहीद' म्हणून गौरव करण्यात आला. पुढे खात्रीलायक पुराव्यावरून (उदा व्हिडियो शूटिंग इ.) असे कळले, की प्रत्यक्षात ते सैनि़क समोरून मोठ्या संख्येने येणार्‍या दहशत वाद्यांना घाबरून शस्त्रे टाकून पळ काढत होते, आणि त्यांना पाठीमागून गोळ्या घालून ठार केले गेले होते.
अश्या स्थितीतही ते 'शहीद' झाले, म्हणवले जातील का?
किंवा अश्या मोहीमेवर गेलेल्या शंभर सैनिकांपैकी काही गोळ्या लागून ठार झाले, काही बाँबस्फोटात, काही सर्पदंशामुळे, काही बर्फवृष्टीमुळे, तर काही अज्ञात कारणामुळे. यापैकी सर्वच 'शहीद' म्हणवले जातील का? नसल्यास कोणकोणते?
किंवा एकाद्या गावातील अनेक लोक बिबट्या सारख्या नरभक्षक प्राण्याने मारल्यावर त्यापासून गावकर्‍यांची सुटका करण्यासाठी एकजण निस्वार्थ बुद्धीने, तर दुसरा त्या कामाबद्दल मोबदला घेऊन जंगलात गेले, आणि दोघांनाही त्या प्राण्याने ठार केले, तर ते दोघेही 'शहीद' म्हणवले जातील का ?

प्रचेतस's picture

9 May 2014 - 11:08 am | प्रचेतस

बिबट्या सारख्या नरभक्षक प्राण्याने मारल्यावर त्यापासून गावकर्‍यांची सुटका करण्यासाठी एकजण निस्वार्थ बुद्धीने, तर दुसरा त्या कामाबद्दल मोबदला घेऊन जंगलात गेले, आणि दोघांनाही त्या प्राण्याने ठार केले, तर ते दोघेही 'शहीद' म्हणवले जातील का ?

हो.
उदाहरणार्थ वाघाशी/ बिबट्याशी झालेल्या द्वंद्वात शहीद झालेल्या वीराचा हा वीरगळ बघा ;)

a

चित्रगुप्त's picture

9 May 2014 - 12:24 pm | चित्रगुप्त

वीरगळ आणि सतीचा दगड यांचेबद्दल अधिक माहिती आणी फोटो वगैरे देता येतील का?
ज्याला हल्ली शहीद-स्मारक म्हणतात, त्यालाच वीरगळ म्हणायचे का? सती आणि शहीद यात काय साम्य/फरक आहे?
माझ्या वरील प्रतिसादापैकी पहिल्या दोन मुद्द्यांबद्दल काय वाटते ?

प्रचेतस's picture

9 May 2014 - 12:32 pm | प्रचेतस

पहिल्या दोन मुद्द्यांबाबत काहीच म्हणायचे नाही.

वीरगळ आणि गधेगाळांविषयी पूर्वीच लिहिले होते. ह्यात फोटो सुद्धा आहेत. वीरगळ म्हणजेच शहीद स्मारक म्हणणे उचित ठरावे.

वीरगळ आणि गधेगाळ

वीरगळांच्या अधिक फोटो साठी माझे लोणी भापकर आणि पांडेश्वर हे दोन लेख पाहावेत.

सतीचा दगड म्हणजे सती गेलेल्या स्त्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारला जातो. सतीचा आशीर्वादपर मुद्रेतील हात त्याजवर कोरलेला असतो.

ही पूर येथील सतीशिळा ह्यात बहुधा चार बायका सती गेल्या असाव्यात.
a

ही तिथलीच अजून एक सतीशिळा

a

तर ही कोथळे गावातील सतीशिळा

a

हायला. आसा हात लईच येळापासून असाबी काडतात व्हय. आमाला वाटलं व्हतं की फकस्त विलेक्शन आल की गावाच्या भिंतिवर काडतात. ;)

चित्रगुप्त's picture

9 May 2014 - 1:23 pm | चित्रगुप्त

छान.
या सतीशिळा डिझाईनच्या दृष्टीने पिकासो व हुसेनला लाजवणार्‍या आहेत. अर्थात या पिकासोने आफ्रिकन आदिवासी कलेवरून, तर हुसेनने पिकासोच्या कलेवरून आपली कला बेतली होती.

सुधीर काळे's picture

10 May 2014 - 5:21 pm | सुधीर काळे

शहीद अनेक प्रकारचे असतात. सामाजिक, राजकीय, सेनादले, पोलीसदले, 'बाबू' मंडळी इ.इ. सामाजिक कार्यकर्ते नेहमीच कार्यरत असतात मग ते कुठेही असोत. उदा. महात्मा गांधी, नरेंद्र दाभोळकर. राजीव गांधी कांहीं सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक राजकीय नेता होते.
समजा एकादा सैनिक सुटीवर गांवी गेलेला आहे व त्याचा कुणी वैयक्तिक वैमनस्यावरून खून केला किंवा तो एकाद्या अपघातात मरण पावला तर त्याला शहीद म्हणता येणार नाहीं. पण तो जर आपले कर्तव्य करताना मृत्यू पावला तर ते हौतात्म्य ठरेल. राजीव गांधींची हत्या करण्यात आली तेंव्हां ते कुठल्याही पदावर नव्हते उदा. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते वगैरे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला हौतात्म्य म्हणता येणार नाहीं असे मला वाटते. तसेच ज. वैद्य यांनाही (ते सेवानिवृत्त झालेले असल्यामुळे) हुतात्मा म्हणता येणार नाहीं.
हे आपलं माझं मत!